SEBI bans Arshad Warsi from Market : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने (SEBI) गुरुवारी बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी व अन्य ५७ जणांवर सिक्योरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास एक वर्षासाठी बंदी घातली आहे. यूट्यूबवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंशी संबंधित एका प्रकरणात सेबीने या ५७ जणांवर कारवाई केली आहे. अरशद, त्याची पत्नी व अन्य ५७ जणांनी गुंतवणूकदारांना फसवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

अरशद वारसी, मारिया व इतर ५७ जणांनी गुंतवणूकदारांना युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करून साधना ब्रॉडकास्टचे शेअर्स (समभाग) खरेदी करण्याची शिफारस केली होती. त्यांनी देखील यात गुंतवणूक केली होती. व्हिडीओ व इतर माध्यमातून हे सर्वजण शेअर्सच्या किंमती फुगवत होते. हे सर्वजण मनमानी पद्धतीने शेअर्स पंप व डंप (समभागाच्या किंमती वाढवणे आणि समभागांची विक्री करणे) करत होते. ही बाब उघड झाल्यानंतर सेबीने साधना ब्रॉडकास्टच्या (आता क्रिस्टल बिझनेस सिस्टिम लिमिटेड असं नाव बदलण्यात आलं आहे.) प्रवर्तकांसह ५७ जणांना/संस्थांना पाच लाख रुपये ते पाच कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सेबीने या सगळ्यांवर बंदी घालण्याबरोबर त्यांना पाच लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. तसेच सेबीने या सर्वांना १२ टक्के व्याजासह ५८.०१ टक्के रुपयांची बेकायदेशीर कमाई परत करण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीला या फसवणूक प्रकरणाचा तपास करताना आढळलं आहे की अरशद वारसीने साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्समधून ४१.७० लाख रुपये, तर त्याच्या पत्नीने ५०.३५ लाख रुपयांचा नफा कमावला होता.

अरशद वारसी व त्याची पत्नी या फसवणूक प्रकरणातील सहआरोपी आहेत. गौरव गुप्ता, राकेश कुमार गुप्ता व मनीष मिश्रा हे तिघे या प्रकरणाचे सूत्रधार व मुख्य आरोपी आहेत. तर, साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडचे (एसबीएल) आरटीए संचालक सुभाष अग्रवाल व मनीष मिश्रा यांनी यात प्रमोटर्समधील मध्यस्थ म्हणून काम केलं होतं. या सर्वांनी मिळून हा फसवणुकीचा कट रचला आणि यशस्वी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरशदहा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवली आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘इश्किया’, ‘जॉली एलएलबी’, ‘गो लमाल’सारख्या चित्रपटांमधून तो घराघरांत पोहोचला आहे.