Nifty At Alltime High: शेअर बाजारात वाढीची मालिका सुरूच आहे. आज एनएसईच्या निफ्टीने शेअर बाजारात विक्रमी उच्चांकी पातळी गाठली आहे. बाजारात ऐतिहासिक तेजीचा कल आहे आणि त्याने आज २१,८४८.२० चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला . आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे बाजाराला ही पातळी गाठण्यास मदत मिळाली.

निफ्टीची यापूर्वीची उच्च पातळी होती

निफ्टीची मागील उच्च पातळी २१,८३४.३५ होती आणि आज सकाळी ११ वाजण्यापूर्वीच निफ्टीने १८० अंकांच्या वाढीसह ही पातळी ओलांडली. निफ्टीच्या आयटी निर्देशांकाच्या सार्वकालिक उच्चांकामुळे सकाळपासूनच बाजारात उत्साह आहे.

हेही वाचाः ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या IPO ला जोरदार प्रतिसाद , ३८.४३ पट मागणी, ‘या’ तारखेला होणार शेअर बाजारात ‘लिस्ट’

निफ्टी शेअर्सची स्थिती जाणून घ्या

निफ्टी शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास ५० पैकी २८ शेअर्स वाढताना दिसत आहेत आणि २२ शेअर्स घसरणीसह व्यवहार करीत आहेत. निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या समभागांमध्ये इन्फोसिस ७.६३ टक्क्यांनी वर आहे. विप्रो ४.३६ टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा ४.२९ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करीत आहे. TCS ३.९१ टक्के आणि ONGC ३.८७ टक्क्यांनी व्यवहार करीत आहेत.

हेही वाचाः अयोध्येतील राम मंदिरात आता ट्रेनने मोफत जाता येणार, ‘या’ राज्यातील भाजप सरकारचा मोठा निर्णय

काय आहेत बाजारातील तेजीबद्दलच्या खास गोष्टी?

निफ्टी आयटी निर्देशांक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे आणि आज तो एका वर्षाच्या उच्चांकावरून ५ टक्क्यांनी वाढला आहे. काल इन्फोसिस आणि टीसीएसचे तिमाही निकाल आले आणि आज त्याचा परिणाम या दोन्ही समभागांवर दिसत आहे. इन्फोसिस ७ टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि निफ्टीचा टॉप गेनर बनला आहे.

सेन्सेक्सची स्थिती समजून घ्या

सेन्सेक्समधील आजचा इंट्राडे उच्चांक ७२,४३४.५८ आहे आणि त्याने ७०० हून अधिक अंकांची झेप घेतली आहे. सेन्सेक्सची सर्वकालीन उच्च पातळी ७२,५६१.९१ वर आहे आणि ती ओलांडण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक निफ्टीमध्येही प्रचंड वाढ

बँक निफ्टी २५० अंकांनी वाढताना दिसत आहे आणि १२ बँक समभागांपैकी ११ वाढीसह व्यवहार करीत आहेत.