केंद्र सरकारच्या पशुवैद्यक व दुग्ध व्यवसाय विभागात अधिकाऱ्यांच्या ८ जागा

उमेदवार पशुवैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर असावेत. त्यांची व्हेटर्नरी कौन्सिलकडे नोंदणी झालेली असावी आणि त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत  करावेत.

राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, इंदूर येथे साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या १२ जागा

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना पोलीस अथवा सुरक्षा दलात काम करण्याचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये प्रकाशित झालेली राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या  www.rrcat.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.

नेव्हल डॉकयार्ड अ‍ॅपरेंटिसशिप स्कूल, विशाखापट्टणम येथे औद्योगिक प्रशिक्षणार्थीसाठी १८२ जागा

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अर्हता प्राप्त केलेली असावी.  वयोमर्यादा २० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नेव्हल डॉकयार्ड अ‍ॅपरेंटिसशिप स्कूलची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यात संपूर्णपणे भरलेले अर्ज नेव्हल डॉकयार्ड अ‍ॅपरेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम- ५३००१४ या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट- २०१६ अंतर्गत हवाई दलात अधिकारी म्हणून संधी

अर्जदार अभियांत्रिकीसह कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी किमान ६० टक्के असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे.

अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली हवाई दलाची जाहिरात पाहावी अथवा भारतीय हवाई दलाच्या www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च, दिल्ली येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ७ जागा

अर्जदारांनी मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. ते ‘नेट’ परीक्षा पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ डिसेंबर २०१५ च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली- ११००५४ या पत्त्यावर २ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड स्टोर्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, कानपूर येथे ज्युनिअर रिसर्चच्या ३ जागा

उमेदवारांनी अभियांत्रिकीची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी ‘नेट’- ‘गेट’ यांसारखी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पात्रता प्राप्त असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स मटेरियल्स स्टोर्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट, एस्टॅब्लिशमेंट, जी. टी. रोड, कानपूर- २०८०१३ या पत्त्यावर २ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

आयुध निर्माणी- देहराडून येथे कुशल कामगारांसाठी १४ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- देहराडूनची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज, जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, देहराडून, उत्तराखंड, २४८००८ या पत्त्यावर २ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

एलआयसीमध्ये ७०० साहाय्यक प्रशासनिक अधिकार पदांची भरती

शैक्षणिक अर्हता- पदवी उत्तीर्ण.

वय : २१ ते ३० वष्रे (अजा/अज २१ ते ३५ वष्रे, इमाव २१ ते ३३ वष्रे)

वेतन- रु. ४०,२४५/- दरमहा.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आपल्या सोयीच्या एलआयसीच्या विभागीय कार्यालयात (अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सातारा) परीक्षा पूर्वप्रशिक्षणासाठी इमाव, अजा/अज उमेदवारांनी आपल्या नावाची नोंदणी  करावी.  ऑनलाइन अर्ज एलआयसीच्या http://www.licindia.in या संकेतस्थळावर ५ जानेवारी २०१६ पर्यंत करावेत. सविस्तर माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ डिसेंबरच्या अंकातील जाहिरात पाहावी.

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट (ग्रुप ’) पदांची भरती

खालील पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू  आहे-

जनरल डयुटी- जनरल डयुटी (पायलट), जनरल डयुटी (महिला)- अर्हता- बारावीला फिजिक्स/ गणितात ६० टक्के गुण आणि ६० टक्के गुणांसह पदवी (कोणतीही शाखा).

टेक्निकल ब्रँच (मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल) – बारावीला फिजिक्स/ गणितात किमान ६० टक्के गुण. अभियांत्रिकी पदवी किमान ६० टक्के गुणांसह.

कायदा  – कायदा शाखेतील पदवी.

पायलट – बारावीला ६० टक्के गुण,

कमíशयल पायलट लायसन्स. (पात्रता परीक्षेच्या शेवटच्या वर्षांला असणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत.)  ऑनलाइन अर्ज  www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत करावा. लॉ ब्रँचसाठी ऑनलाइन अर्ज २९ डिसेंबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५पर्यंत करता येईल. सविस्तर माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ डिसेंबर २०१५ च्या अंकात जाहिरात पाहता येईल.

कामगार राज्य विमा महामंडळामध्ये (ईएसआयसी)  पदभरती

लघुलेखक- ८ पदे (बारावी + ८० श.प्र.मि. स्टेनोग्राफी स्पीड), वयोमर्यादा- १९-२७ वष्रे.

उच्चश्रेणी लिपिक २७० पदे (कोणत्याही शाखेतील पदवी), वयोमर्यादा- १९-२७ वष्रे.

६ बहुकार्य कर्मचारी (एमटीएस) – २०७ पदे (दहावी उत्तीर्ण)  वयाची अट १८-२५ वष्रे. उच्चतम वयोमर्यादा अजा/अजसाठी ५ वर्षांनी, इमावसाठी ३ वर्षांनी शिथिलक्षम आहे. ऑनलाइन अर्ज  http://www.esic.nic.in/ www/esicmaharashtra.gov.in किंवा http://www.umsesicrectt.in या संकेतस्थळांवर ६ जानेवारी २०१६ पर्यंत करावेत.

कामगार राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयांत  नर्सिग आणि कुकिंग संबंधित पदे

स्टाफ नर्स-(पात्रता- नìसग पदविका) १२ पदे. वय ३७ वर्षांपर्यंत.

नìसग ऑर्डर्ली (पात्रता -दहावी उत्तीर्ण + १ वर्षांचा कामाचा अनुभव) ९१ पदे.

वय २७ वर्षांपर्यंत.

कूकमेट (पात्रता- दहावी उत्तीर्ण + २ वर्षांचा भारतीय पद्धतीने स्वयंपाक बनविण्याचा अनुभव.) वयाची अट २७ वर्षांपर्यंत.

ऑनलाइन अर्ज http://www.esic.nic.in/ www/esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ६ जानेवारी २०१६  सायं. ५ वाजेपर्यंत करावेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांची पदभरती

६ साहाय्यक सुरक्षा अधिकारी- ४३ पदे.

६ साहाय्यक सुरक्षा अधिकारी (प्रशिक्षक)- ४ पदे  पात्रता – पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण + एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्र. ऑनलाइन अर्ज portal.mcgm.gov.in या पोर्टलवर

३१ डिसेंबर २०१५ पर्यंत करावा. (अर्ज करण्याची शेवटची तारीख  १८ डिसेंबर २०१५ होती. ती आता वाढवली आहे.)

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील  लेखापाल खात्यात भरती

पदे- ३३९. कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा साहाय्यक . पात्रता – बी.कॉम. किमान ६० टक्के गुणांसह + दहावीला १०० गुणांचा मराठी विषय + संगणकाचे ज्ञान. वय – १८ जानेवारी २०१६

रोजी ३३ वर्षांपर्यंत. ऑनलाइन अर्ज portal.megm.gov.in या पोर्टलवर १८ जानेवारी २०१६  करावेत.

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सहाय्यक व्यवस्थापक भरती

‘एसआयडीबीआय’मध्ये १०० असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’ पदांची भरती. पात्रता- किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण (अजा/ अज/ अपंग उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण) वय- २१ ते २८ वष्रे (अजा/अज साठी १८-३३ वष्रे, इमाव १८-३१ वष्रे) वेतन- रु. ३६ हजार दरमहा.  ऑनलाइन अर्ज- http://www.sidbi.inया संकेतस्थळावर ११ जानेवारी २०१६ पर्यंत करावा.

भारतीय सन्य दलामध्ये (इंडियन आर्मी) शॉर्ट सíव्हस कमिशनद्वारे (टेक्निकल) भरती

पुरुष- १०० जागा. महिला- १० जागा.

ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे ऑगस्ट २०१६ पासून कोर्स सुरू होणार आहे. पात्रता- अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण. अंतिम वर्षांचे

विद्यार्थी या भरतीसाठी पात्र आहेत.  http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज  ८ नोव्हेंबर २०१६  पर्यंत करावा.   – सुहास पाटील