Swiggy share price today, April 02 : फुड डिलिव्हरी कंपनी असलेल्या स्विगीला काल (१ एप्रिल) रोजी बाजार बंद झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून १५८ कोटींची नोटीस प्राप्त झाली. त्यामुळे आज स्विगीच्या शेअरची किंमत १ टक्क्यांनी घसरलेली पाहायला मिळाली. शेअर बाजार उघडताच स्विगीच्या शेअरची किंमत १ टक्क्यांनी घसरून ३२८.८० होती. परंतु, कालांतराने १.३ टक्क्यांनी या शेअरची किंमत पुन्हा वाढली अन् ३३६.४५ रुपयंवर पोहोचली.

बंगळुरूच्या सेंट्रल सर्कल येथील प्राप्तिकर विभागाने नोटिशीत असा आरोप केला आहे की व्यापाऱ्यांना दिले जाणारे रद्दीकरण शुल्क (Cancellation Charges) प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्य नाही. तसंच, प्राप्तिकर परताव्यातील व्याज उत्पन्न कर आकारणीसाठी सादर केलेल नाही. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३० नुसार , कंपनीला एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी आयकर उपायुक्त, सेंट्रल सर्कल – १(१), बंगळुरू यांनी मंजूर केलेला आदेश प्राप्त झाला आहे,” असे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या आदेशाचा कंपनीच्या आर्थिक आणि कामकाजावर मोठा परिणाम होणार नाही. स्विगी योग्य अधिकाऱ्यांसमोर या आदेशाला आव्हान देणार आहे. “कंपनीचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे या आदेशाविरुद्ध मजबूत युक्तिवाद आहेत आणि याचिकेद्वारे कंपनीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्विगीची स्टॉक कामगिरी

गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये, स्विगीच्या शेअरची किंमत ०.८०% घसरली आहे. तर, गेल्या एका महिन्यात त्याने १.४६% परतावा दिला आहे. परंतु, नोव्हेंबर २०२४ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या शेअरने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे.