काही दिवसांपूर्वी इन्फोसिस या प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या ४ महिन्यांच्या नातवाला २४० कोटी रुपये मूल्याचे समभाग भेट म्हणून दिले. यानिमित्ताने ही भेट करपात्र आहे का? यावर कोणाला कर भरावा लागेल? हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होतो.

प्राप्तिकर कायद्यानुसार ‘भेट’ म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. भेट म्हणजे म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय संपत्तीची देवाण-घेवाण करणे. यामध्ये प्रेमापोटी, किंवा आपल्यानंतर पुढच्या पिढीला संपत्ती हस्तांतरित करण्याचे एक साधन म्हणजे भेट देणे. अशा भेटींचा करारनामा करून करदाता त्याच्या जीवन काळात आपली संपत्ती दुसऱ्यांना भेट म्हणून देऊ शकतो. यासाठी योग्य ते मुद्रांक शुल्क भरावे लागते.

pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
dharashiv, lok sabha, ranajagjitsinha patil
Maharashtra News : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार? पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा >>>Money Mantra : व्हर्च्युअल कार्ड काय असतं? ते कसं काम करतं?

पूर्वी भेट कर कायदा (गिफ्ट टैक्स ऍकट्) अस्तित्वात होता त्यानुसार भेटींवर कर आकारला जात होता. हा कायदा १९९८ मध्ये रद्द करण्यात आला. आता भेटी प्राप्तिकर कायद्याच्या कक्षेत आणल्या आहेत आणि भेटींवर प्राप्तिकर आकारला जात आहे. मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेले पैसे, स्थावर मालमत्ता किंवा ठराविक जंगम मालमत्ता भेट म्हणून समजली जाते.

स्थावर मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार असणारे मूल्य हे मोबदल्यापेक्षा (अ) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि (ब) मोबदल्याच्या १०% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी (“अ” आणि “ब” मधील जी जास्त रक्कम आहे ती) रक्कम उत्पन्नात गणली जाते.

ठराविक जंगम मालमत्ता (म्हणजे समभाग, रोखे, सोने, चांदी, दागिने, चित्रे, शिल्प, वगैरे) कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि त्याचे वाजवी बाजार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मोबदला हा वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी असेल आणि हा फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम उत्पन्नात गणली जाते.

हेही वाचा >>>Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या

याला काही अपवाद आहेत. स्थावर आणि ठराविक जंगम मालमत्ता या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अपुऱ्या मोबदल्याने किंवा मोबदल्याशिवाय हस्तांतरित केलेले सर्व व्यवहार करपात्र नाहीत. याला काही अपवाद आहेत.

लग्नात मिळालेल्या भेटी

लग्नात मिळालेल्या भेटी करपात्र नसतात. ज्या व्यक्तीचे लग्न आहे त्यांना लग्नाच्या प्रसंगात मिळालेल्या भेटी करपात्र नाहीत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त व्यक्तीना मिळालेल्या भेटी मात्र करपात्र आहेत. आपल्याकडे प्रथा आहे की मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात त्यांच्या आई-वडिलांना भेटी दिल्या जातात. त्यांना जर भेटी मिळाल्या असतील तर त्या करपात्र आहेत. लग्नसोहळा व्यतिरिक प्रसंगात मिळालेल्या भेटी करपात्र आहेत.

ठराविक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी

भेटींची करपात्रता ही भेट कोणाकडून मिळाली यावरसुद्धा अवलंबून असते. प्राप्तिकर कायद्यानुसार भेटी ठराविक नातेवाईकांकडून मिळाल्यास त्या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत. या रकमेला कोणतीही मर्यादा नाही, ठराविक नातेवाईकांमध्ये पती/पत्नी, आई/वडील, भाऊ/बहिण, पती किंवा पत्नीचा भाऊ किंवा बहिण (आणि त्यांचे पती/पत्नी), आई किंवा वडिलांचा भाऊ किंवा बहिण (आणि त्यांचे पती/पत्नी) आणि वंशपरंपरेतील व्यक्ती यांचा समावेश होतो.

प्राप्तिकर कायद्यात ठराविक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी या करपात्र नाहीत. आजोबांचा ठराविक नातेवाईकांमध्ये समावेश होत असल्यामुळे आजोबांकडून नातवाला मिळालेली भेट ही नातवाला करपात्र नाही. आजोबांनी दिलेली भेट ही नातवाला दिली असल्यामुळे भेट देणाऱ्यांना म्हणजेच आजोबांना सुद्धा ती करपात्र नाही. याला कोणत्याही रकमेची मर्यादा नाही.

भेटीवरील उत्पन्न

ठराविक नातेवाईकांना दिलेल्या भेटी, मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात हस्तांतरित केलेली संपत्ती करमुक्त आहे असे असले तरी अशा भेट दिलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न कोणाला करपात्र आहे. हे देखील महत्वाचे आहे. प्राप्तिकर कायद्यात यासाठी सुद्धा खालील तरतुदी आहेत.

पती किंवा पत्नीचे उत्पन्न

पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक किंवा इतर कारणाने पैशांचे आणि संपत्तीचे व्यवहार होत असतात. पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा अपुर्‍या मोबदल्याने एखादी संपत्ती हस्तांतरित केली असेल (भेट) तर ती भेट घेणाऱ्याला करपात्र नाही. परंतु त्या भेटीच्या संपत्तीतून मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र आहे. उदा. जर पतीने पत्नीला त्याच्या नावे असणारे घर भेट म्हणून, म्हणजेच कोणत्याही मोबदल्याशिवाय दिले पत्नीने ते घर भाड्याने दिले आणि पत्नीला या घरभाड्याच्या उत्पन्नातून ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले. भेट दिल्यानंतर हे घर जरी पत्नीच्या नावाने झाले असेल आणि भाडे पत्नीला मिळाले असले तरी हे उत्पन्न पतीलाच करपात्र आहे. कारण ही संपत्ती कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित झाली आहे. परंतु हे घरभाड्याचे पैसे पत्नीने बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आणि त्यावर तिला जे व्याज मिळेल, ते व्याज मात्र पत्नीच्या करपात्र उत्पन्नात गणले जाईल. 

हेही वाचा >>>Money Mantra: ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे काम काय?

पतीने किंवा पत्नीने विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.

अज्ञान मुलाचे उत्पन्न 

अज्ञान मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे अजाण मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो. नारायण मूर्ती यांनी दिलेली भेट त्यांना किंवा नातवाला जरी करपात्र नसली तरी त्या समभागावर मिळालेला लाभांश हा नातवाच्या (तो अज्ञान असल्यामुळे) आई किंवा वडिलांना (ज्यांचे उत्पन्न जास्त आहे) करपात्र असेल. तसेच नातवाने जर हे समभाग भविष्यात विकले तर त्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर नातवाला कर भरावा लागेल. 

सुनेचे उत्पन्न

सासू-सासऱ्यांनी सुनेला रोख रकमेच्या किंवा मालमत्तेच्या स्वरुपात भेट दिली आणि त्या भेटीतून तिला उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न सुनेला करपात्र नसून सासू किंवा सासऱ्यांना (ज्यांनी भेट दिली आहे त्यांना) करपात्र असते.

भेटींद्वारे किंवा अशा व्यवहारांद्वारे कर नियोजन करतांना विशेष काळजी घेतली पाहिजे. या तरतुदींची माहिती नसल्यामुळे अनेकदा असे व्यवहार केले जातात आणि त्यामुळे नंतर कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.  आपण केलेल्या व्यवहारांमुळे प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन तर होत नाही ना याची खात्री केली पाहिजे. प्राप्तिकर खात्याकडून मोठ्या रकमेचे असे व्यवहार तपासले जाण्याची शक्यता असते.