मुंबई: प्रवर्तक टाटा सन्सकडून किरकोळ हिस्सा विकला गेल्याच्या वृत्तामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागांत सोमवारी सुमारे २ टक्क्यांनी घसरण झाली. कंपनीतील ०.६४ टक्के भागभांडवली हिश्शाचे प्रतिनिधित्व करणारे २.३ कोटी समभाग मंगळवारी विकण्याची प्रवर्तक योजना आखत असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजारात परिणामी समभाग अनुक्रमे १.७२ टक्के आणि १.७८ टक्क्यांनी घसरून ४,१४४ रुपयांवर स्थिरावला.

प्रति समभाग टीसीएसची विक्री किंमत ४,००१ रुपये असण्याची शक्यता असून, जी सोमवारच्या समभागाच्या बंद भावाच्या तुलनेत ३.४५ टक्के सवलतीत असेल. या विक्री व्यवहाराचे एकूण मूल्य ९,२०२ कोटी रुपयांपेक्षा जास्त राहणे अपेक्षित आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीजनंतरची टीसीएस ही दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. तब्बल ३१.६ लाख कोटी रुपयांच्या एकूण बाजारमूल्यासह, टाटा समूहातील सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेल्या २९ कंपन्यांपैकी ती एक अग्रणी कंपनी आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध माहितीनुसार, प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचा टीसीएसमध्ये ७२.४१ टक्के भागभांडवली हिस्सा आहे, ज्यापैकी ७२.३८ टक्के भागभांडवल टाटा सन्सच्या मालकीचे आहे

More Stories onबाजारMarket
मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shares of tcs down by 2 percent print eco news amy
First published on: 19-03-2024 at 04:48 IST