रॉलेक्स रिंग्स लिमिटेड

(बीएसई कोड ५४३३२५)प्रवर्तक: मानेश मडेका

बाजारभाव: रु. १,८९९/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: फोर्जिंग

भरणा झालेले भागभांडवल: रु. २७.२३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)प्रवर्तक५७.६४

परदेशी गुंतवणूकदार ३.९३

बँक्स/ म्युच्युअल फंड/ सरकार

३१.९३ इतर/ जनता ६.५०

पुस्तकी मूल्य: रु. २३६/-

दर्शनी मूल्य: रु.१०/-

लाभांश: — %

प्रति समभाग उत्पन्न: रु. ७०.०४ किंमत उत्पन्न गुणोत्तर: २७.१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३.५ डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १७.६ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): ३१.३

बीटा : ०.९ बाजार भांडवल: रु. ५१७१ कोटी (स्मॉल कॅप) वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,१९९/१,१०७

सरलेल्या वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (आयपीओ) भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी रोलेक्स रिंग्ज लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या पाच फोर्जिंग कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी प्रामुख्याने प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, दुचाकी वाहने, ऑफ-हायवे तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी हॉट रोल्ड फोर्जिंग आणि मशीन्ड बेअरिंग रिंग पुरवते. कंपनी इतर ऑटोमोटिव्ह घटकांची आघाडीची उत्पादक आणि जागतिक पुरवठादार आहे. कंपनीची उत्पादने विविध आणि महत्त्वाच्या उद्योगांना उपयुक्त असून यात ऑटोमोटिव्ह, औद्योगिक पायाभूत सुविधा, रेल्वे, अक्षय ऊर्जा इ. क्षेत्रांचा समावेश होतो. कंपनीच्या उत्पादनाची एकत्रित स्थापित वार्षिक क्षमता १,४४,७५० मेट्रिक टन असून कंपनीचे राजकोट, गुजरात येथे २२ फोर्जिंग लाइनसह ३ उत्पादन प्रकल्प आहेत. या उत्पादन सुविधा ८.७५ मेगावॅटची पवन क्षमता आणि १.५८ मेगावॅटच्या सौर ऊर्जा क्षमतेने सुसज्ज आहेत. कंपनीने नुकतीच आपली सौर ऊर्जा क्षमता १२ मेगावॅटपर्यंत वाढवली आहे.

हेही वाचा – बाजाररंग : मोठ्या गोष्टी छोट्या नोंदी!

कंपनीच्या एकूण महसुलांपैकी सुमारे ५४ टक्के कमाई बेअरिंग रिंगमधून, तर ३८ टक्के कमाई ऑटोमोटिव्ह घटकांमधून मिळते. कंपनी फ्रान्स, इटली, जर्मनी, थायलंड, झेक प्रजासत्ताक, अमेरिका आणि इतर १७ वेगवेगळ्या देशांमध्ये रिंग आणि ऑटोमोटिव्ह घटक असलेली उत्पादने निर्यात करते. कंपनीच्या महसुलात निर्यातीचा वाटा ६० टक्के आहे. रोलेक्स रिंग्सच्या प्रमुख ग्राहकांत ऑटोमोटिव्ह ॲक्सेल, एसआरएफ लिमिटेड, स्केफ्लर इंडिया, टिमकेन इंडिया, फोर्ड, एसकेएफ, एनआरबी बेयरिंग्स इत्यादी प्रमुख उत्पादकांचा समावेश होतो.

कंपनीने गेल्या तिमाहीत उत्तम कामगिरी करून दाखवली असून आपल्या कर्जाचा बोजादेखील कमी केला आहे. डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३०८.३० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२.७९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ७७ टक्क्यांनी वधारला आहे. सध्या वाहन क्षेत्राला चांगले दिवस आले असून पुढील आर्थिक वर्षांत कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी राहील अशी अपेक्षा आहे. कंपनीच्या ग्राहक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कंपनी विद्युत शक्ती वाहने (इलेक्ट्रिक व्हेइकल) तसेच हायब्रिड वाहनांसाठी उत्पादन वाढवत असून आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. प्रति समभाग ८९० रुपये अधिमूल्याने आणलेल्या रोलेक्स रिंग्सच्या आयपीओला १३० पट अधिक भरणा होऊन उत्तम प्रतिसाद मिळाला होता. १,१०३ रुपयांना सूचिबद्ध झालेला हा शेअर सध्या १,९०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आणि प्रत्येक मंदीत पोर्टफोलिओमधील या कंपनीच्या समभागांची संख्या वाढवण्यास हरकत नाही.

हेही वाचा – ITC देशातील ७ वी सर्वात मोठी कंपनी म्हणून आली समोर, ‘या’ दिग्गज कंपनीला सोडले मागे

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • अजय वाळिंबे

(Stocksandwealth@gmail.com)