Virat Anushka Profit In Share Market, Go Digit Listing: काही वर्षापूर्वी गो डिजिट कंपनीत सेलिब्रिटी जोडपं अनुष्का शर्मा व विराट कोहली यांनी मोठी गुंतवणूक केली होती. काही दिवसांपूर्वी गो डिजिट कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात सुचीबद्ध झाला आणि आता त्यातच कोहली व अनुष्काला चौपट बम्पर फायदा झाल्याचे समजतेय. फेब्रुवारी २०२० मध्ये केलेल्या अडीच कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून आता तब्बल १० कोटी रुपयांचा परतावा अनुष्का विराटला मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, गो डिजिट या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीने 300 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली- अनुष्का शर्माने किती गुंतवणुक केली?

विमा कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने Go Digit मध्ये प्रत्येकी ७५ रुपये दराने २,६६,६६७ इक्विटी शेअर्स खरेदी केले होते, ज्याचे मूल्य होते एकूण 2 कोटी रुपये तर अभिनेत्री अनुष्का शर्माने ५० लाख रुपयांना ६६,६६७ शेअर्स विकत घेतले होते. यानुसार या जोडप्याची एकत्रित गुंतवणूक 2.5 कोटी रुपये झाली होती.

शेअरची किंमत ३०० रुपयांहून अधिक झाल्यामुळे विराट कोहलीची २ कोटी रुपयांची गुंतवणूक ८ कोटी रुपयांवर गेली आहे आणि अनुष्का शर्माची गुंतवणूक २ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एकत्रितपणे, त्यांच्या समभागांची किंमत आता १० कोटी रुपये आहे.

दरम्यान, गो डिजिट या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. २,६१४.६५ कोटी रुपयांचा हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी १५ ते १७ मे या काळात खुला होता. या आयपीओला ९.६० पटीने सबस्क्राईब करण्यात आलं होतं. सुरुवातीला २७२ रुपये प्रति शेअर किंमत असताना आयपीओ सुचीबद्ध झाला होता. नंतर शेअरचे मूल्य BSE वर २८१. १० तर NSE वर २८६ रुपये झाले. साधारण अंदाज लावायचा तर हा आयपीओ शेअर बाजारात सूचिबद्ध होताच विराट-अनुष्का यांना थेट ५.१५ टक्क्यांनी नफा झाला. त्यानंतरही या कंपनीच्या शेअरचा दर वाढतच राहिला.

हे ही वाचा<< Gold-Silver Price: सोन्याचे दर पाहून ग्राहकांच्या आनंदाने उड्या! १० ग्रॅमची किंमत ऐकून बाजारात गर्दी 

सचिन तेंडुलकरलाही फायदा

दुसरीकडे, इतर स्पोर्ट्स स्टार्सनी देखील नंतर सार्वजनिक झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये, सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या आझाद इंजिनिअरिंगने बाजारात पदार्पण केले होते. मार्च २०२३ मध्ये क्रिकेटपटूने प्रत्येकी ११४.१० रुपये दराने ४.३ लाख शेअर्स घेतले होते. शेअर बाजारात नंतर प्रति शेअर किंमत ७२० रुपये होताच तेंडुलकरला सुद्धा सहा पटीने फायदा झाला होता.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli anushka sharma earning increased go digit listing 2 5 cr investment turns into rs 10 cr how did go digit ipo hit share market svs
First published on: 24-05-2024 at 14:16 IST