सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड (बीएसई कोड ५०४६१४)

संकेतस्थळ : http://www.seml.co.in

प्रवर्तक: कमाल किशोर सारडा

बाजारभाव: ५७४/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: स्टील आणि ऊर्जा

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३५.४४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७३.१६

परदेशी गुंतवणूकदार ३.८३

बँक/ म्युच्युअल फंड / सरकार ३.८१

इतर/ जनता १९.२०

पुस्तकी मूल्य: रु. १७८

दर्शनी मूल्य: रु.१/-

लाभांश: १००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २६.५५

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २१.६

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३.३

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.४६

इंट्रेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५.९३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (आरओसीई): १५.३

बीटा : १.१

बाजार भांडवल: रु. २०,२२३ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६३९/३८४

गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने

वर्ष १९७३ मध्ये स्थापन झालेली, सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड (एसईएमएल) ही सारडा समूहाची प्रमुख कंपनी आहे. कंपनी मुख्यतः स्टील, फेरो मिश्र धातू आणि ऊर्जा उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे.

उत्पादन पोर्टफोलिओ आणि उत्पादन क्षमता

१) स्टील उत्पादने: कंपनी वायर रॉड्स, एचबी वायर्स, फेरो अलॉय, स्पंज आयर्न आणि बिलेट्स इत्यादींसह लांब स्टील उत्पादनांची एकात्मिक स्टील उत्पादक असून कंपनीचा रायपूर, छत्तीसगड येथे उत्पादन प्रकल्प आहे.

प्रकल्प उत्पादन क्षमता पुढीलप्रमाणे:

पिलेट्स: ९ लाख मेट्रिक टन

स्पंज आयर्न: ३.६ लाख मेट्रिक टन

बिलेट्स: ३ लाख मेट्रिक टन

वायर रॉड: २.५ लाख मेट्रिक टन

एचबी वायर: ०.४५ लाख मेट्रिक टन

२) फेरो अलॉय: एसईएमएल भारतातील मॅंगनीज-आधारित फेरो अलॉयच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक असून कंपनीचे विशाखापट्टणम आणि रायपूर येथे २ उत्पादन प्रकल्प आहेत, ज्यांची एकूण क्षमता १४७ एमव्हीए आहे.

३) वीज: कंपनी कॅप्टिव्ह वापरासाठी ७६१.५० मेगावाॅट औष्णिक वीज आणि १४१.८० मेगावाॅट जलविद्युत प्रकल्प चालवते. विस्तारीकरणासाठी गेल्या वर्षी कंपनीने एसकेएस पॉवर ताब्यात घेतली आणि छत्तीसगडमधील ६०० मेगावॅटचा व्यावसायिक औष्णिक वीज प्रकल्प तिच्या पोर्टफोलिओमध्ये जोडला. याखेरीज कंपनी आपली एसपीव्हीमार्फत एमबीपीसीएल आणि पार्वतीया पॉवर लिमिटेड यांच्या माध्यमातून जलविद्युत प्रकल्प राबवत आहे. छत्तीसगड येथे कंपनी ५० मेगावाॅटचा सोलार प्रकल्प उभारत आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. तसेच छत्तीसगडमधील रेहर नदीवर कंपनीने २४.९ मेगावाॅटचा हायब्रिड पॉवर प्रकल्प उभारला आहे, तसेच कोटावेरा येथील आणखी एक २४.९ मेगावाॅटचा प्रकल्प सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

४) खाणकाम : एसईएमएलची छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे १.५ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेची कॅप्टिव्ह लोहखनिज खाण आणि छत्तीसगडमधील गारे पाल्मा येथे १.६८ दशलश मेट्रिक टन क्षमतेची कोळसा खाण चालवते. कोळसा खाणीच्या उत्पादन क्षमतेत पुढील आर्थिक वर्षात भरीव वाढ अपेक्षित आहे. मे २०२५ मध्ये कंपनीला महाराष्ट्रातील सूरजगड येथील आयर्न ओर खाणीचे कंत्राट मिळाले आहे.

विस्तार प्रकल्प

कोळसा: कंपनी तिच्या गारे पाल्मा कोळसा खाणीची क्षमता आर्थिक वर्ष २५ पर्यंत १.८ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढवत आहे, ५.२ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत आणखी विस्तार करण्याची मान्यता घेण्याची योजना आहे आणि १३.४ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाचा साठा आणि ०.६ दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या मध्य प्रदेशातील शाहपूर पश्चिम कोळसा खाणीला आर्थिक वर्ष २०२५ मध्ये उघडण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. बारटुंगा खाणीला तिच्या डीपीआर आणि खाण योजनेसाठी मंजुरी अपेक्षित आहे.

यंदाच्या पहिल्या तिमाहीत एसईएमएल उलाढालीत ७६ टक्के वाढ नोंदवून १,७१३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४३७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल १२० टक्क्यांनी अधिक आहे. गेली अनेक वर्षे कंपनीने कामगिरीत सातत्य दाखवले आहे. कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी असून ती अजून वाढेल अशी अपेक्षा आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी वाढीव उत्पादन क्षमतेने काम करेल अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता आणि तुलनेत अल्प कर्ज असलेली सारडा एनर्जी एक फायद्याची गुंतवणूक ठरू शकेल.

चार वर्षांपूर्वी याच सदरातून ७७० रुपयांना (त्या वेळी दर्शनी किंमत १० रुपये) सुचवलेला हा शेअर ज्या वाचक गुंतवणूकदारांनी खरेदी केला असेल, त्यांनी या गुंतवणुकीवर आतापर्यंत ७१० टक्के नफा कमावलेला आहे. परंतु अजूनही सद्यकिमतीत खरेदी करून ठेवावा असा हा शेअर आहे.शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

Stocksandwealth@gmail.com

वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.