सुधाकर कुलकर्णी

दिवाळीचा सगळ्यात मोठा सण आता अगदी तोंडावर आला आहे. सगळीकडे याची जाणीव होऊ लागली आहे. विविध शो रूम मॉल, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओ मार्ट , मिन्त्रा यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या यांच्या मोठमोठ्या जाहिराती वृतपत्रे, टी व्ही , फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. यात प्रकर्षाने जाणवणारी एक बाब म्हणजे बहुतेक डिलर अथवा ई-कॉमर्स कंपन्या शून्य व्याज कर्ज (झिरो इंटरेस्ट लोन) देऊ करत आहेत व ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत, मात्र शून्य व्याज कर्ज (झिरो इंटरेस्ट लोन ) म्हणजे नेमके काय व खर्च बिनव्याजी कर्ज मिळते का या बाबत सामान्य ग्राहक अनभिज्ञ असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि म्हणून आज आपण शून्य व्याज कर्ज (झीरो इंटरेस्ट लोन )म्हणजे काय व खरंच व्याज शून्य % असते का याबाबत माहिती घेऊया.

Shocking accident video
भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात; नेमकं कुठे चुकलं तुम्हीच सांगा; थरारक VIDEO होतोय व्हायरल
Urine Infections
स्त्री आरोग्य: यूरिन इन्फेक्शन कशामुळे होतं ?
Gut, Stomach Infection Home Remedies
अल्सरचा त्रास, पोटही बिघडतंय? जिरं, ओवा व ‘या’ मसाल्याचा वापर देईल चुटकीसरशी आराम; खाण्याची योग्य पद्धत वाचा
Luv Kataria
‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात साप पाहताच नेटकरी पडले काळजीत; लव कटारिया मात्र अनभिज्ञ, पाहा व्हिडीओ
diy weight loss coach You may be gaining weight on your face and stomach due to this cortisol hormone know more
‘या’ हार्मोन्समुळे वाढते तुमचा चेहरा अन् पोटावरील चरबी; अतिरिक्त चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल? डॉक्टरांनी सुचवले ‘हे’ उपाय
How Bars Cheat You While You Order Drinks Desi Jugaad Video Viral
तुम्हीही हॉटेल, बारमध्ये महागड्या ड्रिंक घेता का? पाहा ग्राहकांची कशी होते फसवणूक; पैसे वाचवायचे असतील तर हा VIDEO बघाच
a girl's hair style goes viral on social media
‘या’ हेअर स्टाइलला तुम्ही कोणते नाव देणार? मुलीच्या हेअर स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा, पाहा VIDEO
Car Tips
कारचे ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या यामागील खरं कारण

हेही वाचा >>> Money Mantra : कोटक महिंद्राची नवी ‘कोटक कंझम्शन फंड’ योजना – जाणून घ्या सर्वकाही

शून्य व्याज कर्ज (झिरो इंटरेस्ट लोन ) याला नो कॉस्ट ईएमआय असेही म्हणतात. सामान्य ग्राहक टीव्ही/ फ्रीज/ डीशवॉर/  वॉशिंग मशीन/ लॅपटॉप यासारख्या महागड्या वस्तू एकरकमी  घेऊ शकत नाही आणि उत्पादक तसेच वितरक यांना तर आपला माल विकायचा असतो त्यासाठी उत्पादक , वितरक व अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओ मार्ट , मिन्त्रा यासारख्या  ई-कॉमर्स कंपन्या एकत्र येऊन शून्य व्याज कर्ज (झिरो इंटरेस्ट लोन ) हा पर्याय ग्राहकास देऊ करत आहेत. नो कॉस्ट ईएमआय म्हणजे घेतलेल्या वस्तूच्या किमती इतके कर्ज आपल्याला दिले जाते व अशा कर्जाच्या  हप्त्यावर (ईएमआय) वर कोणतेही इतर शुल्क आकारले जात नाही. त्यालाच नो कॉस्ट ईएमआय म्हटले जाते. तुम्ही नो कॉस्ट ईएमआय पर्यायांमध्ये एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला फक्त त्या वस्तूच्या किमती इतकी रक्कम पुढे हप्त्याने  भरावी लागते. त्यावरील कोणतेही व्याज तुमच्याकडून आकारले जाणार नाही. काही वेळा नो कॉस्ट ईएमआयमध्ये तुम्हाला डाउनपेमेंट भरायची गरज नाही. नो कॉस्ट ईएमआयमुळे तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा >>> Money Mantra : प्राप्तिकर खात्याकडून नोटीस मिळाल्यास काय करावं?

नो कॉस्ट ईएमआयचे फायदे

१) घेत असलेल्या वस्तूची किंमत एकरकमी भरावी लागत नाही. यामुळे हवी असलेली वस्तू खरेदी करणे शक्य होते.

१.  घेतलेल्या वस्तूच्या रकमेची परतफेड समान मासिक हप्त्यात करावयाची असते व यासाठी कोणतेही शुल्क लावले जात नाही.

२. वस्तूच्या किमतीच्या काही प्रमाणात (१०% ते १५%) डाउन पेमेंट करावे लागत नाही. (मात्र काही ठिकाणी डाऊनपेमेंट करावे लागू शकते.)

नो कॉस्ट ईएमआय योजनेचे तोटे

१) अनावश्यक किंवा गरजेपेक्षा जास्त सुविधा असणारी महागडी वस्तू घेतली जाऊ शकते व पुढे त्या वस्तूचे डोईजड हप्ते भरताना आर्थिक ओढाताण होऊ शकते.

२) नो कॉस्ट ईएमआयवर वस्तू खरेदी करताना आपण डिस्काऊंट मागू शकत नाही तसेच वस्तूची किंमत वाढवून ठेवलेली असल्याने वस्तू महाग मिळते.

३) प्रोसेसिंग फी भरावी लागते. 

४) पुढील हप्त्यांचे पेमेंट करण्यासाठी एकतर आपल्या क्रेडिटचा तपशील द्यावा लागतो व पुढील हप्त्यांचे पेमेंट आपल्या क्रेडिट कार्ड मधून केले जाते आणि जर क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरता आले नाही तर ३० ते ४०% इतके व्याज द्यावे लागू शकते शिवाय आपला क्रेडिट स्कोर खराब होऊन पुढील कर्ज मिळण्याची पात्रता कमी होते.

नो कॉस्ट ईएमआय योजनेचा लाभ घ्यावा का ?

या योजनेमुळे आपल्याला हवी असलेली वस्तू हप्त्याने घेता येत असल्याने तसेच याची प्रक्रिया अगदी सुलभ असल्याने जरूर लाभ घ्यावा मात्र असे करताना आपल्याला द्यावा लागणारा हप्ता सलग भरणे शक्य आहे का याची खात्री करून घ्यावी.