आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली. सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात बंद झाले. या कालावधीत बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये १ टक्के ते ४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सोमवारी बाजारात आयटी, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील समभागांवर दबाव वाढला, त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. गेल्या चार दिवसांच्या विक्रीत गुंतवणूकदारांना सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी सेन्सेक्स ८२५.७४ (१.२६ टक्के) अंकांनी घसरून ६४,५७१.८८ अंकांच्या पातळीवर तर निफ्टी २६०.९१ (१.३४%) अंकांनी घसरला आणि १९,२८१.७५ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स दिवसभरात तो ८९४.९४ अंकांनी म्हणजेच १.३६ टक्क्यांनी घसरून ६४,५०२.६८ वर आला. निफ्टी २६०.९० अंकांनी म्हणजेच १.३४ टक्क्यांनी घसरून १९,२८१.७५ वर आला. उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबर २०२३ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेअर बाजार बंद राहणार आहे.

हेही वाचाः पराग देसाई कोण होते? ज्यांनी २ हजार कोटींचे ‘वाघ बकरी टी’चे साम्राज्य निर्माण केले

On the strength of PSU banks the Sensex reached the level of 486 points
पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
share market today
शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी

टॉप गेनर्स आणि लूजर्स स्टॉक

जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एनटीपीसी, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवर ग्रिड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

हेही वाचाः Money Mantra : लग्नासाठी पीएफचे पैसे काढण्याचे नियम काय? ईपीएफ अ‍ॅडव्हान्स कसा काढायचा?

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर २००७ मधील ५ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. परिणामी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारात चौफेर समभाग विक्रीचा मारा केला होता. याबरोबर जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरले होते. शुक्रवारपर्यंतच्या सलग तीन सत्रांमध्ये विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्सने १,०३० अंशांनी तर निफ्टीने २६८ माघार घेतली होती.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३१.६२ अंशांची घसरून ६५,३९७.६२ पातळीवर बंद झाला होता. दिवसभरात त्याने ३२०.६३ अंश गमावत ६५,३०८.६१ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या सत्रात ८२.०५ अंशांची घसरण झाली आणि तो १९,५४२.६५ अंशांवर स्थिरावला होता.

पश्चिम आशियातील तणावामुळे उद्भवलेली अतिरिक्त अनिश्चितता आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हने महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर आर्थिक धोरणावर जोर दिल्याने बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. हमास-इस्रायल संघर्षामुळे खनिज तेलाच्या किमती पुन्हा एका ९३.४० डॉलर प्रतिपिंपावर जाऊन पोहोचल्याने जागतिक चिंता वाढवली आहे. याचबरोबर अमेरिकी रोख्यांवरील वाढत्या परतावा दरामुळे देशांतर्गत भांडवली बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर डॉलर मजबूत झाल्याने कंपन्यांसाठी आयात अधिक महागण्याची शक्यता आहे, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.