Nestle to cut 16000 jobs globally : गेल्या काही महिन्यांपासून अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीचा धडाका लावला आहे. या संदर्भात अनेकदा बातम्याही समोर आलेल्या आहेत. यादरम्यान स्वीस फूड कंपनी नेस्लेने गुरूवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी पुढील दोन वर्षात जगभरातील १६००० नोकऱ्या कमी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीचे नवीन सीईओ फिलिप नावरातिलल यांनी वाढ मंदावल्याच्या काळात या बदलांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जग बदलत आहे आणि नेस्लेला अधिक वेगाने बदलण्याची गरज आङे, असे नवराटिल एका निवेदनात म्हणाले आहेत. “यामध्ये कर्मचार्यांची संख्या कमी करण्यासारखे कठीण, पण आवश्यक अशा निर्णयांचा समावेश असेल,” असेही त्यांनी सांगितले.
कोणाची नोकरी जाणार?
कमी केल्या जाणाऱ्या १६००० जणांपैकी १२००० ही व्हाइट-कॉलर पदांवरील कर्मचारी असतील, ज्यामुळे कंपनीची एक अब्ज स्विस फ्रँकची बचत होणे अपेक्षित आहे, जी पूर्वीच्या नियोजित रकमेच्या दुप्पट आहे. हा निर्णय उत्पादन आणि पुरवठा साखळीमध्ये चालू असलेल्या ४,००० नोकर्यांच्या कपातीनंतर घेण्यात आला आहे. नवराटिल यांनी नेस्लेच्या बचतीचे लक्ष्य देखील वाढवले आहे. कंपनीचे पूर्वीचे उद्दिष्ट २.५ अब्ज स्विस फ्रँक होते, ते आता २०२७ पर्यंत तीन अब्ज स्विस फ्रँक इतके करण्यात आले आहे.
कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
नेस्लेच्या ९ महिन्याची कामगिरीच्या रिपोर्टमधून दिसून आले की, त्यांची विक्री १.९ टक्क्यांनी म्हणजेच ६५.९ अब्ज स्वीस फ्रँक (८३ अब्ज डॉलर्स)नी खाली गेली आहे. ऑरगॅनिक विक्रीतील वाढ (Organic sales growth) ३.३ टक्के इतकी झाली गेली आहे, जी मोठ्या प्रमाणावर २.८ टक्क्यांच्या किंमतीतील वाढीमुळे झाली आहे.
अनेक देशांमध्ये असलेल्या या कंपनीकडे २००० हून अधिक ब्रँड्सची मालकी आहे, ज्यामध्ये नेसप्रेसो, पेरियर, किटकॅट आणि पुरिना अशा ब्रँड्सचा समावेश आहे. या कंपनीला गेल्या काही महिन्यांपासून अस्थितरतेचा सामना करावा लागत आहेत. कंपनीच्या सीईओंना ऑफिसमधील संबंधांमुळे सप्टेंबरमध्ये काढून टाकण्यात आले होते, त्यानंतर लगेचच कंपनीच्या अध्यक्षांनीही मुदतीपूर्वीच पद सोडले.