यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययनाच्या पेपर १ मध्ये भारतीय समाजातील ज्वलंत मुद्दे या अभ्यासघटकांतर्गत दारिद्रय़ आणि उपासमार या उपघटकांचा अंतर्भाव आहे. या संबंधित मुद्दय़ांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट करणारा लेख-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील महिन्यात झालेल्या यूपीएससीच्या लेखी परीक्षेत दारिद्रय़ आणि उपासमार या उपघटकावर प्रश्न विचारलेला होता. दारिद्रय़ हे लोकसंख्यावाढीचे कारण ठरू शकते का किंवा लोकसंख्या दारिद्रय़वाढीचे कारण आहे का, याचे चिकित्सक परीक्षण करण्यासंबंधी तो प्रश्न होता. अर्थात दारिद्रय़ आणि लोकसंख्यावाढ  यांच्यातील परस्परपूरक कार्यकारण संबंध तपासणे अपेक्षित होते.

दारिद्रय़ाची समस्या भारतापुरती मर्यादित न राहता या समस्येने वैश्विक रूप धारण केल्याचे दिसते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाने २००० या वर्षी सहस्रकातील विकासाची ध्येये निश्चित केली होती. त्यातील प्रमुख ध्येय म्हणून दारिद्रय़ आणि उपासमारी यांचे एकूण प्रमाण निम्म्यावर आणण्याचा प्राधान्याने अंतर्भाव केलेला होता.

संयुक्त राष्ट्र संघाने सहस्रकातील विकासाची ठरविलेली उद्दिष्टय़े पूर्ण करण्यात शासकीय पातळीवर देशाच्या उपलब्धीचे प्रमाण याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. दारिद्रय़रेषेखालील लोकांचे प्रमाण माहिती करून घेणे, दारिद्रय़रेषेपासून दारिद्रय़ाच्या अंतराचा दर तपासणे, तसेच राष्ट्रीय उपभोगामधील वाटा शोधून त्यातील सरकारची कामगिरी निश्चित करता येते आणि येणारे गतिरोधही समजून घ्यावेत. यासंबंधी आंतरराष्ट्रीय दबाव पाहता गेल्या

१५ वर्षांत देशात शासकीय स्तरावर अनेक कृतिकार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करण्यात मोठा पुढाकार घेतला गेला असल्याचे दिसते. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामीण आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, इंदिरा आवास योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुज्जीवन योजना अशा कित्येक योजना आजपर्यंत सरकारने हाती घेतल्या आहेत. त्यामुळे दारिद्रय़ासंदर्भात अशा योजनांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

दारिद्रय़ाची संकल्पनात्मक धारणा केवळ आíथक नसून ती सामाजिक आहे. उदरनिर्वाहाची किमान साधने उपलब्ध नसणे किंवा ती तुटपुंजी असणे या बाबी आíथक दारिद्रय़ामध्ये मोडतात. कोणतीही आíथक प्रक्रिया कधीच सुटी आणि स्वायत्त नसते. व्यक्तीच्या अस्तित्वाला आíथकतेसोबत सामाजिक, राजकीय असे अनेकविध पलू चिकटलेले असतात. वेगळ्या शब्दांत समाजाची सर्व अंगे आणि त्या अंगांमध्ये घडून येणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया व्यक्तीच्या अस्तित्वात समाविष्ट झालेल्या असतात.

या अर्थाने दारिद्रय़ाला सामाजिक पदर आहे. भारतीय संदर्भात दारिद्रय़ाची मुळे जात, वर्ग, प्रदेश, िलग, भाषा, शिक्षण, आरोग्य इ. सामाजिक घटकांमध्ये सापडतात. भारतात व्यक्तींचे सामाजिक स्थान वरील सामाजिक घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच दारिद्रय़ाची कारणे सामाजिक घटकांच्या परस्पर प्रक्रियेत शोधावी लागतात.

भारताने कल्याणकारी प्रारूप स्वीकारूनसुद्धा दारिद्रय़ाची समस्या कायम राहिली. काँग्रेस राजवटीत ‘गरिबी हटावो’सारखे दारिद्रय़ निर्मूलनाचे कार्यक्रम राबवून समस्या पूर्णत: हटली नाही. वर्तमानातही राज्यसंस्थेची धोरणे आणि कृतिकार्यक्रम राबवले जात आहेत. दारिद्रय़ाची समस्या आटोक्यात आणताना धोरणांच्या अंमलबजावणीत अडथळे आणणाऱ्या धोरणात्मक कच्च्या दुव्यांचाही विचार करावा लागतो.

भारताची अर्थव्यवस्था विकसित होताना समांतरपणे दारिद्रय़, उपासमार वाढताना दिसते. अर्थव्यवस्था वृद्धीभिमुख असावी की विकासाभिमुख यातील अंतर्वरिोधातून दारिद्रय़, उपासमारी यांसारख्या समस्या निपजतात का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरते. परिणामी, योग्य आणि अचूक उपाययोजना कोणत्या असू शकतील याचा अंदाज बांधता येतो.

काही अभ्यासक दारिद्रय़ आणि उपासमारीचे कारण लोकसंख्या वृद्धीत दाखवतात. याउलट काहींच्या मते, लोकसंख्या वाढ ही समस्या नसून संसाधने विशिष्ट वर्गाकडे केंद्रित झाल्याने उरलेल्या बहुसंख्य लोकसंख्येकडे संसाधनांची कमतरता जाणवते. त्यातून दारिद्रय़, उपासमारीची समस्या जन्माला येतात. असे विभिन्न दृष्टिकोन लक्षात घेतल्याशिवाय दारिद्रय़ाची कारणे शोधता येणार नाहीत.

वास्तविक पाहता दारिद्रय़ निर्मूलन ही सर्वसमावेशक विकासाची पूर्वअट मानून या सामाजिक संकल्पनेचा अभ्यास करावा लागतो. व्यक्तीच्या अस्तित्वासाठी किमान मूलभूत गरजा आवश्यक असतात. मात्र, त्या पूर्ण करण्यासाठी संसाधने कमी पडतात. या अवस्थेला ढोबळमानाने दारिद्रय़ म्हणता येईल. देशकालपरत्वे तिचा अर्थ व स्वरूप बदलू शकते. या अर्थाने ही संकल्पना परिस्थितीसापेक्ष आहे.

अंतिम दारिद्रय़ामध्ये अर्थ, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या किमान गरजांचाही अभाव असतो. या प्रकारचे दारिद्रय़ विकसनशील, अर्धविकसित आणि अविकसित राष्ट्रांमध्ये सर्रास आढळून येते. विकसित राष्ट्रांमध्ये अल्पकालीन दारिद्रय़ दिसून येते. ते अंतिम दारिद्रय़ाच्या उलट असते. मंदीच्या परिणामातून काही काळापुरता आíथक पेचप्रसंग अशा देशातील मध्यमवर्गीयांसमोर येतो. त्यांची अर्थव्यवस्था पूर्ववत झाली की त्यांचे पेचप्रसंगही सुटून जातात.

दारिद्रय़ मोजमापामध्ये आयुर्मानाची सरासरी, मृत्युदर, मातृत्व, पिण्याचे सुरक्षित पाणी, साक्षरता, शुद्ध हवा, स्त्री सक्षमीकरण, ऊर्जा उपभोग, मालमत्ता धारण, स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सुविधा, स्वच्छ परिसर इ. बाबी महत्त्वाच्या ठरतात. दारिद्रय़ाची रेषा भारतात दरडोई प्रतिमाह व्यक्तिगत उपभोगाच्या खर्चाची पातळी आणि दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोगाच्या पातळीवरून निर्धारित केली जाते.

अंतिम दारिद्रय़ाची मोजपट्टी काय असावी आणि दारिद्रय़रेषा ठरविण्याचे मापदंड काय असावेत, यावर अनेक समित्या आणि आयोग नेमले गेले. भारतात १९६२ मध्ये अधिकृतरीत्या ग्रामीण कुटुंबाचे मासिक उत्पन्न ११० रुपये आणि शहर पातळीवर १२५ रुपये अशी दारिद्रय़ाची रेषा निश्चित केली होती.

पुढे दांडेकर आणि रथ, बर्धन, वैद्यनाथन, भट्टी, अहलुवालिया, महेंद्र देव, मिनहास-जैन-तेंडुलकर, रोहिणी नायर, काकवाणी आणि सुब्बाराव, सुरेश तेंडुलकर, एन. सी. सक्सेना, अर्जुन सेन गुप्ता, अभिजित सेन, नरेंद्र जाधव यांनी वेळोवेळी दारिद्रय़ाची रेषा आणि प्रमाण ठरविण्यात योगदान दिले.

कित्येक वेळा शासनाने परस्परविरोधी आयोग नेमलेले दिसतात. त्यावर मागील काही वर्षांमध्ये वादही झाले. यावर नजर टाकून दारिद्रय़ाची समस्या आणि तिच्या निर्मूलनासाठी आखलेली ध्येयधोरणे समजून घेता येतात.

दारिद्रय़ाची कारणे समजून घेताना त्यामध्ये अविकसित अर्थव्यवस्था, असमानता, आíथक वाढीचा कमी दर, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील कमकुवत कामगिरी, महागाई, सामाजिक आणि राजकीय घटक यांचाही अभ्यास करावा लागतो.

जलद आíथक वाढ, संवíधत कृषी आणि औद्योगिक विकास, छोटय़ा आणि कुटिरोद्योगांचा विकास, जमीन सुधारणा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेची सुधारणा, लोकसंख्येवर नियंत्रण, सामान्य सेवा आणि सामाजिक सुरक्षेच्या तरतुदी, स्त्रियांच्या दर्जातील सुधारणा, उत्तम प्रशासकीय संरचना या उपाययोजनांशिवाय दारिद्रय़ाची समस्या आटोक्यात आणता येणार नाही.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article upsc exam recent issue question
First published on: 18-01-2016 at 01:30 IST