शेअरबाजारात समभागाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. ही खरेदी-विक्री कोणत्या प्रकाराने होते यावर त्याची करपात्रता ठरते. शेअर्सची खरेदी-विक्री, शेअर्सची डिलिव्हरी न घेता ते परस्पर विकणे, फ्यूचर आणि ऑप्शन्स (एफ. आणि ओ) असे व्यवहार शेअर बाजारामार्फत केले जातात. या प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कर भरावा लागतो किंवा तोटा इतर उत्पन्नातून वजा करण्यासाठी किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत.

शेअरबाजारात जे व्यवहार केले जातात त्यामध्ये गुंतवणूक (दीर्घ किंवा अल्प मुदतीची), समभाग खरेदी विक्रीचा व्यवसाय, फ्यूचर आणि ऑप्शन्स (एफ. आणि ओ), वगैरेंचा समावेश होतो. या प्रत्येक प्रकारात करविषयक नियम वेगळे आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने दोन प्रकारात विभागले जातात.

Investment opportunities in FMCG
बदलत्या बाजाराचे लाभार्थी; ‘एफएमसीजी’मधील गुंतवणूक संधी
Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

ज्या समभागांची डिलिव्हरी घेतली जाते : समभागामध्ये ट्रेडिंग हा व्यवहार “गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न म्हणजेच भांडवली नफा” किंवा “उद्योग- व्यवसायातील उत्पन्न” मध्ये दाखवायचा हा संभ्रम करदात्यांच्या मनात नेहमी येतो. या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नासाठी कररचना वेगवेगळी तर आहेच त्याशिवाय प्राप्तिकर कायद्यातील इतर तरतुदींचे (लेखे ठेवणे, त्याचे लेखा परीक्षण करणे, वगैरे) पालन सुद्धा यावर अवलंबून आहे. कोणते व्यवहार “गुंतवणूक” आहेत आणि कोणते “उद्योग-व्यवसायाचे उत्पन्नात” गणावे? याला काही निकष आहेत का? काही करदाते नियमितपणे शेअर्स खरेदी-विक्री व्यवहार करतात तर काही अल्प किंवा दीर्घमुदतीची गुंतवणूक करतात. या दोन्हीसाठी भरावा लागणारा कर वेगवेगळा आहे. करदात्याने आपल्या व्यवहारांच्या केलेल्या विभाजनावर प्राप्तिकर खात्याकडून हरकत घेतली जात होती.

हेही वाचा.. Money Mantra: प्रोडक्ट-मार्केट फिट म्हणजे काय?

यावर न्यायालयाने वेळोवेळी निवाडे देखील दिलेले आहेत. तरीही प्राप्तिकर अधिकारी आणि करदाता यामध्ये वाद सुरूच होते. यावर तोडगा म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २०१६ मध्ये एका परिपत्रकाद्वारे यात सुसूत्रता आणली. यामध्ये करदात्याला मुभा देण्यात आली की त्याने शेअरबाजारातील सूचीबद्ध शेअर्स आणि सिक्युरिटीजचे व्यवहार “गुंतवणूक” म्हणून केले आहेत का “उद्योग-व्यवसाय” म्हणून केले आहेत हे ठरवावे. यावर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून वाद निर्माण केला जाणार नाही. परंतु करदात्याने घेतलेल्या निर्णयात सातत्य असणे गरजेचे आहे.ज्या समभागाची खरेदी, नफा मिळविण्याच्या उद्देशाने केली आहे असे व्यवहार उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून समजले जातात आणि ज्या समभागाची खरेदी लाभांश मिळविण्याच्या आणि भांडवली वृद्धी या उद्देशाने केली आहे असे व्यवहार “भांड्वली नफा” या उत्पन्नाच्या स्त्रोतात गणले जातात. शिवाय यामध्ये करदात्याने एका दिवसात किंवा काळामध्ये किती व्यवहार यावर केले यावर सुद्धा हे अवलंबून असते. करदात्याला आपले उत्पन्न कोणत्या स्त्रोतात करपात्र आहे हे जाणून घेतले पाहिजे.

“भांडवली नफ्याच्या” अंतर्गत भरावा लागणारा कर हा सवलतीच्या दरात आहे. करदात्याने आपले व्यवहार गुंतवणूक म्हणून समजल्यास त्यावर होणारा नफा हा भांडवली नफा म्हणून समजला जातो. हा नफा अल्पमुदतीचा किंवा दीर्घमुदतीचा असू शकतो. शेअर्स खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांच्या पेक्षा जास्त कालावधीनंतर विकल्यास त्यावर होणारा नफा हा दीर्घमुदतीचा भांडवली नफा समजला जातो. त्यावर प्रथम १ लाख रुपयांच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही आणि १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर १०% इतका कर भरावा लागतो. शेअर्स खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत विकल्यास त्यावर होणारा नफा हा अल्पमुदतीचा भांडवली नफा समजला जातो. त्यावर करदात्याला १५% दराने कर भरावा लागतो. या करावर उत्पन्नानुसार अधिभार आणि शैक्षणिक कर देखील भरावा लागतो. या व्यवहारात तोटा झाल्यास, दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्पमुदतीचा तोटा हा अल्प किंवा दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

जर करदाता उद्योग-व्यवसाय म्हणून हे व्यवहार करत असेल तर “उद्योग-व्यवसायाच्या” उत्पन्नासाठी असणार्‍या प्राप्तीकर कायद्यातील सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठी लागू होतात. करदाता अनुमानित करानुसार किंवा उत्पन्न मिळविण्यासाठी झालेला पत्यक्ष खर्च वजा करून बाकी उत्पन्नावर उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरू शकतो. उद्योग-व्यवसायाचा तोटा हा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून (पगाराचे उत्पन्न सोडून) वजा करता येतो.

हेही वाचा… Money Mantra: निकाल वार्ता: एचडीएफसी बँकेच्या नफ्यामध्ये ५१% ची वाढ

ज्या समभागांची डिलिव्हरी घेतली जात नाही : यामध्ये इंट्राडे आणि फ्यूचर आणि ऑप्शन्स (एफ. आणि ओ) या व्यवहारांचा समावेश आहे. या व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न “उद्योग-व्यवसायाचे” उत्पन्न म्हणूनच गणले जाते. याचे कारण म्हणजे हे व्यवहार फक्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने केले जातात. यामुळे “उद्योग-व्यवसायाच्या” उत्पन्नासाठी असणार्‍या प्राप्तीकर कायद्याच्या सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठी सुद्धा लागू होतात

इंट्राडे व्यवहार : इंट्राडे व्यवहारात समभाग ज्या दिवशी खरेदी केले त्याच दिवशी विकले जातात आणि त्याची डिलीव्हरी घेतली जात नाही. त्यामुळे हे सट्टा उत्पन्न (स्पेक्युलेटीव) म्हणून करपात्र असते. विवरणपत्रात हे उत्पन्न सट्टा उत्पन्न या शिर्षकाखाली दाखवावे लागते. हे सट्टा उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही. असा वजा न झालेला तोटा पुढील ४ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि तो फक्त सट्टा उत्पन्नातूनच वजा करता येतो. या साठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

फ्यूचर आणि ऑप्शन्स (एफ. आणि ओ) : या व्यवहारामध्ये सुद्धा समभागाची डिलिव्हरी घेतली किंवा दिली जात नसली तरी हे व्यवहार सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली गणले जात नाहीत, या व्यवहारातून मिळालेले उत्पन्न सामान्य उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणूनच गणले जाते. हे उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून, सट्टा उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून (पगाराचे उत्पन्न सोडून) वजा करता येतो हा तोटा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि तो उद्योग व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो. या साठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

असा व्यवहार करणाऱ्यांनी आपले व्यवहार उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नात आणि भांडवली नफ्याच्या उत्पन्नात योग्य पद्धतीने दाखविणे गरजेचे आहे. या दोन्हीसाठी करआकारणी आणि अनुपालन वेगवेगळे आहे. उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नासाठी लेखे आणि लेखा-परीक्षणाच्या तरतुदी लागू होतात. असे व्यवहार करणाऱ्या करदात्याला या तरतुदी तपासून पाहिले पाहिजे. तसेच अनुमानित कराच्या तरतुदीसुद्धा या व्यवहारासाठी लागू होतात. या तरतुदींचे पालन न केल्यास करदात्याला दंड भरावा लागू शकतो.

जे करदाते असे व्यवहार करतात त्यांना हे व्यवहार विवरणपत्रात योग्य सदराखाली दाखविणे गरजेचे असते. प्राप्तिकर खात्याला विविध माध्यमातून करदात्याच्या व्यवहारांची माहिती मिळत असते. असे व्यवहार विवरणपत्रात न दाखविल्यास प्राप्तिकर खाते करदात्याला नोटीस पाठवू शकते.