Life Certificate Submission Deadline : जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. पेन्शन घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात सर्व पेन्शनधारकांना त्यांच्या हयातीचा पुरावा द्यावा लागतो. नियमांनुसार, ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा मिळते. तसेच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी हे काम १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान पूर्ण करणे आवश्यक आहे.

जीवन प्रमाणपत्र अनेक प्रकारे सादर केले जाऊ शकते

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर ते लवकरात लवकर करा. अन्यथा तुम्हाला नंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांचा वापर करू शकता. ऑफलाइन, तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँक सारख्या पेन्शन जारी करणार्‍या संस्थेकडे जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. याशिवाय डोअर स्टेप बँकिंग, डिपार्टमेंट ऑफ पेन्शनर्स वेल्फेअर (DoPPW) फेस ऑथेंटिकेशन, उमंग अॅप, पोस्टमन ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) आणि जीवन प्रमाण पोर्टलद्वारे तुम्ही तुमचा हयातीचा दाखला सहजपणे कोणत्याही अडचणीशिवाय सबमिट करू शकता.

हेही वाचाः PM किसान योजनेचा पुढील हप्ता ‘या’ महिन्यात येणार, अशा पद्धतीनं घ्या लाभ

जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय?

केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे की नाही हे यावरून कळते. तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाल्यास पेन्शन जारी करणारी संस्था अशा पेन्शनधारकांची पेन्शन थांबवते.

हेही वाचाः वर्ल्डकप गमावला पण विक्रमी प्रेक्षकसंख्या कमावली; भारतात ४२२ अब्ज मिनिटे पाहिला गेला टीव्ही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेन्शन बंद झाल्यावर काय होणार?

नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने नोव्हेंबरमध्ये आपले जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्याला डिसेंबर २०२३ पासून पेन्शन मिळणे बंद होणार आहे. त्यानंतर जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच पेन्शन मिळेल. तुम्ही डिसेंबरऐवजी जानेवारीमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केल्यास तुम्हाला जुन्या महिन्याची पेन्शनची थकबाकी मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची पेन्शन मिळणे सुरू ठेवायचे असेल तर नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करा.