EPF E Nomination Benefits : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO)च्या वतीने सर्व सदस्यांना ई-नामांकन भरण्यास सांगितले जात आहे. कोणताही EPFO ​​सदस्य ऑनलाइन UAN पोर्टलला भेट देऊन सहजपणे ऑनलाइन ई-नामांकन दाखल करू शकतो आणि त्यासाठी नियोक्त्याचे कोणतेही प्रमाणपत्र आवश्यक नाही, अशीही माहितीही ईपीएफओकडून देण्यात आली आहे.

EPFO ई-नामांकन भरण्याचे फायदे

EPFO सदस्याच्या मृत्यूचा दावा केवळ ऑनलाइन उपलब्ध असतो.
EPF खात्यात जमा केलेले पैसे, पेन्शन आणि विमा (७ लाखांपर्यंत) यांचा लाभ कायदेशीर वारसाला कोणत्याही अडचणीशिवाय दिला जातो.
तुमच्या दाव्याचा पेपरलेस आणि जलद निपटारा केला जातो.

हेही वाचाः ‘६ महिन्यांची नोटीस पूर्ण करा अन्यथा…’, नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गो फर्स्टचा दबाव

ईपीएफओमध्ये ई-नामांकन भरताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुमचा UAN सक्रिय आणि आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा.
तसेच प्रोफाइल फोटो आणि पत्ता अपडेट करावा.
नॉमिनीचा स्कॅन केलेला फोटो असावा.
आधार, IFSC सोबत बँक खाते क्रमांक आणि पत्ता असावा.

हेही वाचाः राजकीय पक्षांचा फंड येतो कुठून? ९० टक्के निवडणूक रोखे पाच मोठ्या शहरांतून आले; त्यातही मुंबई आघाडीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

EPFO UAN पोर्टलवर ऑनलाइन ई-नामांकन कसे भरायचे?

epfindia.gov.in या EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
UAN पोर्टलवर लॉग इन करा आणि Managed टॅबवर जा आणि ई-नामांकन निवडा.
त्यानंतर Provide Details टॅबवर जा आणि Save वर क्लिक करा.
पुढे कुटुंब घोषणा अद्ययावत करण्यासाठी yes वर क्लिक करा. आधार, नाव, जन्मतारीख, लिंग, नातेसंबंध, पत्ता, बँक खाते माहिती (पर्यायी) आणि मागितलेली इतर माहिती यासारखे तपशील भरा.
येथे तुम्हाला एक फोटोदेखील अपलोड करावा लागेल आणि त्याचा आकार 100KB पेक्षा जास्त नसावा.
त्यानंतर नॉमिनीची माहिती भरा. तुम्ही तुमच्या EPF खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.
सर्व माहिती भरल्यानंतर ‘सेव्ह ईपीएफ नामांकन’ वर क्लिक करा.
आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP द्वारे ई-साइन करा.