इक्रा लिमिटेड (बीएसई कोड ५३२८३५)
वेबसाइट: www.icra.in
प्रवर्तक: मूडीज इन्वेस्टर सर्व्हिसेस, यूएसए
बाजारभाव: रु. ६२५०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पतमापन संस्था
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९.६५ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)प्रवर्तक ५१.८६
परदेशी गुंतवणूकदार ८.६६बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २४.३८
इतर/ जनता १५.२०
पुस्तकी मूल्य: रु. १०९१
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: ६००%
प्रति समभाग उत्पन्न: रु.१८३.३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३४.१
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३४
डेट इक्विटि गुणोत्तर: ०.०१
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ५८
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): २३.१%
बीटा: ०.६
बाजार भांडवल: रु. ६०३२ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७७००/५०८८
गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने
आयसीआरए लिमिटेडची अर्थात ‘इक्रा’ची स्थापना १९९१ मध्ये आघाडीच्या वित्तीय/गुंतवणूक संस्था, वाणिज्य बँका, वित्तीय सेवा कंपन्यांनी एक स्वतंत्र आणि गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी अर्थात पतमानांकन संस्था म्हणून केली. ‘मूडीज’ या जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीची ‘इक्रा’ ही उपकंपनी असून भारतातील सर्वात अनुभवी पत मानांकन संस्थेपैकी एक आहे. कंपनी वाणिज्य बँका, बिगर-बँकिंग वित्त कंपन्या, वित्तीय संस्था, उत्पादन कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि नगरपालिका, इतरांद्वारे जारी केलेल्या कर्ज साधनांचे मानांकन करते. कंपनी मुख्यत्वे मानांकन, व्यवस्थापन सल्लागार, माहिती सेवा आणि ‘आउटसोर्सिंग’ इत्यादीं व्यवसायात कार्यरत आहे. या खेरीज कंपनी अर्थव्यवस्था, उद्योग आणि कंपन्यांमध्ये संशोधन सेवा प्रदान करते. ती व्यवसाय आणि नफा क्षमतेचा दृष्टिकोन, उद्योग विश्लेषण, स्पर्धात्मकता, नियामक वातावरण इत्यादींमध्ये सखोल विश्लेषण प्रदान करणाऱ्या अहवालांसह ६० उद्योगांचे संशोधन करते. कंपनीकडे सुमारे ३३ वर्षांचा अनुभव असून आणि चारशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी नवी दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळूरु, हैदराबाद आणि पुणे येथे असलेल्या भारतभरात १३ कार्यालयांद्वारे कार्यरत आहे.
आपल्या इतर सेवांचा विस्तार करण्यासाठी कंपनीने ‘इक्रा अनॅलिटिक्स’, ‘इक्रा ईएसजी रेटिंग्स’, ‘इक्रा नेपाळ’ आणि डी२के टेक्नॉलॉजीज या चार उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीने मानांकन, संशोधन आणि इतर सेवांमधून ६१ टक्केतर संशोधन आणि अनॅलिटिक्समधून ३९ टक्के महसूल मिळवला आहे.गुंतवणूक
३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत, कंपनीने एकत्रित आधारावर एकूण १,०८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात ७१ टक्के गुंतवणूक म्युच्युअल फंडात असून २६ टक्के गुंतवणूक मुदत ठेवींमध्ये आहे.कंपनीने सरलेल्या जून तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यंदाच्या तिमाहीत तिने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने १२५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४२.४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १९ टक्क्यांहून अधिक आहे.उत्तम उत्पादनांचा मोठा पोर्टफोलियो, अनुभवी प्रवर्तक आणि कुठलेही कर्ज नसलेली ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटते. सध्या ६,२५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक उत्तम दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक ठरू शकेल. शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com