Share Market: भारत-पाकिस्तान तणावामुळे आज भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी, मोठ्या प्रमाणात घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ८०,००० च्या खाली उघडला, तर निफ्टी २४,००० च्या खाली उघडला.
संघर्षाच्या भीतीमुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात मोठी झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ६७२.८७ अंकांनी घसरून ७९,६६२.१४ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी २५०.७५ अंकांनी घसरून २४,०४२.१५ वर पोहोचला आहे.
या परिस्थितीत सेन्सेक्समधील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, इटरनल, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले यांचे शेअर्स तोट्यात होते. तर, सुरुवातीला आशियाई बाजार हिरव्या सकारात्मक व्यवहार करत होते.
या परिस्थितीत सेन्सेक्समधील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, इटरनल, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले यांचे शेअर्स तोट्यात आहेत. तर, लार्सन अँड टुब्रो आणि टायटनचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक वाढले. एकीकडे बाजारात विक्री सुरू असताना लार्सन अँड टुब्रो आणि टायटनचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक वाढले.
बाजार उघडताच क्षेत्रीय निर्देशांक लाल नकारात्मक व्यवहार करत होते. या सर्वांमध्ये निफ्टी रिअॅल्टीत लक्षणीय घसरण झाली. हा निर्देशांक १.५८% ने घसरून १,४७३.६० च्या पातळीवर आला आहे. निर्देशांकातील सर्व शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहे. अनंत राज शेअर चार्टमध्ये आघाडीवर आहे.
निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरला
भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरत असताना, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक देखील दबावाखाली आहे. या निर्देशांकात त्याच्या मूल्याच्या आणखी १% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप १०० साठी ही सलग दुसऱ्या सत्रातील घसरण आहे. गुरुवारी, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.९५% ने घसरला.