ग्रामीण व नागरी स्थनिक शासन

स्थानिक शासनामध्ये ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्त्व समजून घेण्यासाठी याद्वारे स्थानिक प्रशासनाचा विकास व सबलीकरण कशा प्रकारे साधण्यात आले याचा आढावा घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने पंचायत राज संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांच्या अहवालातील ठळक मुद्दे विचारात घ्यावेत.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचे मतदारसंघ, सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, समित्या इत्यादींच्या नोट्स तुलनात्मक टेबलमध्ये काढता येतील. जिल्हा स्तर ते पंचायत स्तरापर्यंत महसूल, विकास व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची उतरंड, त्यांची काय्रे, जबाबदाऱ्या, अधिकार यांचा टेबलमध्ये आढावा घेता येईल.

नागरी स्थानिक शासनातील महानगरपालिका, नगरपरिषद व कटक मंडळे यांचे स्वरूप, रचना, काय्रे, अधिकार व जबाबदाऱ्या या अनुषंगाने अभ्यास करावा. नागरी स्थानिक शासन प्रकारासाठीचे निकष समजून घ्यायला हवेत. यामध्ये मुंबईचा नगरपाल (शेरीफ) यांचे विशिष्ट स्थान, अधिकार व कर्तव्ये यांचा स्वतंत्र आढावा घ्यावा.

राजकीय पक्ष व दबाव गट

राजकीय पक्ष  व दबाव गट (pressure groups) यांच्याबाबत पाहायचे मुद्दे लक्षात घेऊ

  • राष्ट्रीय पक्षांची स्थापना
  • अजेंडा.
  • त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे व मुद्दे. प्रादेशिक पक्षाच्या स्थापनेमागील कारणे.
  • वाटचालीतील ठळक टप्पे.
  • महत्त्वाचे नेते व मुद्दे, प्रादेशिक पक्षांचा अभ्यास हा महाराष्ट्रातील पक्षांचा अभ्यास आहे हे गृहीत धरावे. याबाबत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदीबाबतच्या घटनादुरुस्त्या.

निवडणूक प्रक्रिया

निवडणूक प्रक्रियेमध्ये आयोगांची रचना, काय्रे, अधिकार आयोगाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, नियम व त्यांचे यशापयश यांचा अभ्यास आवश्यक आहे. या वस्तुनिष्ठ बाबी अचूक करायच्या आहेत. मतदानाचा काळ, मतदारावर प्रभाव टाकणारे घटक, आयोगासमोरची समस्या संकल्पनात्मक मुद्दे आहेत. त्यांच्याबाबतीत विश्लेषणात्मक अभ्यास गरजेचा आहे.

प्रसारमाध्यमे   

प्रसारमाध्यमे (Media) या घटकामधील Press Council of India ची रचना, काय्रे, कौन्सिलने जाहीर केलेली नीती तत्त्वे (code of conduct) अभ्यासणे आवश्यक आहे. महिलांची माध्यमातील प्रतिमा निर्मिती (prortrayal) हा भाग विश्लेषणात्मक व मूल्यात्मक (ethical/moral) आहे. याबाबत वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्सवरील गांभीर्यपूर्ण चर्चा, इंटरनेटवरील लेख यांचा अभ्यास करून स्वत:चे चिंतन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय तसेच चालू घडामोडी पाहणे आवश्यक आहे.

शिक्षणव्यवस्था  

शिक्षणव्यवस्था या घटकाच्या मध्ये शिक्षणाबाबतच्या घटनेतील तरतुदी, घटनादुरुस्त्या हा पूर्णपणे राज्यव्यवस्थेतील भाग आहे. शिक्षणाबाबतची मार्गदर्शक त्तत्वे, मूलभूत कर्तव्ये यांच्या मागील उद्देश व त्यांचे निहीतार्थ व्यवस्थित समजून घ्यावेत. सर्व शिक्षा अभियान व माध्यान्ह भोजन योजना तसेच राज्य शासनाच्या शिक्षणविषयक विविध योजना यांच्या तरतूदी माहित असायल हव्यात.

राजकीय यंत्रणा – कार्यकारी घटक

यामध्ये प्रत्यक्ष प्रशासन व शासन धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व त्यासंबंधी विविध घटकांचा समावेश होतो. केंद्र व राज्य शासनाची निवड, रचना, काय्रे, अधिकार, कार्यपद्धती, या बाबी तथ्यात्मक आणि संकल्पनात्मक आहेत. या व्यवस्थित समजून घ्याव्यात. लोकसभा / राज्यसभा / विधानमंडळे यांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, काय्रे, अधिकार यांचा आढावा घ्यावा. न्यायपालिकेची उतरंड, नेमणूका, महाभियोग, विशेषाधिकार समजून घ्यावेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचनेचा भाग पेपर १ मधून अभ्यासावा. राज्याची विविध संचालनालये तसेच प्रशिक्षण संस्थांची स्थापना, उद्देश, त्यांचे कार्य, रचना, बोधचिन्ह/वाक्य माहित असावेत.

पुढील लेखांमध्ये राज्यव्यवस्था घटकाच्या विश्लेषणात्मक उप घटकाचा अभ्यास करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. अभ्यासक्रम विभाजित करून प्रत्येक विभागाच्या अभ्यासाची पद्धत निश्चित करून घेतल्याने अभ्यास सुटसुटीतपणे करता येतो. संकल्पनात्मक भाग समजून घेतल्यावर अभ्यासाचा पुढील टप्पा विश्लेषणात्मक भाग आहे. अशा टप्प्यांतून तयारी केली तर त्याचा नक्कीच फायदा होतो.