अजय वाळिंबे

अहलुवालिया काँट्रॅक्ट्स (इंडिया) लिमिटेड

(बीएसई कोड ५३२८११)

प्रवर्तक : विक्रमजीत अहलुवालिया

बाजारभाव : रु. ८१०.३५

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: कंत्राटी बांधकाम

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १३.४० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५५.३२

परदेशी गुंतवणूकदार १२.६०

बँकस्/ म्युचुअल फंडस्/ सरकार २६.६५

इतर/ जनता ५.४३

पुस्तकी मूल्य: रु. १९९

दर्शनी मूल्य: रु. २/-

गतवर्षीचा लाभांश: २०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ३०.७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०७

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.४

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ८.३६

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २४.७

बीटा: ०.९

बाजार भांडवल: रु. ५,४०० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८११ / ३९९

अहलुवालिया काँट्रॅक्ट्स ही १९७९ मध्ये स्थापन झालेली नावाजलेली अभियांत्रिकी कंपनी असून कंत्राटी बांधकामात अग्रेसर आहे. भारतातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि इमारतींचे प्रकल्प विकसित करते. कंपनीला निवासी, व्यावसायिक, संस्थात्मक, कॉर्पोरेट कार्यालये, वीजनिर्मिती प्रकल्प, रुग्णालये, हॉटेल्स, आयटी पार्क, मेट्रो स्टेशन आणि डेपो तसेच सरकारी व खासगी ग्राहकांसाठी ऑटोमेटेड कार पार्किंग लॉट्सवर काम करण्याचा अनुभव आहे. अहलुवालिया काँट्रॅक्ट्सने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून त्यात सीबीआय कार्यालय (बीकेसी, मुंबई), टाटा हाऊसिंग (गुडगाव), मुंबई मेट्रो डेपो (मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई), आयटीसी गार्डेनिया पंचतारांकित हॉटेल (बंगळूरु) यांसारखे विविध व्यावसायिक आणि संस्थात्मक प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीने रशियन तांत्रिक साहाय्याने केयूबी २.५ सिस्टीमचा वापर करून पेटंटेड हाय-स्पीड प्रीकास्ट बांधकाम केले आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी किमतीच्या मोठ्या आकाराच्या गृहनिर्माण विभागात आणखी उच्च क्षमतेने बांधकाम करत येईल.

चालू आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत अहलुवालियाकडे १४,४६४ कोटी रुपयांच्या ऑर्डर प्रलंबित असून त्यापैकी जवळपास ७५ टक्के ऑर्डर सरकारी आहेत. कंपनीच्या सध्या चालू असलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये मांडले डेपो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाटा मेमोरिअल सेंटर (मुंबई), एम्स (जम्मू), बिहार पशू विज्ञान विद्यापीठ (पाटणा, बिहार), नॅशनल पोलीस अकादमी (नेपाळ), मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (हरियाणा) यांचा समावेश आहे.

कंपनीच्या ग्राहकाच्या मांदियाळीत टाटा, अडानी, रिलायन्स, एमएमआरडीए, एनबीसीसी, एशिया डेव्हलपमेंट बँक, इंजिनीयर्स इंडिया, अपोलो हॉस्पिटल्स इ. अनेक मोठ्या कंपन्या आहेत. ३० जून २०२३ रोजी कंपनीची निव्वळ ऑर्डर बुक ११,६८० कोटी रुपये असून हे प्रकल्प पुढील तीन वर्षांत कार्यान्वित केले जातील. ऑर्डर बुकचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर: ३१.५६ टक्के

संस्थात्मक – २४.६९ टक्के

रुग्णालय – २१.०१ टक्के

निवासी – १३.६१ टक्के

व्यावसायिक – ८.६९ टक्के

हॉटेल – ०.४४ टक्के

एकूण ऑर्डर बुकमध्ये सरकारी कार्यादेशांचे योगदान ७४.६५ टक्के आहे.

गेल्या आर्थिक वर्षात २,८३८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १९३ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या अहलुवालिया काँट्रॅक्ट्सचे ३० सप्टेंबर २०२३ साठीच्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने गत वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ४५ टक्के वाढीसह ९०१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ४१ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचा सरकारी प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आणि खासगी क्षेत्रातील करारांना कमी करण्याचा मानस आहे. कंपनीचा रोख प्रवाह वाढवण्यासाठी नॉन-कोअर मालमत्तांच्या विक्रीची योजना आखत आहे. गेली काही वर्षे पायाभूत सुविधांवर सातत्याने भर देणाऱ्या सरकारी योजना भविष्यातही चालू राहतील अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक आणि अत्यल्प कर्ज असलेल्या अहलुवालिया काँट्रॅक्ट्सकडून आगामी कालावधीत उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून अहलुवालिया काँट्रॅक्ट्सचा तुमच्या पोर्टफोलियोमध्ये समावेश करा.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचविलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.