सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकाने सोमवारी (२८ नोव्हेंबर) ऐतिहासिक उच्चांक गाठला. धातू क्षेत्र सोडलं तर उर्वरित सर्वच क्षेत्रात खरेदीदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. सेन्सेक्सने इंड्राडेमध्ये ६२ हजार ७०१.४ चा टप्पा गाढला, तर निफ्टीने १८ हजार ६१४.२५ चा उच्चांक केला.

दिवसअखेर बाजार बंद होताना सेन्सेक्स ६२ हजार ५०४.८० इतका होता. म्हणजेच सेन्सेक्समध्ये २११.१६ अंकांची वाढ झाली. ही वाढ ०.३४ टक्के होती. दुसरीकडे निफ्टी १८ हजार ५६२.८० इतका होता. म्हणजेच ५० अंकाची म्हणजेच ०.२७ टक्के वाढ होती.

निफ्टीने २७४ सत्रांनंतर १८ हजार ६१४.२५ चा उच्चांक गाठला होता. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी निफ्टीने आपला जुना १८ हजार ६०४ च्या रेकॉर्डपर्यंत उडी घेतली होती. आता १३ महिन्यांनंतर निफ्टीने आपला नवा उच्चांक गाठला.

हेही वाचा : बाजाराचा तंत्र-कल : आकाश-आभाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात काहिशा पडझडीसह झाली. मात्र, लवकरच बाजार सावरला आणि दिवसअखेर नवे उच्चांक गाढले.