महेंद्र दामले

विद्यार्थी मित्रहो, कलेचा करिअररंग या लेखमालेत काही महिन्यांपूर्वी आपण लुक डिझायनरविषयी माहिती घेतली. या लेखात सिनेमा आणि नाटकाच्या पात्रांसाठी योग्य शरीरयष्टी, अभिनयगुण आणि चेहरा यांची निवड करून, त्यास योग्य पोशाख, इतर आवश्यक वस्तूंचा साज चढवून नटाला पात्राच्या रूपात पाहण्याची, कल्पिण्याची कला आणि क्षमता याबाबत चर्चा केली होती. आज याच्याशीच संबंधित कलेबद्दल आपण बोलणार आहोत. ही कला आहे, मेकअप करण्याची. मेकअप या गोष्टीसंबंधी अनेक गैरसमज होते, काही आहेतही तरीही मेकअप करणं मात्र आपण काही सोडलेलं नाही. आज आपण सिनेमा आणि नाटकातील मेकअप कलेकडे, तिच्या उपयोगाकडे, वापराकडे पाहणार आहोत. जोडीलाच याचा फाइन आर्टशी कशा प्रकारे संबंध आहे, त्यावर विवेचन येईलच.

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…

मेकअप या कलेत चेहरा आणि शरीराचा दर्शनीय भाग याला रंग, केस किंवा त्वचेची आवरणे देऊन पात्राला साजेसं रूप निर्माण करणं हा भाग असतो. याखेरीज कवळी, चिरूट, चष्मा, कानातले, गळ्यातले अशी अनेक आभूषणं असतात. हे सगळं करताना नटाचा चेहरा, शरीर हे जर पात्राच्या दिसण्याला योग्य असेल तर ठीकच नाहीतर त्यात भर घालावी लागते. काही वेळा चेहऱ्याचा काही भाग लपवावा लागतो. मेकअप म्हणजे एक प्रकारचा आभास निर्माण करणे आहे. फाइन आर्टच्या शिक्षणात आपण व्यक्तिचित्रण, पोट्र्रेट पेंटिंग, पूर्ण शरीराचं शिल्प करणं या गोष्टी शिकत असतो. त्यामध्ये माणसाच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या छायाप्रकाशाचे खेळ, त्यातून दिसणाऱ्या रंगछटा, ते रंगवण्याची कला शिकवली जाते. शिल्पकलेत चेहऱ्याचा, शरीराचा त्रिमित आकार, पोत वगैरे गोष्टींची माहिती होते. थोडक्यात चित्र आणि शिल्प यामध्ये एक आभासच निर्माण केला जातो. एखाद्या वस्तूचं चित्र काढणं किंवा शिल्प कोरणं म्हणजे चित्र किंवा नव्हे ती वस्तूच प्रत्यक्ष असल्याचा आभास निर्माण करणं असतं. हेच मेकअपचंही आहे. मेकअप ही अत्यंत सूक्ष्म पातळीवरील कला आहे. बॅटमॅन मालिका आणि सिनेमातील अजरामर जोकर, लॉर्ड ऑफ द िरग्स मालिकांमधील अनेक पात्रं, रॉबिन विल्यम्सची मिसेस डाऊटफायर ही सगळी मेकअपची कमाल. आपल्याकडेही चाची ४२० मधला कमल हसन आणि ‘पा’ मधला अमिताभ यांचे मेकअप आणि त्यातून होणारा रूपबदल साऱ्यांच्याच लक्षात असतील. दरवेळी इतक्या आमूलाग्र पद्धतीचे बदल करायचे नसले तरीही नटाची वास्तवातील त्वचा, तिचा रंग, पोत, केस आदींची रचना पात्राच्या रचनेप्रमाणे करावीच लागते. ती अनेकदा इतकी तरल असते की, मेकअप केला आहे हे लक्षातच येत नाही. रजनीकांतचे सिनेमे आणि त्यांचे प्रत्यक्षातील फोटो पाहिल्यास मेकअपची करामत सहज जाणवते. कपूर अँड सन्समधील ऋषी कपूर, धूममधील हृतिक रोशन, १०२नॉट आऊटमधील अमिताभ आणि ऋषी कपूर, भयपटांतील पात्रं अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मेकअपसोबतच चित्रपटात वापरले जाणारे स्पेशल इफेक्ट्ससुद्धा या मेकअपचा परिणाम अधिक प्रभावी करतात.

मुळातच फाइन आर्टच्या शिक्षणात माणसाची शरीररचना, निरनिराळ्या अवस्थांतील जडणघडण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. मेकअपचा करिअर म्हणून विचार करताना या शिदोरीचा उपयोग होतो. अर्थात मेकअप ही कला चित्रकलेसारखी एकांतात किंवा स्वान्तसुखाय, आपल्या वेळेनुसार करता येईल अशी कला नाही. इथे पावलोपावली दुसऱ्या व्यक्तीसोबत कलाकाराला काम करावं लागतं. मुळात चित्रकार ज्या कॅनव्हासवर चित्र काढतो, तो निर्जिव असतो. पण मेकअप ज्या व्यक्तीवर केला जातो ती कायमच सजीव असते. त्यामुळेच व्यक्तींसोबत काम करताना पाळावयाची शिस्त, व्यावसायिकता या गुणांची गरज मेकअप आर्टस्टिला असते.

नाटक किंवा सिनेमाचं शिक्षण देणाऱ्या संस्था मेकअपचं शिक्षण देत नाहीत. अगदी आत्ताआत्तापर्यंत आपल्याकडे कुणाला मेकअप शिकायचा असेल तर मोठय़ा मेकअपमनकडे शागिर्दी करूनच ती कला शिकावी लागत होती. आता तसं नाही. अनेक इन्स्टिटय़ूट्समध्ये मेकअपच्या विविध अंगांचं शिक्षण मिळतं. त्यात फॅशन, ब्रायडल मेकअप, पर्सनल मेकअप, प्रोस्थेटिक मेकअप, हेअर स्टायिलग अशा अनेक शाखा अभ्यासता येतात.

मेकअप हा व्यक्तीवर केला जातो. त्यामुळे त्याची साधने ही मानवी शरीराला हानीकारक असता उपयोगाचं नसतं. त्यामुळेच आपण वापरत असलेल्या साधनांसाठी कोणता कच्चा माल वापरला जातो, कोणत्या साधनांचा वापर होतो, याबद्दलही मेकअप आर्टस्टिला माहिती असणं आवश्यक असतं. त्यामुळेच या अर्थाने कला आणि विज्ञान यांचं मेकअप कलेमध्ये मिश्रण होतं. कोणतीही कला तिचं मर्म कळल्यावर यशस्वीरीत्या करिअरमध्ये विकसित करता येते. फाइन आर्टचं हे वेगळंच रूपांतरण समाधान आणि निर्मितीचा आनंद दोन्ही देऊ शकतं.