देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी आणि जागतिक पातळीवरील आशावादामुळे मंगळवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४१६ अंशांच्या वाढीसह सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला आहे. निफ्टी देखील १७,७०० अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीवर बंद झाला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान देणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीच्या समभागात गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या खरेदीच्या जोरामुळे एकूणच बाजारातील उत्साह वाढला.

सलग दुसऱ्या सत्रात तेजी दर्शवित मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१८.४५ अंशांनी वधारून ६३,१४३.१६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४५२.७६ अंशांची कमाई करत त्याने ६३,१७७.४७ अंशांची सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक
११४.६५ अंशांनी वधारला आणि तो १८,७१६.१५ पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत पातळीवर किरकोळ महागाई दर नियंत्रणात येत असून रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यानजीक पोहोचला आहे. दुसरीकडे वाढता औद्योगिक उत्पादन दर, वाढलेले जीएसटी संकलन अशा सकारात्मक घडामोडींमुळे बाजारात उत्साही वातावरण कायम आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून चालू वर्षाच्या अखेरीस दर कपातीची शक्यता वाढली आहे. आता अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि फेडच्या बैठकीकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष्य लागले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मांडले.

सेन्सेक्समध्ये, आयटीसी, टायटन, एशियन पेंट्स, रिलायन्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, बजाज फायनान्स, नेस्ले आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, एचसीएल टेक्नॉलॉजीज, स्टेट बँक, भारती एअरटेल आणि टाटा मोटर्सच्या समभागात घसरण झाली.

हेही वाचाः ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये आले १०३ कोटी रुपये, गुंतवणुकीसाठी समजला जातो सुरक्षित पर्याय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआरएफ शेअर्स लाखमोलाचा ठरला

मद्रास रबर फॅक्टरी अर्थात एमआरएफने प्रति समभाग १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्या रूपाने भारतीय भांडवली बाजाराला प्रथमच एखाद्या कंपनीच्या समभागाच्या किमतीने सहा अंकी स्तर गाठला आहे. कंपनीच्या समभागाने वर्षभरात ४५ टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. भारतीय बाजारपेठेत १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडणारी एमआरएफ पहिली कंपनी ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात एमआरएफच्या समभागाने मंगळवारच्या सत्रात १,००,४३९ रुपयांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर तो १.०३ टक्के म्हणजेच १०२४.३० रुपयांनी वधारून ९९,९९२.८५ रुपयांवर स्थिरावला.

हेही वाचाः ऑफिसला यायला सांगितल्यामुळे टीसीएसमधल्या महिला सामूहिक राजीनामा देतायत? कंपनीनं दिलं उत्तर


सेन्सेक्स ६३,१४३.१६ + ४१८.४५ (०.६७)
निफ्टी १८,७१६.१५ + ११४.६५ (०.६२)
डॉलर ८२.३८ -५
तेल ७२.९५ +१.५५