News Flash

नोकरीची संधी

मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबादमध्ये शिपाई पदासाठी एकूण ६८ पदांची भरती.

मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबादमध्ये शिपाई पदासाठी एकूण ६८ पदांची भरती.

पात्रता – (अ) किमान सातवी उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असावी.

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षेपर्यंत (अजा/ अज/इमाव/विमाप्र – ४३ वर्षेपर्यंत,

विकलांग – ४५ वर्षेपर्यंत).

निवड पद्धती – लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता व विशेष अर्हता (१० गुण) चाचणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल.

(अ) लेखी परीक्षा ३० गुणांची,

(ब) शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणी (१० गुण), (क) मुलाखत १० गुणांसाठी घेतली जाईल. (उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ प्रमाणपत्रे साक्षांकित प्रतींसह तपासणीस आणावीत.)

ऑनलाइन अर्ज  https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर दि. २१ एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत. या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर (आयआयएससी) येथे अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ‘समर फेलोशिप इन सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग-२०१८’ साठी प्रवेश.

पात्रता – अजा/ अज उमेदवार जे एमएससी (बायोलॉजिकल/फिजिकल/केमिकल/मॅथेमॅटिकल सायन्सेस) च्या पहिल्या वर्षांला शिकत आहेत किंवा बीई/बीटेक(कोणतीही शाखा)मधील तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी.

आर्थिकमदत –  (१) दुसऱ्या वर्गाचे स्लिपर कोच रेल्वे तिकिटाएवढे भाडे (घरापासून आयआयएससीपर्यंत आणि परत)

(२) आयआयएस्सीमध्ये मोफत राहण्याची/जेवणाची सोय.

(३) फेलोशिप रु. ५,०००/- आणि पुस्तकांसाठी रु. १,५००/- दिले जातील.

ऑनलाइन अर्ज www.iisc.ac.in या संकेतस्थळावर करावेत. ऑनलाइन अर्जाची पिट्रआऊट घेऊन त्यावर पासपोर्ट आकाराचा कलर फोटो चिकटवून कॉलेजच्या प्राचार्यानी सही केलेले स्टडी सर्टिफकेट पीडीएफ/जेपीजी फॉरमॅटमध्ये स्कॅन करून वरील संकेतस्थळावर दि. २५ एप्रिल २०१८ पर्यंत अपलोड करावेत.

 

महाराष्ट्र स्टेट पोलीस हाऊसिंग अ‍ॅण्ड वेल्फेअर कॉर्पोरेशन लिमिटेड, प्लॉट नं. ८९-८९ ए, पोलीस ऑफिसर्स मेसजवळ, पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई – ४०० ०३० ‘क्लर्क-टायपिस्ट’ पदांची ११ महिन्यांच्या करार पद्धतीने भरती.

पात्रता – १२वी उत्तीर्ण,

मराठी टायिपग ३० श.प्र.मि. आणि इंग्लिश टायिपग ४० श.प्र.मि. शासकीय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, एमएससीआयटी प्रमाणपत्र, कॉम्प्युटर चालविण्याचे ज्ञान, कन्स्ट्रक्शन कंपनी/आíकटेक्चर ऑफिसर/पीएमसी ऑफिसमधील कामाचा अनुभव.

वेतन – दरमहा रु. १२,०००/-

वयोमर्यादा – ३६ वर्षेपर्यंत.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.

संपर्क – सुषमा पित्रे  ९१६७२१७३१३,

ई-मेल आयडी –  gm@msphc.org .

विहित नमुन्यातील अर्ज www.msphc.org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. २३ एप्रिल २०१८.

 

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:03 am

Web Title: loksatta job opportunity 13
Next Stories
1 बहरू संगीतासी आला
2 अठराव्या शतकातील भारत
3 जिनॉमिक्सच्या जगात
Just Now!
X