कौस्तुभ जोशी

· फंड घराणे – कॅनरा रॉबेको म्युच्युअल फंड

Want to be a food vlogger Learn how to shoot cooking videos
Video : तुम्हालाही Cooking व्हिडीओ शूट करायचा आहे? झटपट शिका मोबाईल कॅमेरा हातळण्याच्या भन्नाट ट्रिक्स
viral video of Monalisa singing
चित्रातील मोनालिसा बनली रॅप गायिका! पाहा मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ App ची कमाल; Video होतोय व्हायरल….
Nail Polish making video in the process of making nail polish
तुम्ही जी नेलपॉलिश लावता ती कशी बनते माहिती आहे का? थेट फॅक्टरीतील Video एकदा बघाच
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

· फंड कधी लॉन्च झाला ? – ३० ऑगस्ट २००२.

· एन. ए. व्ही. (२२ डिसेंबर २०२३ रोजी) ग्रोथ पर्याय – ५०.३५ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता ( ३० नोव्हेंबर २०२३ रोजी)– १०८१६ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – श्रीदत्त भांडवलदार, विशाल मिश्रा.

फंडाची स्थिरता (३० नोव्हेंबर २०२३)

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर २१ %

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १३.६१ %

· बीटा रेशो ०.९३ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा : मार्ग सुबत्तेचा : वर्ष जुने गेले अन् नवे आले…!

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

हेही वाचा : Money Mantra : कोव्हिडच्या बातम्यांमुळे फार्मा शेअर्समध्ये तेजी

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

या म्युच्युअल फंड घराण्याचे अनुभवी आणि बाजाराचा दीर्घकाळ अनुभव घेतलेले श्रीदत्त भांडवलदार यांच्याकडे या फंडाची जबाबदारी आहे. तुमच्या पोर्टफोलिओतील एक ‘कोअर’ फंड असावा अशी या फंडाची रचना केली गेली आहे. आघाडीच्या सर्व सेक्टर्स मधल्या निवडक कंपन्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यात येतात.

इंडिया ग्रोथ स्टोरी अर्थात भारताची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने वाढते आहे त्याचा अंदाज घेऊन कोणत्या क्षेत्रांमध्ये कोणत्या कंपन्यांना लाभ होऊ शकतो यावरून पोर्टफोलिओ ठरवला जातो. पोर्टफोलिओतील निवडलेल्या कंपन्या त्या त्या क्षेत्रातील लीडर्स असाव्यात असा फंड मॅनेजरचा प्रयत्न असतो.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

२२ डिसेंबर २०२३ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – २०.०५ %

· दोन वर्षे – ११.२५ %

· तीन वर्षे – १६.०९ %

· पाच वर्षे – १६.७३ %

· दहा वर्षे – १४.८८ %

· फंड सुरु झाल्यापासून – १२.८७ %

हेही वाचा : वित्तरंजन: रंजक तरीही वैचारिक

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण ४७ शेअर्सचा समावेश आहे. लार्ज कॅप किंवा ब्लूचिप या प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांचा अंदाज घेतल्यास बऱ्याच फंड मॅनेजर्सनी पोर्टफोलिओमध्ये ६० ते ७० शेअर्स ठेवलेले दिसतात, याउलट या फंड योजनेमध्ये तुलनेने कमी शेअर्स दिसतात.

लार्ज कॅप ७२ % मिडकॅप ७ % आणि अन्य १४ % अशी पोर्टफोलिओची रचना आहे. पोर्टफोलिओतील पहिल्या पाच शेअर्सनी ३२ % गुंतवणूक व्यापलेली आहे तर आघाडीच्या तीन सेक्टर मध्ये पोर्टफोलिओची 38% गुंतवणूक आहे.

एचडीएफसी बँक ९.५७ % आयसीआयसीआय बँक ७.११ % रिलायन्स ५.७१ % इन्फोसिस ४.४१ %, लार्सन टूब्रो ४.७३ % भारती एअरटेल ४ % आयटीसी ३.३४ % टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ३.२३ % बजाज फायनान्स ३.७ % हे आघाडीचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये आहेत.

अलीकडेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि टेक महिंद्रा या दोन कंपन्यांचा पोर्टफोलिओमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

आघाडीच्या शंभर कंपन्यातून पोर्टफोलिओ बांधत असताना फंड मॅनेजरने खाजगी बँकांना झुकते माप दिले आहे. पोर्टफोलिओच्या २२ % गुंतवणूक आघाडीच्या पाच खाजगी बँकांमध्ये केली आहे. त्या खालोखाल कॉम्प्युटर सॉफ्टवेअर या क्षेत्रात १० % गुंतवणूक असून त्याखालोखाल एफएमसीजी. ५.३८ % वाहन निर्मिती ५.२९ % फार्मा ४.२८ % एनबीएफसी ४.२५ % अशा अन्य क्षेत्रातील कंपन्या आहेत. पोर्टफोलिओमध्ये अनावश्यक बदल न करता दीर्घकाळपर्यंत चांगले शेअर्स निवडून ते पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याकडे फंड मॅनेजर्सचा कल दिसतो.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर २९.७८ %

· दोन वर्षे १९.०८ %

· तीन वर्षे १५.३१ %

· पाच वर्षे १७.६७ %

· सलग दहा वर्ष १४.८६ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंट लाईन इक्विटी फंड

नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.