आयसीडीएस हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येते. आयसीडीएस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरूपात पुरवण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
  • आयसीडीएस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी झोपडपट्टय़ामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्प्याटप्प्याने विस्तारली आहे.
  • राज्यात आयसीडीएस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण, ८५ आदिवासी विभागात आणि १०४ शहरी झोपडपट्टय़ांमध्ये आहेत.
  • या योजनेंतर्गत लाभार्थीना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा

पूरक पोषण आहार

लसीकरण

आरोग्य तपासणी

संदर्भ आरोग्य सेवा

अनौपचारिक शालापूर्व शिक्षण

पोषण आणि आरोग्य शिक्षण

  • काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना.
  • या उपक्रमांतर्गत शालापूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरविले जाते.
  • या घटकांना लक्षात घेऊन आणि भारत शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून महाराष्ट्र शासनानेदेखील प्रायोगिक तत्त्वावर ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्हय़ांमध्ये ६०० पाळणाघरे सुरू केली आहेत.

https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/homecontent/schemes.php

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Integrated child development service scheme icds
First published on: 23-11-2017 at 01:15 IST