Share Market Update Today : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत झाले आहेत. सेन्सेक्स ८५० हून अधिक अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने २१९५० चा टप्पा ओलांडला आहे. व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे.
निफ्टीवरील आयटी निर्देशांक १ टक्क्याहून अधिक मजबूत झाला आहे. बँक, फायनान्शिअल, ऑटो, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांकही मजबूत झाले आहेत. सध्या सेन्सेक्स ८३८ अंकांनी वर असून, तो ७२,४८३ च्या पातळीवर व्यवहार करीत आहे. तर निफ्टी २५२ अंकांनी वाढून २१,९५० च्या पातळीवर पोहोचला आहे. हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. आजच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या शेअर्समध्ये ICICI BANK, TECHM, HCLTECH, WIPRO, TITAN, TCS, RELIANCE यांचा समावेश आहे.
जागतिक संकेतही मजबूत
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी गुरुवारी अमेरिकन बाजारही वाढीने बंद झाले होते. गुरुवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ३७० अंकांनी वाढून ३८,५१९.८४ च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite १९८ अंकांनी वाढून १५,३६१.६४ च्या पातळीवर बंद झाला. तर S&P ५०० निर्देशांक ६१ अंकांनी वाढून ४,९०६.१९ च्या पातळीवर बंद झाला. NSE ने इंडिया सिमेंट्स आणि इंडस टॉवर्सला २ फेब्रुवारीच्या F&O बंदी यादीत समाविष्ट केले आहे, तर SAIL आणि Zee Entertainment Enterprises यांना यादीत कायम ठेवण्यात आले आहे.