scorecardresearch

Premium

Tata Tech IPO : प्रतीक्षा संपली! टाटा कंपनीचा आयपीओ आज तब्बल २० वर्षांनंतर उघडला, टाटा टेकच्या इश्यूची सर्व माहिती एका क्लिकवर

Tata Tech चा IPO अँकर २१ नोव्हेंबर २०२३ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीने ६७ सुकाणू गुंतवणूकदारांमार्फत एकूण ७९१ कोटी रुपये उभारले आहेत.

tata technology
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

Tata Technologies IPO : जवळपास २० वर्षांनंतर टाटा ग्रुप कंपनीचा IPO उघडला आहे. याबाबत बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तुम्ही आज बुधवार २२ नोव्हेंबर २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत बोली लावू शकता. कंपनी IPO च्या माध्यमातून बाजारातून ३०४२.५१ कोटी रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. याआधी मंगळवारी कंपनीचा आयपीओ सुकाणू गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. जर तुम्हीही या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या प्राइस बँडपासून ते GMP पर्यंतच्या सर्व तपशीलांची माहिती देत ​​आहोत.

एवढी रक्कम सुकाणू गुंतवणूकदारांकडून उभी केली

Tata Tech चा IPO अँकर २१ नोव्हेंबर २०२३ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीने ६७ सुकाणू गुंतवणूकदारांमार्फत एकूण ७९१ कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीने सुकाणू गुंतवणूकदारांना ५०० रुपये प्रति शेअर दराने शेअर्स विकले आहेत. या ६७ अँकर गुंतवणूकदारांना एकूण १,५८,२१,०७१ इक्विटी शेअर्स विकले गेले आहेत.

vibhor steel tubes make bumper debuts at a premium of 181 percent over issue price
विभोर स्टील ट्यूबचे दमदार पदार्पण; गुंतवणूकदारांना १९३ टक्क्यांच्या बहुप्रसवा परतावा
gpt healthcare s ipo to open on february 22
खुणावणारा आणखी एका रुग्णालय शृंखलेचा ‘आयपीओ’; जीपीटी हेल्थकेअरची २२ फेबुवारीपासून भागविक्री 
ullu digital plan to bring ipo to raise rs 150 crore fund
‘उल्लू डिजिटल’ची १५० कोटी निधी उभारणीची योजना; एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’
15 crores fraud
मुंबई : पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू

टाटा टेक IPO चे तपशील जाणून घ्या

टाटा टेकचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे लॉन्च केला जात आहे. टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-१ आणि अल्फा टीसी होल्डिंग या आयपीओमधील त्यांचे स्टेक विकत आहेत. कंपनीने पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी ५० टक्के, गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के राखीव ठेवले आहेत. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी ६,०८५,०२७ इक्विटी शेअर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी २,०२८,३४२ इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत.

हेही वाचाः रिलायन्स इंडस्ट्रीज पश्चिम बंगालमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक करणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

किंमत बँड काय?

टाटा टेकच्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत ४७५ रुपये ते ५०० रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. याद्वारे किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी किमान ३० शेअर्स खरेदी करू शकतात. या प्रकरणात तुम्हाला किमान १५ हजार रुपये गुंतवावे लागतील. कंपनीच्या शेअर्सच्या वाटपाची तारीख २७ नोव्हेंबर २०२३ अशी निश्चित करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी BSE आणि NSE वर शेअर्स सूचीबद्ध होईल.

हेही वाचाः बायजूवर ईडीची धाड, ९ हजार कोटींचा घोटाळा पकडला

GMP किती आहे?

टाटा समूहाच्या या आयपीओला सकारात्मक वातावरण लाभलं आहे. या IPO ला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या इश्यूचा ग्रे मार्केट प्रीमियम किंवा GMP सुमारे ३५० रुपये प्रति शेअर आहे. अशा परिस्थितीत या GMP नुसार शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना बक्षीस मिळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata company ipo opens today 22 november 2023 after almost 20 years all information about tata tech issue in one click vrd

First published on: 22-11-2023 at 12:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×