यूपीएससी : मुख्य परीक्षा

या लेखात भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याची माहिती घेऊयात. या घटकाचे परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन कशा प्रकारे करावे याबरोबर या घटकावर गेल्या तीन मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०१५) कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते इत्यादी बाबीही जाणून घेऊयात..

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

अभ्यासक्रमामध्ये ‘भारत व जगाचा भूगोल’ असे नमूद केलेले आहे, म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. परीक्षेच्या दृष्टीने या विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकांसंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती आधी प्राप्त करणे क्रमप्राप्त ठरते.

या विषयाच्या सर्व घटकांची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी ‘एनसीईआरटी’च्या Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment (XI) या क्रमिक पुस्तकांचा आधार घेता येईल. ज्यामुळे या विषयाचे सोप्या भाषेत आकलन  होऊ शकते आणि ही माहिती अधिक सविस्तर करण्यासाठी – Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India, ­Comprehensive Geography ( by D. R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) यांसारख्या  संदर्भग्रंथांचा आधार घेता येईल.

या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात, ज्याआधारे तुम्ही कमीतकमी वेळेत हा घटक अभ्यासू शकता.  या विषयाच्या नोट्स तयार करताना हा घटक प्रथम अभ्यासावा व त्यानंतर या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे आकलन करून या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार काढाव्यात. स्वत:च्या अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे याचे मूल्यमापन करण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा. यामुळे  अभ्यासातील त्रुटी दूर करून अधिक  नेमकेपणाने उत्तरे लिहिण्याचा सराव करता येतो व चांगले गुण प्राप्त करता येतात. महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपल्याला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव असणे अधिक श्रेयस्कर ठरते, त्याचबरोबर  या विषयातील इतर घटकांचाही अभ्यास करावा लागतो, म्हणून अभ्यास हा परीक्षाभिमुख करणे उपयुक्त ठरते.

प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये चार, २०१४ मध्ये पाच आणि २०१५ मध्ये सहा प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही महत्त्वाचे प्रश्न पुढीलप्रमाणे होते..

२०१३ मुख्य परीक्षा :

  • भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.
  • अलीकडे पूर्व किनारपट्टीवर आलेले चक्रीवादळ हे फायलिन या नावाने संबोधले गेले होते. उष्णदेशीय चक्रीवादळांना प्रदेशनिहाय नावे कशी दिली जातात, याचा तपशील द्या.
  • उत्तर गोलार्धातील महत्त्वाची उष्ण वाळवंटे ही २० अंश-३० अंश डिग्री उत्तर अक्षांशमध्ये स्थित व खंडाच्या पश्चिमी बाजूनेच का असतात?
  • पश्चिम घाटाच्या तुलनेत, हिमालयात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात याची

कारणे कोणती?

  • पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांनी त्रिभुजप्रदेशाची निर्मिती केलेली नाही. का?

२०१४ मुख्य परीक्षा

  • हवामानसंबंधित सर्वाधिक असामान्य घडामोडी या ‘एल निनो’च्या प्रभावाचे फलित असतात असे स्पष्टीकरण दिले जाते. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का?
  • जगातील वली पर्वत हे खंडाच्या सीमासोबतच स्थित का असतात? तसेच वली पर्वतांचे जागतिक वितरण, भूकंप आणि ज्वालामुखी यांच्यामधील सहयोग उघड करा.
  • उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशांत मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात, कारण..
  • हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमानवाढीच्या लक्षणांचा संबंध उघड करा.
  • इंडोनेशिया आणि फिलिपिन्स द्वीपसमूहांमध्ये हजारो बेटांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करा.

२०१५ मुख्य परीक्षा

  • महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांचे स्पष्टीकरण द्या. हे प्रवाह कशा प्रकारे प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक प्रभावित करतात?
  • आíक्टक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आíथक महत्त्व कोणते आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात?

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न प्राकृतिक भूगोल या विषयावर विचारण्यात आलेले होते. सर्वप्रथम या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, पर्यावरण आणि हवामानसंबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांशी प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडींच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित वापर करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची र्सवकष तयारी करताना त्याबरोबर चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो. थोडक्यात, अभ्यासक्रमामध्ये नमूद असलेल्या घटकांच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी व अभ्यासाची दिशा निर्धारित करावी.

याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो. त्यामुळे हा घटक र्सवकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.