युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजेच ‘युलिप’ ही विमा कंपन्यांनी तयार केलेली ‘विमा व गुंतवणूक’ केंद्रित योजना आहे. गुंतवणूकदारास गुंतवणुकीवरील परताव्या व्यतिरिक्त विम्याचे कवच देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. गुंतवणूकदाराने दिलेल्या गुंतवणुकीच्या हप्त्याचा काही भाग विम्याचे कवच देण्यासाठी वापरला जातो तर उर्वरीत भाग विविध इक्विटी व डेट फंडामध्ये गुंतविला जातो.

या योजनेतील विमा प्रामुख्याने गरजेच्या वेळी आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, परंतु हा विमा गुंतवणूक घटक सामान्यत: इतर बाजार-चलित इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा परताव्याच्या निकषावर नेहमीच कमी लोकप्रिय असल्याने पारंपारिक विमा संरक्षण योजना, आर्थिक जोखीम सुरक्षा जाळे प्रदान करताना, झालेल्या गुंतवणुकीवर भरीव उत्तम परतावा देण्यासाठी कुचकामी ठरत असतो, असा कायमचा अनुभव आहे. तथापि, जेव्हा वैयक्तिक निवडलेली गुंतवणूक योजना विम्याद्वारे संरक्षित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा, करदात्या व्यक्तींना आर्थिक विमा जोखीम संरक्षण आणि उच्च परताव्याच्या शोधात कोणत्यातरी एकाची निवड करण्याच्या अशा क्लिष्ट समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे जे गुंतवणूकदार उच्च परतावा आणि कर बचतीचा दुहेरी फायदा घेऊ इच्छितात अशा गुंतवणूक योजनाचा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी या योजनेतील घटकाद्वारे अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले गेले आहे.

The Hindustan Urvarak And Rasayan Limited Apply Online for 80 Various Posts Vacancies Check all the detailed
HURL Recruitment 2024 : एचयूआरएल अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती; महिना १६ लाख पगार; जाणून घ्या शेवटची तारीख
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

हेही वाचा…Money Mantra : फंड विश्लेषण – पी.जी.आय.एम. इंडिया लार्ज कॅप फंड

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलीप्स) – एक आर्थिक गुंतवणूक योजना आहे जी या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एक आकर्षक पर्याय म्हणून गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरते आहे. युलिप विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचे घटक एकाच एकात्मिक योजनेत एकत्रित करून ही दरी भरून काढतात. याचा आणखी एक फायदा म्हणजे ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड विविध प्रकारची तंत्रे वापरून गुंतवणूक करतात तद्वत या विमा कंपन्या त्यांच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार डेट व इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकदाराने किमान तीन वर्षे डेट की इक्विटी मध्ये भाग घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा असतो किंबहुना तो नंतर बदलताही येऊ शकतो. योग्य बदलाची वेळ साधणारा गुंतवणुकदार उत्तम परतावा घेऊ शकतो हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. तथापि, डेट फंडात गुंतविलेल्या रक्कमेचा परतावा कमी असतो पण खात्रीशीर असतो, तर इक्विटी मध्ये गुंतविलेल्या रक्कमेचा परतावा काहीही असू शकतो हे गुंतवणूकदाराने लक्षात ठेवले पाहिजे.

उच्च परतावा देण्याची क्षमता असणारी योजना

युलीपचे मुख्य आकर्षण म्हणजे वाढीव परतावा मिळण्याची असलेली गुंतवणुकीची क्षमता. विमा हप्त्याचा काही भाग मार्केट-लिंक्ड फंडांमध्ये गुंतवला जात असल्याने मिळणारा, परतावा या फंडांच्या उच्च कामगिरीशी जोडला जातो. दीर्घ कालावधीसाठी, पर्याय असणारी युलीप्स मधील इक्विटी गुंतवणुकीमध्ये भरीव परतावा देण्याची क्षमता राखून असते, ज्यामुळे त्यांची संपत्ती वाढवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक आकर्षक केंद्रबिंदू ठरतो. उदाहरणार्थ, विमा कंपनीच्या युलिप पॉलिसी ‘संपूर्ण निवेश’ सह, गुंतवणुकीचा परतावा ऑप्टिमाइझ करण्यासाठी १० किंवा अधिक फंडांमधून निवड करावी लागते जी चांगला परतावा देण्यास मदत करते.

हेही वाचा…Money Mantra : क्षेत्र अभ्यास : माहिती तंत्रज्ञान उद्योग – नवीन व्यावसायिक आणि गुंतवणूक संधी

कर सवलत हे पण एक आकर्षण

युलिपचा विचार केल्यास कर सवलत हे पण एक आकर्षण आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, युलीप्स साठी भरलेला हप्ता वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या कलम ८०सी अंतर्गत उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र आहे. याव्यतिरिक्त, युलीप्स मधून मिळणारी मुदतपूर्ती नंतरची रक्कम कलम १०(१०डी) अंतर्गत प्राप्तीकर कायद्याच्या २०२१ च्या दुरुस्तीच्या अधीन राहून कर आकारणीतून मुक्त आहे, जर वार्षिक प्रीमियम विमा रकमेच्या १०% पेक्षा जास्त नसेल. हा दुहेरी कर लाभ संपत्ती निर्मितीसह कर कार्यक्षमता शोधणाऱ्या व्यक्तींसाठी युलीप्स ला एक आकर्षक पर्याय बनवतो.

आंशिक पैसे काढण्याची लवचिकता

पॉलिसी कालावधीत युलीप्सद्वारे ऑफर केलेल्या लवचिकतेचा देखील गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो. बदलत्या आर्थिक गरजा आणि बाजाराच्या परिस्थितीच्या आधारावर ते आंशिक पैसे काढू शकतात किंवा निधीमध्ये बदल करू शकतात. ही लवचिकता गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखीम सहनशीलतेनुसार आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार त्यांच्या गुंतवणूक धोरणाशी जुळवून घेण्यास अनुमती देते.

हेही वाचा…Money Mantra : गुंतवणुकीतील जोखमा आणि सामर्थ्य

परतावा समजून घेणे

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलीप्स) मधील गुंतवणुकीचा विचार करताना, अपेक्षित परतावा समजून घेणे महत्त्वाचे आहे. निश्चित परताव्याच्या विपरीत, युलीप्स परतावा निवडलेल्या गुंतवणूक निधीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. इक्विटी फंड मोठ्या परताव्याच्या संभाव्यतेसह उच्च अस्थिरता दर्शवतात, तर डेट फंड तुलनेने कमी परताव्यासह स्थिरता देतात. शिवाय, निवडलेल्या निधीच्या मागील कामगिरीचे संशोधन करणे देखील महत्त्वाचे आहे. भूतकाळातील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत ​​नसले तरी, हे विश्लेषण फंडाच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये अंतर्दृष्टी प्रदान करते.

इतर फायदे

करदात्याने गुंतवणुकीत विविधता आणण्याचे फायदेही आहेत. युलिप्स सामान्यत: विविध फंड पर्याय सादर करतात, प्रत्येक वेगळ्या जोखीम-परताव्या प्रोफाइलसह. या पर्यायांमध्ये गुंतवणुकीचे वैविध्य आणल्याने जोखीम वितरीत करण्यात आणि एकूण परतावा वाढवण्यास मदत होते. काही कंपन्या संपूर्ण निवेश युलिप पॉलिसी पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीच्या कार्यकाळात कोणत्याही वेळी गुंतवणूक करत असलेल्या फंडापेक्षा एखादा विशिष्ट फंड अधिक फायदेशीर ठरू शकतो असे वाटत असल्यास त्यांना फंड स्विच करण्याचा पर्याय प्रदान करते.

दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी तयार केलेले, युलिप्स अल्पकालीन बाजारातील चढउतार अनुभवू शकतात. एक स्थिर, दीर्घकालीन धोरण गुंतवणुकीच्या मूल्यावरील या चढउतारांचा प्रभाव कमी करू शकते.काही विमा कंपन्या संपूर्ण निवेश योजनेसह, एखाद्याला त्याच्या वेळेच्या क्षितिजावर आणि जोखमीच्या क्षमतेनुसार प्लॅनचा कालावधी तसेच गुंतवणूक करू इच्छित असलेल्या फंडाची निवड करण्यात लवचिकता मिळते.

हेही वाचा…Money Mantra : करावे कर समाधान – नवीन करप्रणाली : गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळते?

२०२१च्या अर्थ संकल्पानंतर योजनेत झालेले बदल

२०२१ च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांसाठी करमुक्त मिळणाऱ्या व्याजाच्या स्त्रोतावर मर्यादा आल्या आहेत. १ एप्रिल २०२१ पासून युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) या गुंतवणूक योजनांमध्ये मध्ये अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त होणाऱ्या गुंतवणूकीवर मिळालेल्या व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जात आहे. त्यापूर्वी भारतात लोकप्रिय असणाऱ्या या योजनेचे मिळणारे सर्व उत्पन्न कलम १०(१०डी) अंतर्गत सध्या पूर्णतः करमुक्त होते. या योजनेत मिळणारे उत्पन्न करमुक्त असावे यासाठी गुंतवणूकीचा गाभा जीवन विम्याशी निगडीत ठेवण्यासाठी कालावधी किमान दहा वर्षे निश्चित करण्यात आला होता तो आता बदलला आहे. याखेरीज आपत्कालीन व्यवस्थेसाठी पॉलिसीची अंमलबजावणी झाल्यानंतर पाच वर्षांनी प्री-मॅच्युरिटी कर-मुक्त रक्कम मिळू शकेल अशी तरतूद या योजनेत आहे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

विमा कंपन्यांनी मुदत पूर्ण करणाऱ्या विमा पॉलिसीतून मिळालेल्या गुंतवणूकीतील फायद्याची कर टाळण्यासाठी उच्च निव्वळ किमतीच्या व्यक्तींसाठी योजना तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पळवाट बंद करण्याचा विचार या दुरुस्तीत करण्यात आला आहे. नवीन बदलानुसार युलिपच्या बाबतीत, ३१ जानेवारी २०२१ नंतर एक किंवा अनेक पॉलिसीच्या कालावधीत कोणत्याही आर्थिक वर्षात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम एकत्रित दिला असल्यास, मुदतपूर्ती नंतर किंवा मुदतपूर्व रक्कम मिळाल्यास किंवा घेतल्यास येणारी उत्पन्न रक्कम करपात्र होणार आहे.

हेही वाचा…Money Mantra: बजेट आणि आठवड्याचे बाजार गणित

याखेरीज सदर उत्पन्न भांडवली नफा म्हणून करपात्र होण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर गुंतवणुकीस इक्विटी-केंद्रित म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीच्या दर्जाशी समतुल्य ठरविण्यात आल्याने दीर्घकाली भांडवली नफा झाल्यास कलम ११२ ए अंतर्गत त्यातील एक लाख रुपयांचे करमुक्त उत्पन्न सोडून बाकीच्या उत्पन्नावर १० टक्के दराने कर आकारणी होईल. या योजनेतील गुंतवणूक जरी ‘भांडवली मालमत्ता’ मानली गेली असली तरी महागाई वाढीचा फायदा देणाऱ्या इंडेक्सेशनचा फायदा देण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे कारण करदर केवळ १०% आहे. जर अल्पकालीन भांडवली नफा झाल्यास करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या गटवारीच्या दराप्रमाणे आकारणी होणार आहे. मात्र करदात्याच्या मृत्यूच्या वेळी प्राप्त रकमेची करमाफी म्हणजे पूर्णतः करमुक्त असणे कायम राहणार आहे.

हेही वाचा…Money Mantra: क्रेडिट कार्डाचे किती प्रकार असतात? 

जर, युलिपच्या करमुक्त फायद्यांचा आनंद आजही घ्यायचा असेल तर गुंतवणूकदारांना अशी युलिप लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करावी लागेल जेथे वार्षिक प्रीमियम विमा राशीच्या १०% पेक्षा जास्त नसेल व प्रीमियमची वार्षिक रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल. सदर योजनेतील उत्पन्न आजही पूर्णतः करमुक्त आहे. युलिपची मुदत १० वर्षे किंवा अधिक असल्यास योजनांमधील नवीन तरतुदी १ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार आहेत तर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत देण्यात आलेल्या यूलिप्सवर या बदलाचा परिणाम होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ४५ वर्षानंतर या योजनेतील सहभाग जरा महाग होतो तो टाळावा कारण वाढत्या वयाबरोबर विम्याचा हप्ता वाढत असल्याने गुंतवणूक राहणारी रक्कम कमी होते असे निदर्शनास आलेले असल्याने वयाचा विचार करून या योजनेत गुंतवणूक करावी. कलम ८० सी अंतर्गत उत्पन्नातून तेव्हढ्या रक्कमेची वजावट मिळेल व ते फायद्याचे ठरावे हप्त्याने पैसे भरण्याची सोय असणाऱ्या या अडीच लाख रुपयांपर्यंत हप्ता असणाऱ्या या योजनेत मिळणारे सर्व उत्पन्न करमुक्त असते तर गुंतविलेली रक्कम कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट होण्यासाठी पात्र असते हे महत्वाचे. या योजनेत फायदेशीर सहभाग कायम ठेवायचा असेल तर गुंतवणुकीचा कालावधी दीर्घकालीन असायला हवा हे मात्र नक्की.