11 July 2020

News Flash

नोकरीची संधी

वेतन असलेले केंद्र सरकारी कर्मचारी (उदा. डिस्पॅच रायडर) सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

’  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया),सेंट्रल रिजन, नागपूर (जाहिरात क्र. २१४/ अ-१२०२६/३/२००१/ए२३३, दि. २ मार्च २०२०) ‘ऑíडनरी ग्रेड ड्रायव्हर’च्या एकूण २१ पदांची भरती.

(अजा – २, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११) युनिटनुसार रिक्त पदे – नागपूर – ९, पुणे – ३, रायपूर – ३, जबलपूर – ३ व भोपाळ – ३. वेतन – लेव्हल-२ (रु. १९,९००/- ६३,२००/-)

अंदाजे वेतन दरमहा रु. ३०,०००/-.

वयोमर्यादा – दि. २९ मार्च २०२० रोजी २५ वष्रेपर्यंत. (केंद्र सरकारी कर्मचारी – ४० वष्रेपर्यंत)

पात्रता – सरळ सेवा भरती –

(१) दहावी उत्तीर्ण, (2) एलएमव्ही/एचएमव्ही ड्रायिव्हग लायसन्स, (३) ३ वर्षांचा ट्रक/जीप/ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव,

(४) मोटर व्हेईकलच्या दुरुस्ती आणि देखभालीचे ज्ञान असणे आवश्यक.

(पे बँड-१ रु. ५,२००/- २०,२००/-

अधिक ग्रेड पे रु. १,८००/-.

वेतन असलेले केंद्र सरकारी कर्मचारी (उदा. डिस्पॅच रायडर) सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत. पुरेसे उमेदवार मिळाले नाहीत तर अजा/अज उमेदवारांसाठी अनुभवाची अट काही प्रमाणात शिथिल केली जाऊ शकते.)

निवड पद्धती – उमेदवारांची निवड करण्यासाठी ट्रेड टेस्ट (प्रॅक्टिकल व लेखी परीक्षा) घेतली जाईल.

ट्रेड  टेस्टचा अभ्यासक्रम (१) इंग्रजी अंक (न्यूमरल्स) व आकृती (फिगर्स) यांचे वाचन, (२) ट्रॅफिक रेग्युलेशन (वाहतुकीचे नियम) यांचे ज्ञान, (३) मोटरगाडीतील बिघाड ओळखून लहान दुरुस्त्या करणे, (४) मोटारगाडीचे चाक काढता येणे व टायर व्यवस्थित फुगविता येणे.

प्रोबेशन कालावधी – दोन वर्षांचा असेल.

अर्जासोबत पुढील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात –

(१) एचएमव्ही/एलएमव्ही ड्रायव्हिंग लायसन्स,

(२) अनुभवाचा दाखला,

(३) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे.

निवडलेल्या उमेदवारांना जीएसआयच्या सेंट्रल रिजनमध्ये (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड)

येथे नियुक्त केले जाईल.

अर्जाचा नमुना (अनेक्श्चर-कक) व इतर माहिती www.gsi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (> External Sign in > Personnel and Administration > Filling up Post of Ordinary Grade Driver in GST Central Region)

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज पुढील पत्त्यावर साध्या पोस्टाने/स्पीड पोस्टाने दि. २९ मार्च २०२० पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

(केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी अर्ज प्रॉपर चॅनेलने पाठवावेत.)

The Additional Director General, Geological Survey of India, Central Region, Seminary Hills, Nagpur – 440 006.

अर्जाच्या लिफाफ्यावर वरच्या बाजूस ‘ऑíडनरी ग्रेड ड्रायव्हर पदासाठी अर्ज’ असे स्पष्ट लिहावे.

’    नॅशनल इन्फॉम्रेटिक्स सेंटर (NIC), मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, भारत सरकार (जाहिरात क्र. NIELIT/NIC/2020/1) सायंटिस्ट-बी आणि सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट पदांची भरती.

(१) सायंटिस्ट-बी – (एस अ‍ॅण्ड टी) लेव्हल-१० (रु. ५६,१००/- १,७७,५००/-)

(अंदाजे वेतन दरमहा रु. ९०,०००/-२८८ पदे (अजा- ४३, अज- २१, इमाव- ७७, ईडब्ल्यूएस- २८, खुला- ११९). (एकूण १२ पदे अपंग उमेदवारांसाठी राखीव. प्रत्येकी ४ पदे लोकोमोटिव्ह डिसअ‍ॅॅबिलिटी/ हार्ड हिअरिंग/ मल्टिपल डिसअ‍ॅबिलिटी)

पात्रता- (दि. २६ मार्च २०२० रोजी) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन इ. विषयांतील इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी पदवी/ एएमआयई/ एम.एस्सी./ एम.सी.ए./ एम.ए. फिलॉसॉफी इ. उत्तीर्ण.

(३) सायंटिफिक/ टेक्निकल असिस्टंट-ए – ग्रुप-बी (एस अ‍ॅण्ड टी) लेव्हल-६ (रु. ३५,४००/- १,१२,४००/-) (अंदाजे वेतन रु. ५४,०००/- दरमहा) – २०७ पदे (अजा- ३१, अज- १५, इमाव- ५५, ईडब्ल्यूएस- २०, खुला- ८६)

(९ पदे अपंग उमेदवारांसाठी राखीव. प्रत्येकी ३ पदे लोकोमोटिव्ह डिसअ‍ॅबिलिटी/ हार्ड ऑफ हिअरिंग (मल्टिपल डिसअ‍ॅबिलिटी).

पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इन्फॉर्मेटिक्स इ.मधील एम.एस्सी./ एम.एस./ एम.सी.ए./ बी.ई./ बी.टेक. उत्तीर्ण.

वयोमर्यादा- दि. २६ मार्च २०२० रोजी ३० वष्रेपर्यंत (इमाव- ३३ वष्रेपर्यंत; अजा/अज- ३५ वष्रेपर्यंत; अपंग- ४०/४३/४५ वष्रेपर्यंत).

निवड पद्धती- सायंटिस्ट-बी पदांसाठी लेखी परीक्षा (८५%) आणि मुलाखत (१५%). सायंटिफिक/ टेक्निकल असिस्टंट-ए पदांसाठी फक्त लेखी परीक्षा.

लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप ओएमआर बेस्ड. कालावधी ३ तास. फक्त इंग्रजी भाषेत- ६५% प्रश्न (७८ प्रश्न) टेक्निकल विषयावर आधारित आणि ३५% प्रश्न (४२) प्रश्न जेनेरिक भागावर आधारित असतील. एकूण १२० प्रश्न.

(जेनेरिक भागातील प्रश्न लॉजिकल रिझिनग, अ‍ॅनालायटिकल रिझिनग, कॅपॅबिलिटीज, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अ‍ॅबिलिटीज आणि जनरल अ‍ॅप्टिटय़ूड यांवर आधारित असतील.)

टेक्निकल विषयांमध्ये (कॉम्प्युटर संबंधित टॉपिक्स- कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग इ.चा समावेश असेल.) प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.

अर्जाचे शुल्क- रु. ८००/- (अजा/अज/अपंग/महिला यांना फी माफ).

लेखी परीक्षेसाठी केंद्र- मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद, रायपूर इ.

ऑनलाइन फॉर्म भरताना येणाऱ्या शंकासमाधानासाठी recruit@nielit.gov.in या ई-मेल वर (जाहिरातीचा क्रमांक नमूद करणे आवश्यक) संपर्क करा.

ऑनलाईन अर्ज  <https://www.calicut.nielit.in/nic>  या संकेतस्थळावर दि. २६ मार्च (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ((१) रजिस्ट्रेशन ई-मेल आय्डीसह, (२) अर्जाचे डिटेल्स भरणे, (३) अर्जाचे शुल्क भरणे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 7:19 am

Web Title: job opportunity employment opportunities in inida job vacancy in inida zws 70
Next Stories
1 प्रश्नवेध यूपीएससी : भारत आणि जग
2 दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा नागरिकशास्त्र प्रश्न विश्लेषण
3 भारतीय कला आणि संस्कृती
Just Now!
X