गेल्या आठवड्यापासून शेअर बाजाराची सुरू असलेली रोलर कोस्टर राईड बघता अनेक गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

· पैसे गुंतवू का नको ?

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..

· पैसे गुंतवायचे ठरवले तर किती गुंतवायचे ?

· चांगले प्रॉफिट मधले शेअर्स विकायचे का नाही ?

· सगळे शेअर्स विकून पोर्टफोलिओ रिकामा करायचा का ?

असे एक ना एक अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. याचीच उत्तरे देण्याचा आजच्या लेखातून प्रयत्न केला आहे. शेअर बाजारात ‘नव्याने एन्ट्री’ घेतलेल्या गुंतवणूकदाराला मागच्या सहा महिन्यात मार्केट खालच्या दिशेने जातंय हे बघायची मुळी सवयच नाही ! सप्टेंबर-ऑक्टोबर अखेरीस थोडेसे नकारात्मक वातावरण दिसले मात्र त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने नवनवीन उच्चांकांना स्पर्श करायला सुरुवात केली. याच सुमारास ‘हात लावीन त्याचे सोने’ याप्रमाणे ‘आयपीओ दिसला की त्यातून पैसे’ असाही अनुभव गुंतवणूकदारांना आला आहे आणि म्हणूनच शांतचित्ताने पुन्हा एकदा गुंतवणुकीचे एबीसीडी तपासून पाहणे आवश्यक झाले आहे. गुंतवणुकीचे नियम कोणते ?

उद्दिष्ट अनुरूप गुंतवणूक (Goal Oriented Investment) – तुम्हाला गुंतवणूक नक्की कोणत्या उद्दिष्टाने करायची आहे ? हे तुमचे उद्दिष्ट कागदावर लिहून तयार हवे. त्यामुळे गुंतवणूक कुठे करायची याचा निर्णय घेणे सोपे जाते.

गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची ? जर तुमची ध्येयं अल्पकालीन असतील तर तुम्ही सरसकट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे हा शहाणपणा ठरत नाही. पण तरीही तुम्ही जोखीम पत्करून गुंतवणूक करायची ठरवली असेल तर तुमचा पोर्टफोलिओ कसा असावा ? याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो.

हेही वाचा : ‘सेबी’च्या तपासातून झी प्रवर्तकांच्या अडचणीत आणखी वाढ; समभागांची ३३ टक्क्यांनी घसरगुंडी

इक्विटी गुंतवणूक नक्की कोणत्या शेअर्समध्ये ? स्मॉलकॅप आणि मिडकॅप मध्ये अल्पकाळात भरपूर फायदा मिळावा यासाठी गुंतवणूक करण्याकडे कल दिसतो.

गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांनी शेअर्सच्या खरेदी विक्रीबाबतीत एक मंत्रच दिला आहे

‘ज्यावेळी सगळे शेअर्स विकत असतात म्हणजेच विक्रीचा सपाटा लागलेला असतो त्यावेळी लॉन्ग टर्मचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स निवडलेले प्रत्येक पडझडीमध्ये विकत घेतले पाहिजे.’

पोर्टफोलिओमध्ये किती शेअर असावेत?

साधारणपणे नव्याने गुंतवणुकीच्या मैदानात उतरला असाल तर दहापेक्षा जास्त शेअर्सचा पोर्टफोलिओ टाळा. तुमच्याकडे असलेले पैसे मिड स्मॉल आणि लार्ज या सर्व शेअर्समध्ये एका वेळेला गुंतवणूक म्हणून पार्क करता येणे अशक्य आहे हे आधी मनाशी समजून घ्या.

उदाहरणार्थ पाच लाख रुपये गुंतवणूक करायची इच्छा असलेल्या व्यक्तीला मारुती सुझुकी, एल अँड टी, माईंडट्री, लार्सन, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, ब्रिटानिया, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, अपोलो हॉस्पिटल असे दहा शेअर्स घ्यायला सांगितले तर पाच लाखातील जवळपास सगळी रक्कम संपून जाईल.

हेही वाचा : Money Mantra: कमी जोखीम अन् चांगल्या परताव्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना निवडा, इंडेक्स फंडांबद्दल A टू Z जाणून घ्या

तुम्ही शेअर्स लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणार असाल तर मार्केट अचानकपणे पडले तरी तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. बिझनेस सायकलच्या अप आणि डाऊन दिशेकडील वाटचालीमुळे हे होणे अपरिहार्य असते. पण जर तुम्ही दोन ते तीन महिन्यासाठीच गुंतवणूक करणार असाल तर फक्त कंपनीचा नफा-तोटा बघण्यापेक्षा टेक्निकल ऍनालिसिसच्या माध्यमातून चार्ट बघणे अत्यावश्यक आहे. त्यावरून तुम्हाला अल्प आणि मध्यम काळातील शेअरचा कल दिसून येतो.

Averaging करणे – समजा एखादा शेअर तुम्ही बाराशे रुपयांना विकत घेतला आणि तो घसरून ७०० रुपयापर्यंत आला तर तुम्ही प्रत्येक वेळी खिशातील पैसे घालून शेअर विकत घेणे फारसे शहाणपणाचे नाही. अशावेळी तो शेअर का पडतो आहे ? त्याच्या बिजनेस मॉडेलला काही धोका निर्माण झाला आहे का ? कोणत्या सरकारी धोरणाचा कंपनीवर नकारात्मक परिणाम होणार आहे का ? याचा तातडीने अभ्यास करून आपली दिशा बदलायला हवी.

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि तुमचे उद्दिष्ट शॉर्ट टर्म आहे अशावेळी सतत दोन आठवडे बाजार निगेटिव्ह क्लोजिंग मध्ये बंद झाले तर त्यातील निम्मे शेअर्स विकून झालेला नफा तरी वसूल करावा अशी रणनीती आखता येते. हा निर्णय तुमच्याकडे किती शेअर्स आहेत यावर नक्कीच अवलंबून असतो.

शेअर बाजाराला आजमावण्यापेक्षा आणि तो कुठे जाईल ? याचे भविष्य वर्तवण्यापेक्षा त्याला ‘फॉलो करा’ तो जसा वर खाली जाईल तशा तुमच्या गुंतवणूक विषयक स्ट्रॅटेजी मध्ये बदल करा.