भारत इलेक्ट्रॉनिक्स, बंगलोर येथे डेप्युटी इंजिनीअर्सच्या ३ जागा- 

उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अथवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या www.bel-indian.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१७.

इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर),नवी दिल्ली

िहदी प्राध्यापकांना/िहदी शिक्षकांना प्रति नियुक्तीवर परदेशात पाठविण्यासाठी निवड करणार आहे.

पात्रता –

(१) िहदी प्राध्यापक – िहदी भाषेतील पीएचडी  ८/१० वर्षांचा विद्यापीठात शिकविण्याचा अनुभव.

(२) िहदी शिक्षक – िहदी भाषेतील एमए/एमएड पदव्युत्तर पदवी किमान ६५ टक्के गुणांसह फक्त िहदी शिक्षकांना आपल्या पती/पत्नीला सरकारच्या खर्चाने सोबत नेता येईल.

विहित नमुन्यातील अर्ज (www.iccr.gov.in http://www.iccr.gov.in वर उपलब्ध) दि. १३ जानेवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात पुढील पदांची भरती.

(१) साहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (३८ पदे), पात्रता – मत्स्य विज्ञान विषयातील पदवी. (२) यांत्रिकी निदेशक (२ पदे), पात्रता – डिझेल मेकॅनिकमधील एनसीव्हीटी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी. (३) सांख्यिकी साहाय्यक (३ पदे),

पात्रता – गणित/अर्थशास्त्र/ सांख्यिकी विषयातील पदवी. (४) कनिष्ठ लिपिक/वसुली साहाय्यक/रोखपाल/मत्स्यक्षेत्र प्रगणक/लिपिक टंकलेखक (७ पदे),

पात्रता – १०वी उत्तीर्ण  ३० श.प्र.मि. मराठी/ ४० श.प्र.मि. इंग्रजी टायिपगचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

विस्तृत जाहिरात http://exams.chanakyasoft.in/fisheries तसेच http://fisheries.maharashtra.gov.i या संकेतस्थळांवर उपलब्ध.

ऑनलाइन अर्ज http://exams.chanakyasoft.in/fisheries या संकेतस्थळावर दि. १४ जानेवारी २०१७ पर्यंत करावेत.

नौदल गोदी, मुंबई येथे चार्जमनच्या ५२१ जागा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जदारांनी गणित, भौतिकशास्त्र वा रसायनशास्त्र यांसारख्या विषयांसह बीएस्सी पदवी अथवा अभियांत्रिकी विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी, मुंबईची जाहिरात पहावी अथवा नौदल गोदीच्या www.jobsuchi.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०१७.