09 March 2021

News Flash

यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय

अभ्यासक्रमामध्ये गरिबी व भूक यासंबंधीचे मुद्दे हा घटकही समाविष्ट करण्यात आला आहे.

प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामाजिक न्याय या वढरउ मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर-२ मधील अभ्यासघटकाविषयी चर्चा करणार आहोत. शासन समाजातील दुर्बल घटकांकरिता विविध योजना, उपक्रम राबवत असते. उदा. स्त्रियांकरिता जननी सुरक्षा योजना. या अभ्यासघटकाची तयारी करताना, शासनाने विविध उपक्रम, या उपक्रमांची दुर्बल घटकांच्या सबलीकरणातील परिणामकारकता अभ्यासावी. तसेच राष्ट्रीय महिला आयोग, मागासवर्गीय आयोग, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालहक्क संरक्षण कायदा इ. संस्थात्मक व वैधानिक उपायांविषयी जाणून घ्यावे. या घटकावर आधारित २०१९ च्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न पाहूयात.

२०१९

Performance of Welfare Schemes that are implement for Vulnerable sections is not so effective due to absence of their awareness and active involvement at all stages of policy process discuss.

शासन दुर्बल घटकांच्या कल्याणाकरिता राबवत असलेल्या योजना, कामगिरी, अंमलबजावणी जागृती व सक्रिय सहभाग यांच्या परिप्रेक्षामध्ये तपासून बघण्याची आवश्यकता असते. भारतासारख्या देशांमध्ये दुर्बल घटकांच्या विकासाकरिता विविध योजना, उपक्रम राबवण्याची नितांत आवश्यकता असते. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही घटनाकर्त्यांनी ही बाब अधोरेखित केली आहे. शासनाच्या धोरणांची यशस्विता, लाभार्थ्यांचा सक्रिय सहभाग, जागृती इ. घटकांवर अवलंबून असते. ही बाब उत्तरामध्ये शक्यतो उदाहरणासहित स्पष्ट करावी.

दुर्बल घटकांच्या सबलीकरणाबरोबरच सामाजिक क्षेत्र विकास व व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दय़ांमध्ये सरकार आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास याकरिता राबवत असलेले उपक्रम जाणून घ्यावेत. उदा. सर्व शिक्षा अभियान, माध्यान्ह भोजन कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य मोहीम, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादी महत्त्वपूर्ण आहेत. सामाजिक क्षेत्रावर शासनाकडून केला जाणारा खर्च व इतकी प्रचंड रक्कम खर्च करण्यामागची भूमिका, या विविध उपक्रमांची परिणामकारकता इ. बाबींच्या पाश्र्वभूमीवर या घटकाकडे पाहावे लागेल तसेच आरोग्य व शिक्षण यांचे सार्वत्रिकीकरण, उच्चशिक्षण व शास्त्रीय संशोधनाची स्थिती यासंबंधी मुद्दय़ाविषयी माहिती घेणे उचित ठरेल. अभ्यासक्रमामध्ये गरिबी व भूक यासंबंधीचे मुद्दे हा घटकही समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये गरिबी निर्मूलनाचे उपाय. उदा. कमजोरी. या बाबी अभ्यासण्यात गरिबी व भूक या घटकांवर २०१९ च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न पुढीलप्रमाणे –

There is a growing divergence in the relationsohip between poverty and hunger in India. The shrinking  sf Social expenditure by the government is forcing the poor to spend more on non-food essential items squeezing their food budget Elucidate .

काही वर्षांपासून शासनाचा सामाजिक गरीब व दुर्बल घटकांचे कल्याण करण्याकडे कल दिसून येतो. परिणामी, शासनावरील आर्थिक ताण वाढताना दिसत आहे. याचा थेट परिणाम म्हणजे या घटकांना अन्नधान्याच्या खर्चावर कपात करून इतर घटकांवर उदा. आरोग्य, शिक्षण, निवारा यावर मोठय़ा प्रमाणावर खर्च वाढत आहे. उत्तरांची सुरवात या पद्धतीने करून अन्नधान्योतर घटकांवर होणारा खर्च उदाहरणासहित स्पष्ट करावा. तसेच अन्नधान्याच्या खर्चाची तरतूद इतरत्र वळविल्यामुळे होणारे परिणामही विशद करावेत. यामध्ये कुपोषण, मानवी कार्यक्षमता कमी होणे, स्त्रियांचे आरोग्य इ. घटकांचा अवश्य उल्लेख करावा.

सामाजिक न्याय, गरिबी, भूक, विकासविषयक मुद्दे हे अभ्यासघटक परस्परव्याप्त  (Overlapping आहेत. परिणामी या घटकांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूपही परस्परव्याप्तच असते.

ग्रामीण भागातील विकास कार्यक्रमांमध्ये सहभागाला प्रोत्साहन देण्यामध्ये स्वयंसहायता  गटांना सामाजिक-सांस्कृतिक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. परीक्षण करा, हा स्वयंसाहाय्यता गटांविषयीचा प्रश्न २०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. स्वयंसाहाय्यता गट ग्रामीण भागामध्ये करत असलेले कार्य, त्यांची कामगिरी सहजपणे दिसून येत नाही. यामुळे यांचा समाजावर होणारा प्रभाव लक्षात घेतला जात नाही. ग्रामीण भागामध्ये लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते. संकुचित विचारांमुळे स्थानिक स्वराज संस्था बऱ्याचदा स्वयंसाहाय्यता गटांच्या कार्यामध्ये सहकार्य करत नाहीत. या गटांमध्ये महिलांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग असतो. या गटांमुळे लिंग विषमतेवर मात करून महिला स्वावलंबी बनत आहेत. ही बाब जुनाट विचारसरणी गटांना म्हणावी तितकी रुचत नाही. उपरोक्त मुद्दय़ांचा उत्तरामध्ये वरीलप्रमाणे ऊहापोह करणे आवश्यक आहे.

या अभ्यासघटकाची तयारी करण्यासाठी विशिष्ट असा संदर्भग्रंथ पुरेसा नाही, कारण हा उत्क्रांत होत जाणारा घटक आहे. त्याचबरोबर या घटकाला असणारी समकालीन सामाजिक, आर्थिक स्थितीची जोड यामुळे मागील वर्षांतील प्रश्नांचा आढावा घेता जवळपास सर्व प्रश्नांचा स्रोत वृत्तपत्रेच असल्याचे आढळते. परिणामी, या अभ्यासघटकाशी संबंधित लेख, परीक्षणे, सरकारी धोरणे, योजना उपक्रम इ.ची माहिती ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’सारख्या वृत्तपत्रातून घ्यावी. याबरोबर ‘योजना’, ‘कुरुक्षेत्र’ ही नियतकालिके, ‘इंडिया इयर बुक’मधील निवडक प्रकरणे, ‘बुलेटिन’ हे मासिक उपयुक्त ठरेल. आर्थिक सर्वेक्षण, पी.आय.बी. व संबंधित मंत्रालयांच्या संकेतस्थळांना नियमित भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:54 am

Web Title: preparation of upsc exam 2020 zws 70 3
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
2 एमपीएससी मंत्र : आदिवासी विकास
3 करोनोत्तर आव्हाने : करोना आणि दृश्यकलेचे अष्टपैलू शिक्षण
Just Now!
X