03 April 2020

News Flash

कारभार प्रक्रिया

घटकाची तयारी परिपूर्ण होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्याचा आढावा घेऊयात.

(यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगले)

आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील कारभार प्रक्रिया (Governance), सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकांविषयी जाणून घेणार आहोत. तसेच या घटकाची तयारी परिपूर्ण होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्याचा आढावा घेऊयात.

‘कारभार प्रक्रिया’ या अभ्यास घटकामध्ये गुड गव्हर्नन्स, ई-गव्हर्नन्स, नागरिकांची सनद, पारदíशत्व, उत्तरदायित्व, इ. उपघटक अभ्यासावे लागतात. सुशासन (गुड गव्हर्नन्स) म्हणजे गुणात्मक व मूल्यात्मक प्रक्रिया आहे. लोकसहभाग, कायद्याचे राज्य पारदíशता, प्रतिसादात्मकता, उत्तरदायित्व आदी वैशिष्टय़ांचा सुशासनामध्ये अंतर्भाव होतो. सुशासनासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. माहिती अधिकार, शिक्षणाचा हक्क, नागरिकांची सनद, सेवा हमी कायदा, व्हिसल ब्लोअर्स कायदा, लोकपाल, इ. सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बाबी आहेत. या घटकाचा अभ्यास उपरोक्त बाबींच्या पाश्र्वभूमीवर करावा.

ई-गव्हर्नन्स या संकल्पनेचे अध्ययन, यामध्ये समाविष्ट प्रतिमाने व शासकीय कार्यक्रमांच्या पाश्र्वभूमीवर करावे. या कार्यक्रमांमध्ये नॅशनल ई-गव्हर्नन्स प्लॅन, ई-सेवा, एमसीए-२१ यांचा समावेश होतो.

नागरिकांची सनद या साधनाद्वारे पारदर्शकता, उत्तरदायित्व व नागरिकांशी सुसंवाद वाढतो. यामध्ये नागरिकांच्या सनदेचा उगम, उत्क्रांती, नागरिकांची सनद परिणामकारक बनवण्यासाठी सुधारणा, इ. बाबी अभ्यासाव्यात.

कारभार प्रक्रियेशी संबंधित घटकांसाठी गव्हर्नन्स इन इंडिया- एम. लक्ष्मीकांत, प्रशासकीय सुधारणा अहवाल, योजना, कुरुक्षेत्र व शासकीय संकेतस्थळे नियमितपणे पाहावीत.

नागरी सेवा या घटकाची तयारी करताना नागरी सेवांविषयीच्या घटनात्मक तरतुदी, भारत सरकार (अलोकेशन ऑफ बिझनेस) नियम व भारत सरकार (ट्रॅन्झॅक्शन ऑफ बिझनेस) नियम पाहावेत. यासोबतच नागरी सेवांची स्वतंत्रता, आव्हाने, सुधारणा आदी बाबींच्या अनुषंगाने तयारी करावी. या घटकाच्या तयारीकरिता प्रशासकीय सुधारणा अहवाल, नागरी सेवा सुधारणांविषयक समित्या व समकालीन घडामोडी यांचा मागोवा घेत राहणे श्रेयस्कर ठरेल.

ग्रामीण विकास, शहरी विकास, प्रादेशिक विकास, आधारभूत संरचना विकास, इ. क्षेत्राकरिता धोरण निर्मितीचे कार्य करत असते. विविध योजनांची यशस्विता, कमजोरी, अडथळे, इ. बाबींच्या प्रकाशामध्ये अध्ययन करावे. तसेच या धोरणे, योजना व कार्यक्रम यांच्या सकारात्मक व नकारात्मक बाबी, त्यांची यशस्विता यासाठी सूचना करणे, या घटकाची तयारी करणे यासाठी पीआयबी संकेतस्थळ, इंडिया इअर बुक, योजना, कुरुक्षेत्र, इ. उपयुक्त ठरतात.

विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग यामध्ये गरसरकारी संघटना, स्वयं साहाय्यता गट यांची भूमिका, उद्दिष्टे या बाबींचा अभ्यास करावा. विविध क्षेत्रांमध्ये गरसरकारी संघटना व स्वयंसाहाय्यता गटांच्या यशस्वितेविषयीच्या केस स्टडीजविषयी जाणून घ्यावे. या योजनांची परिणामकारकता आदी बाबी अभ्यासाव्यात.

‘भूक व दारिद्रय़विषयक मुद्दे’ या अभ्यासघटकामध्ये दारिद्रय़, दारिद्रय़ाचे प्रकार, मापन, दारिद्रय़ रेषा, दारिद्रय़विषयक समित्या, त्यांच्या शिफारसी, दारिद्रय़ निर्मूलनविषयक उपाय, त्यांची परिणामकारकता, कमजोरी या बाबींचे अध्ययन करावे लागते.

‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा सामान्य अध्ययन पेपर २ मधील महत्त्वपूर्ण अभ्यासघटक आहे. सर्वप्रथम यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, उगम, विकास या बाबी अभ्यासाव्यात. त्यानंतर ‘भारतीय परराष्ट्र धोरणाचा विकास’ मागील काही दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर घडून आलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी उदा. शीतयुद्ध, अण्वस्त्र स्पर्धा, पर्यावरणाची समस्या. भारताने प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर पाडलेली भूमिका लक्षात घेणे श्रेयस्कर ठरते. भारताचे पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाल, इ. शेजारील देशांशी असलेले संबंध, महत्त्व, ऐतिहासिक पाश्र्वभूमी आदी बाबी लक्षात घेऊन अभ्यासावेत.

याबरोबरच भारताचे जगातील प्रगत राष्ट्रांबरोबरचे संबंध उदा. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इ. तसेच लोकशाहीवादी सरकार, दहशतवादाची समस्या, पर्यावरणीय वाटाघाटी, व्यापारविषयक वाद, स्पर्धा व सहकार्य आदी घटकांच्या पाश्र्वभूमीवर करावे. भारताचे विविध आंतरराष्ट्रीय; प्रादेशिक गटांबरोबरचे द्विपक्षीय संबंध उदा. भारत-आसियान, भारत-संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भारताचा सहभाग असणारे व भारताच्या हितसंबंधांना प्रभावित करणारे करार याविषयी जाणून घ्यावे.

विकसित, विकसनशील देशांची धोरणे यांचा भारताच्या हितसंबंधांवर होणारा परिणाम, इ. बाबींची तयारी करावी. परदेशात राहणारे भारतीय, ज्यांचे भारतासाठीचे योगदान ते ज्या देशात राहतात, तेथील त्यांच्या समस्या, भारतातील त्यांचे अधिकार आदी बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था उदा. संयुक्त राष्ट्रसंघ व त्यातील विविध निकाय, त्याची रचना, उद्दिष्टे, समर्पकता, सुधारणा तसेच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याविषयीची तयारी करावी.

‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या घटकाची तयारी वृत्तपत्रे व त्यातील आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र धोरण याविषयीचे लेख नियमित वाचावेत. याबरोबरच इंडियाज फॉरेन पॉलिसी-व्ही.पी.दत्त, पॅक्स इंडिका – शशी थरूर, वर्ल्ड फोकस मासिक अत्यंत उपयुक्त ठरतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 3:14 am

Web Title: upsc exam preparation akp 94 4
Next Stories
1 गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा  मराठी आणि इंग्रजी प्रश्नविश्लेषण
2 भारतीय शासन आणि राजकारण
3 कोरियातील शिक्षणसंस्कृती सोल नॅशनल युनिव्हर्सटिी, दक्षिण कोरिया.
Just Now!
X