या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे मे महिन्याच्या उत्तरार्धातच पाऊस सुरू झाला, जो अजूनही कोसळतच आहे.. त्यामुळे यावर्षी ‘ऑक्टोबर हिट’ असेल का इथपर्यंत शंका येते. हा निसर्गाचा लहरीपणा. तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांचा तऱ्हेवाईकपणा. अस्मानी, सुलतानी संकटाचा ल.सा.वि. हा लहरीपणापासून तऱ्हेवाईकपणापर्यंतची हवालदिल अवस्थाच जणू. येथे कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल, तर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल. यातून मार्ग कसा काढायचा त्याचा आज विचार करूया.
गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकाला २४,५०० चा भरभक्कम आधार असेल. सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी निफ्टी निर्देशांकाने २४,५८७ चा नीचांक नोंदवला आणि तेथून निर्देशांकावर सुधारणा सुरू झाली. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकावर २४,९२०, २५,०५० आणि २५,१५० हे तेजीच्या / वरील दिशेने वाटचालीतील भरभक्कम अडथळे असतील. निफ्टी निर्देशांकाने वरील टप्पे पार करत तो २५,३५० च्या वर पंधरा दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकावर शाश्वत तेजी सुरू होईल. त्या स्थितीत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २५,५०० ते २५,८०० असेल.
निफ्टी निर्देशांक २५,००० च्या स्तरावर सातत्याने टिकण्यास अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २४,५००, २४,१५० ते २३,८०० असे असेल.
निकालपूर्व विश्लेषण
१) टीसीएस लिमिटेड
३ ऑक्टोबरचा बंद भाव: २,९०२.१५
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, ९ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,८५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,८५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,२५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,८५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, २,७०० रुपयांपर्यंत घसरण
२) आनंद राठी वेल्थ लिमिटेड
३ ऑक्टोबरचा बंद भाव: २,८७७ रु.
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, १३ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,७५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,०५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, २,४०० रुपयांपर्यंत घसरण
३) पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड
३ ऑक्टोबरचा बंद भाव : ५,०७०.५५ रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, १४ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ४,८०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ४,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,२०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,५०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ४,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, ४,५०० रुपयांपर्यंत घसरण
४) एंजल वन लिमिटेड
३ ऑक्टोबरचा बंद भाव: २,२०१.४५ रु.
तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, १५ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,१०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,५०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, १,९०० रुपयांपर्यंत घसरण
५) भारत बिजली लिमिटेड
३ ऑक्टोबरचा बंद भाव : ३,२९३.६० रु.
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, १६ ऑक्टोबर
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३,१०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ३,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,८०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ३,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, २,८०० रुपयांपर्यंत घसरण
(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.)
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.