यूपीएससी मुख्य परीक्षा १८ डिसेंबरपासून सुरू झालेली आहे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रम बदलानंतरची ही तिसरी परीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या लेखी चाचणीत सामान्य अध्ययन पेपर १ मधील ‘वर्तमान समाजातील ज्वलंत मुद्दे’ या अभ्यासघटकांतर्गत असलेल्या जातिव्यवस्था आणि जातिप्रश्न यासंबंधी प्रथमत: दोन प्रश्न विचारलेले दिसतात. त्यातील एक अनुसूचित जमातीमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण अनुसूचित जातीपेक्षा प्रगत आहे, त्यावर टिप्पणी करा आणि वर्तमान जाती अस्मिता आधारित चळवळी जातिनिर्मूलनाच्या दिशेने पाऊल टाकीत आहेत का, याचे चिकित्सक परीक्षण करा. याचा अर्थ जातिव्यवस्थेविषयी विचारलेले प्रश्न पाहता जातिव्यवस्थेच्या दृश्य आणि अदृश्य अशा बहुविध कंगोऱ्यांना स्पर्श करण्याचा लेखी परीक्षेचा उद्देश दिसून येतो. अशा प्रश्नांचा रोख कळण्यासाठी जातिव्यवस्था आणि जातिप्रश्नाचा संकल्पनात्मक व्यवहार समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा, जातीच्या वर्तमान आयामाचे अन्वयार्थ लावणे दुरापास्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जात हा विशिष्ट प्रकारचा सामाजिक गट आहे, ज्यामध्ये जात ही व्यक्तीची कामे, स्थान आणि उपलब्ध संधी तसेच अडचणीही निर्धारित करते. अशा परिस्थितीत सामाजिक समूहांच्या विविधतेचे आणि खोलीचे अध्ययन न करता खऱ्या अर्थाने भारतीय समाजाच्या वास्तव मूलतत्त्वांना स्पर्श करता येत नाही. जातिव्यवस्था जशी एक उत्पादन पद्धती तशीच ती सामाजिक संरचना आहे. त्यामुळे जातिव्यवस्था समजून घेण्यासाठी संरचना आणि उत्पादन पद्धती यांच्यातील आंतरसंबंधांची तपासणी करणे अनिवार्य ठरते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In upsc exam ask a caste system based question
First published on: 28-12-2015 at 01:25 IST