News Flash

जीवो जीवस्य जीवनम्

अलीकडच्या काळात जीवशास्त्राशी संबंधित विविध क्षेत्रे आणि नव्या विद्याशाखा विकसित झाल्या आहेत. क

| December 16, 2013 07:40 am

अलीकडच्या काळात जीवशास्त्राशी संबंधित विविध क्षेत्रे आणि नव्या विद्याशाखा विकसित झाल्या आहेत. करिअरचे नवे दार उघडून देणाऱ्या या अभ्यासक्रमांची आणि त्यातील विविध संधींची ओळख करून घेऊयात.
बायोइन्स्ट्रमेन्टेशन
बायोलॉजी आणि इन्स्ट्रमेन्टेशन या दोन विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. विविध प्रयोगशाळांमध्ये लागणारी जैविक उपकरणे आणि साधनांचा अभ्यास यात करण्यात येतो. या उपकरणांची निर्मिती, प्रत्यक्ष वापर, देखभाल, दुरुस्ती ही कौशल्ये या अभ्यासक्रमात शिकवली जातात. औषधनिर्मिती उद्योगक्षेत्राला या विषयातील तज्ज्ञांची कायम गरज भासत असते. जाधवपूर युनिव्हर्सटिी, बनारस िहदू विश्वविद्यापीठ, दिल्ली विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

बायोमेडिकल इंजिनीअिरग
विविध आजार व रोगनिदानासाठी उपयुक्त ठरणारी वैद्यकीय संसाधने/ उपकरणे (उदा- क्लिनिकल इक्विपमेन्ट, मायक्रो-इम्प्लान्ट्स, रिजनरेटिव्ह टिश्यू ग्रोथ, कॉमन इमेजिंग इन्स्ट्रमेन्ट्स- एमआरआय, फार्मास्युकिटल ड्रग्ज) तसेच रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा उपकरणांच्या आणि संसाधनांच्या अभ्यासाचा समावेश या अभ्यासक्रमात असतो. या अभ्यासक्रमात संगणक, ऑप्टिकल अ‍ॅनालायझर, एक्स रे या सर्वाचा उपयोग केला जातो.
संधी : ज्युनिअर रिसर्च फेलो, ट्रेनी इंजिनीअर, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी, बिझनेस मॅनेजर, प्रोफेसर बायोइन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअिरग, बायोमटेरिअल्स इंजिनीअिरग, सिस्टिम फिजिओलॉजी इंजिनीअर्स, रिसर्च सायन्टिस्ट, क्लिनिकल  इंजिनीअर्स, बायोमेकॅनिक्स इंजिनीअर्स.

व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी
राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी (बीव्हीएससी अ‍ॅण्ड एच) अभ्यासक्रमाला राज्य सरकारच्या सामायिक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. प्रवेशअर्ज नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर- ४४०००६ या पत्त्यावर मिळू शकतील.
बारावी परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी या विषयांत एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ४० टक्के.)
पत्ता- महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, हनुमान मंदिराजवळ, फुटाळा रोड, तेलंगखेडी, नागपूर- ४४०००१. वेबसाइट- www.mafsu.in
व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडिया
व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत देशातील शासनमान्य संस्थांतील बॅचलर ऑॅफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरावर ऑल इंडिया प्री-व्हेटरनरी टेस्ट (एआयपीव्हीटी) घेण्यात येते. या परीक्षेद्वारे संबंधित संस्थेतील १५ टक्के जागा भरण्यात येतात.  
अर्हता- या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराला बारावी विज्ञान परीक्षेत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. शिवाय तो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राखीव कोटय़ातील उमेदवारांना गुणामंध्ये १० टक्के सवलत देण्यात येते.  
‘एआयपीव्हीटी’ या परीक्षेद्वारे पुढील संस्थांमध्ये १५ टक्के जागा भरल्या जातील-
कॉलेज ऑफ व्हेटरनरी अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल सायन्स, परभणी. नागपूर व्हेटरनरी कॉलेज, नागपूर. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज, मुंबई. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स हैदराबाद. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, तिरुपती- आंध्र प्रदेश. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स गण्णावरम- आंध्र प्रदेश. फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्स गौहाटी- आसाम. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी दुर्ग- मध्य प्रदेश. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी आनंद – गुजराथ. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, सरदार कृषीनगर – गुजराथ. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी हिस्सार / हरियाणा. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, पालमपूर हिमाचल प्रदेश. फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, रांची, झारखंड. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स बेंगलुरू, कर्नाटक. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, बिदर, कर्नाटक. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, थ्रिसूर, केरळ. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, पुक्कोट, केरळ. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, जबलपूर, मध्य प्रदेश. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, महू, मध्य प्रदेश. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, ऐजवाल, मिझोराम. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, भूवनेश्वर, ओरिसा. राजीव गांधी कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, पुडूचेरी. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, लुधियाना, पंजाब. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, बिकानेर, राजस्थान. मद्रास व्हेटरनरी कॉलेज चेन्नई –  तामिळनाडू. व्हेटरनरी कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट, नामक्कल, तामिळनाडू. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, फैजाबाद, उत्तर प्रदेश.  कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी, मथुरा, उत्तर प्रदेश. कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स पंतनगर, उत्तराखंड. फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्स, कोलकता.
पत्ता- ऑफिस ऑफ कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडिया, ए िवग, सेकंड फ्लोअर, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, न्यू दिल्ली – ११००६६.
वेबसाइट- www.vci.ac.in,
ईमेल- vciinfo@vhub.ac.in
मेन्टल  हेल्थ अ‍ॅण्ड न्युरो सायन्स
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अ‍ॅण्ड न्युरो सायन्स ही केंद्र सरकारची संस्था असून तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था हा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-  
१) बॅचलर ऑफ सायन्स इन नìसग. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह बारावीमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण आवश्यक. अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे.  
२) बॅचलर ऑफ सायन्स इन रेडिओग्राफी. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांसह बारावीमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण आवश्यक. अभ्यासक्रमाचा कालावधी-  तीन वर्षे.
३) बॅचलर ऑफ सायन्स इन अ‍ॅनेस्थेशिआ टेक्नॉलॉजी. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह बारावीमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण आवश्यक. अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे.
पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अ‍ॅण्ड न्युरो सायन्स, पोस्ट बॉक्स क्रमांक- २९००, हौसर रोड, बेंगळुरू- ५६००२९
वेबसाइट- www.nimhans.kar.nic.in
ईमेल- cademic@nimhans.kar.nic.in

आरोग्यविज्ञान
मणिपाल विद्यापीठाने बारावीनंतरचे वैद्यक आणि आरोग्य विज्ञानाशी निगडित पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन न्यूक्लियर मेडिसन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन ऑप्टोमेट्री, बॅचलर ऑफ सायन्स इन रेस्पिरेटरी थेरपी, बॅचलर ऑफ सायन्स इन हेल्थ इन्फॉम्रेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल रेडिएशन थेरपी, बॅचलर ऑफ सायन्स इन काíडओव्हॅस्कुलर टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशन थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच थेरपी, बॅचलर ऑफ सायन्स इन नìसग, बॅचलर ऑफ फार्मसी या विषयांचा समावेश आहे.
पत्ता- मणिपाल युनिव्हर्सटिी, मणिपाल- ५७६ १०४ कनार्टक. वेबसाइट- www.manipal.edu,
ईमेल-   admissions@manipal.edu

 डेन्टल इंजिनीअिरग आणि डेन्टल मेकॅनिक्स
सविता युनिव्हर्सटिीने दंतवैद्यक शास्त्रातील नवे पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये
१)    डिप्लोमा इन डेन्टल इंजिनीअिरग. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
२)     सर्टििफकेट कोर्स इन डेन्टल मेकॅनिक्स. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.
३) सर्टििफकेट कोर्स इन डेन्टल नर्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.  
पत्ता- १६२, पूनामल्ले हाय रोड, चेन्नई- ६०००७७.
वेबसाइट-  www.saveetha.com
ईमेल-  admission@saveetha. com

ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी
भारती विद्यापीठाच्या (१) स्कूल ऑफ ऑप्टेमेट्री पुणे येथे बी. ऑप्टॉम (२) स्कूल ऑफ ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी पुणे येथे बीएएसएलपी (३) राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड बॉयोटेक्नॉलॉजी पुणे येथे बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांमधील प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्यात येते. पत्ता- भारती विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सटिी, भारती विद्यापीठ भवन, सेकंड फ्लोर, सीईटी डिपार्टमेंट, एलबीएस मार्ग, पुणे- ४११०३०.
वेबसाइट- www.bvunversity.edu.in,
www.bharatividyapeethuniversity.net

 पब्लिक हेल्थ मॅनेजमेन्ट
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सार्वजनिक आरोग्याशी निगडित विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे सुरू करण्यात आले आहेत.
१)     इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड पीएचडी इन क्लिनिकल रिसर्च. हा अभ्यासक्रम दिल्ली कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
२) इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड पीएचडी इन हेल्थ इन्फम्रेटिक्स. हा अभ्यासक्रम हैदराबाद कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ मॅनेजमेन्ट. हा अभ्यासक्रम दिल्ली दिल्ली, गांधीनगर, हैदराबाद आणि भूवनेश्वर कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
४)     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ इकोनॉमिक्स, हेल्थ केअर फायनािन्सग अ‍ॅण्ड हेल्थ पॉलिसी. हा अभ्यासक्रम दिल्ली कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
५)     पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायोस्टॅटिस्टिक्स अ‍ॅण्ड डाटा मॅनेजमेन्ट. हा अभ्यासक्रम हैदराबाद कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
पत्ता- मॅनेजर अकॅडेमिक प्रोग्राम, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूट ऑफ स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट, ४ इन्स्टिटय़ूशन एरिआ, वसंत कुंज, न्यू दिल्ली- ११००७०. ईमेल- acad@phfi.org,
वेबसाइट- www.phfi.org
अ‍ॅग्रिकल्चरल इन्फॉम्रेटिक्स
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंटमार्फत पोस्ट ग्रॅज्युएट इन अ‍ॅग्रिकल्चरल इन्फॉम्रेटिक्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा आहे. माहितीतंत्रज्ञान आधारित कृषीविस्तार सेवा आणि उत्पादनांच्या निर्मितीसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कृषीशास्त्र, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांचे एकात्मिक प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमासाठी अर्हता- कृषी, मत्स्य, पशू, दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील प्रथम श्रेणीतील पदवी किंवा वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञानशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, ग्राऊंड फ्लोअर, नीला बििल्डग टेक्नॉलॉजी, थिरुवनंतपूरम ६९५५८१.
वेबसाईट- www.iiftmk.ac.in

आयुर्वेदिक औषधशास्त्र
आयुर्वेदिक औषधांची दुकाने सहजतेने दिसत नाही. अ‍ॅलोपॅथी औषधांचे दुकान टाकण्यासाठी डी फार्म किंवा बी फार्म हे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्याचप्रमाणे आयुर्वेद औषधांचे दुकान टाकण्यासाठीही अभ्यासक्रम करावा लागतो. असे दोन अभ्यासक्रम मानव भारती युनिव्हर्सिटीने सुरू केले आहेत.
१)     बॅचलर ऑफ आयुर्वेदिक फार्मसी. हा चार वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. बारावीमध्ये जीवशास्त्र विषय घेतलेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम करता येतो.
२)     डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी. हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- दहावी. पत्ता- मानव भारती युनिव्हर्सिटी, लाड्डो, सुलतानपूर, सोलान, हिमाचल प्रदेश. १७३२२९.
मेल- manavbhartiuniversity@gmail.com
वेबसाइट- www.manavbhartiuniversity.edu.in

 हेल्थकेअर मॅनेजमेंट
आपल्या देशातील आरोग्यविषयक विविध प्रकारच्या सुविधा आणि सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय संस्था या कॉर्पोरेट व्यवस्थापनाच्या कार्यशैलीनुसार चालवल्या जातात. या संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयातील तज्ज्ञांची वाढती गरज लक्षात घेता इन्स्टिटय़ूट ऑफ क्लिनिकल रिसर्च इंडियाने पुढील विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
१) मास्टर्स इन हेल्थ ऑपरेशन्स- अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. २)  पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ केअर मॅनेजमेंट- अभ्यासक्रमाचा कालावधी- १० महिने ३) अ‍ॅडव्हान्स्ड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल टुरिझम – अभ्यासक्रमाचा कालावधी- १० महिने
या सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्हता- बीएस्सी इन लाइफ सायन्स, बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी, बीडीएस, बी फार्म, बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस. संबंधित उमेदवारांना सरासरीने ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
पत्ता-  सी ९, सेंट्रल रोड नंबर २२- एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, मरोळ, अंधेरी पूर्व मुंबई- ४०००९३  वेबसाइट- www.icrihealth.com

 कृषी अभ्यासक्रम
महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असलेले अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत :
१)    डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. या विद्यापीठामध्ये बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), बीएस्सी (फॉरेस्ट्री),  एमएस्सी (कृषी), पीएचडी (कृषी), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), एमटेक (कृषी अभियांत्रिकी) हे अभ्यासक्रम करण्याची सोय आहे.
या विद्यापीठांतर्गत अकोला, नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम या जिल्हय़ांतील कृषी महाविद्यालयांचा समावेश होतो.
२)    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी- ४१३७२२ जिल्हा अहमदनगर. या विद्यापीठामध्ये बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), एमएस्सी (कृषी), एमएस्सी (कृषी)- कृषी व्यवसाय व्यवस्थापन, पीएचडी (कृषी), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), एमटेक (कृषी अभियांत्रिकी) हे अभ्यासक्रम करण्याची सोय आहे.
या विद्यापीठांतर्गत पुणे, कोल्हापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नंदुरबार या जिल्हय़ांतील कृषी महाविद्यालयांचा समावेश होतो.
३)    मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी- ४३१४०२. या विद्यापीठामध्ये बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), एमएस्सी (कृषी), पीएचडी (कृषी), बीटेक (फूड सायन्स), एम टेक (फूड सायन्स), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), एमटेक (कृषी अभियांत्रिकी), बीएस्सी (होम सायन्स), एम एस्सी (होम सायन्स), पीएचडी (होम सायन्स) हे अभ्यासक्रम करण्याची सोय आहे.
या विद्यापीठांतर्गत परभणी, िहगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद या जिल्हय़ांतील कृषी महाविद्यालयांचा समावेश होतो.
४)    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली- ४१५७१२ जिल्हा रत्नागिरी. या विद्यापीठामध्ये बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), एमएस्सी (कृषी), बीएस्सी (फॉरेस्ट्री), पीएचडी (कृषी), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (बीएएफएस्सी), मास्टर ऑफ फिशरी सायन्स(एमएफएस्सी), पीएचडी (फिशरी) हे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा आहे.
या विद्यापीठांतार्गत ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हय़ांतील कृषी महाविद्यालयांचा समावेश होतो.
अर्हता :
१)     बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), बीएस्सी (फॉरेस्ट्री), बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (बीएफएस्सी): बारावी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी)
२)     बीटेक (कृषी अभियांत्रिकी) : बारावी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी)
३)     बीएस्सी (होम सायन्स) : बारावी. विज्ञान/कला/वाणिज्य
४)     बीटेक (फूड सायन्स) : बारावी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी)
५)     एमएस्सी (कृषी), एमटेक (कृषी अभियांत्रिकी), एम टेक (फूड सायन्स), एम एस्सी (होम सायन्स) एमएफएस्सी :  संबंधित विषयातील पदवी.
६)     एमएस्सी- कृषी व्यवसाय व्यवस्थापन : बीएस्सी (कृषी), बीएस्सी (फलोद्यान), बीएस्सी (फॉरेस्ट्री), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बीव्ही एस्सी अ‍ॅण्ड एच, बीटेक (फूड सायन्स), बीटेक (डेअरी टेक्नॉलॉजी).
७)     पीएचडी :  संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
८)     स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर – इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सटिी : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लान्टेशन मॅनेजमेंट . डिप्लोमा ऑफ व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रॉडक्टस् फ्रॉम सिरिअल्स, पल्सेस अ‍ॅण्ड ऑइलसीडस् . डिप्लोमा ऑफ व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रॉडक्टस फ्रॉम फ्रुटस अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स. डिप्लोमा ऑफ मीट टेक्नॉलॉजी . डिप्लोमा ऑफ फिश प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी. पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट इन अ‍ॅग्रिकल्चरल पॉलिसी . सर्टििफकेट इन ऑर्गनिक फाìमग. सर्टििफकेट इन वॉटर हार्वेिस्टग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट. सर्टििफकेट इन पोल्ट्री फाìमग, बी-कीिपग. सर्टििफकेट इन अ‍ॅन इंटिग्रेटेड पोस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी पोटॅटो कल्टिवेशन.
संपर्क- मेल- soa@ignou.ac.in इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मदान घारी, नवी दिल्ली – ११००६८

खासगी वैद्यकीय महाविद्यालये
असोशिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड  प्रायव्हेट मेडिकल अ‍ॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, या संस्थेमार्फत राज्यातील खासगी वैद्यकीय  महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मेडिकल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट- असो. सीईटी घेण्यात येते. ही परीक्षा साधारणत: मे महिन्यात घेतली जाते. या परीक्षेद्वारे १२१ महाविद्यालयांतील ६६१० जागा भरल्या जातील. यामध्ये ९ एमबीबीएस महाविद्यालयांतील १०२० जागा, १८ डेंटल महाविद्यालयांतील १५४० जागा, २९ बीएएमएस महाविद्यालयांतील १४४० जागा, १२ फिजिओथेरेपी महाविद्यालयांतील ३७० जागा, ५३ नìसग महाविद्यालयांतील २२४० जागा भरण्यात येतात. (या जागा २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांतील आहेत. दरवर्षी यात वाढ होऊ शकते.)
पत्ता- असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, एएमयूपीएमडीसी ऑफिस, श्रीजी हाऊस, ७५, िमट रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१.
वेबसाईट- www.amupmdc.org,
ईमेल-  contact@amupmdc.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2013 7:40 am

Web Title: various sectors related to biology
Next Stories
1 जीवशास्त्राशी निगडित क्षेत्रे
2 कल्पनेची भरारी
3 एमपीएससी (पूर्वपरीक्षा) : जगाचा आर्थिक भूगोल
Just Now!
X