नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, हैदराबाद येथे संशोधकांच्या १४ जागा-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जदार विज्ञान विषयातील पीएच.डी. पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, हैदराबादची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ngri.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७.

उत्तर रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाइड्ससाठी १४ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत व त्यांनी स्काऊट आणि गाइडमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३१ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ६ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा उत्तर रेल्वेच्या  http://www.sgc.rrcnr.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१७.

एक्स-सव्‍‌र्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीमअंतर्गत धुळे येथे रक्षक म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एक्स सव्‍‌र्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम, धुळेची जाहिरात पाहावी अथवा http://echs.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- सैन्यदल देवळाली कॅम्प, देवळाली (जि. नाशिक) येथे २८ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वा.

प्रसार भारतीमध्ये कक्ष अधिकाऱ्यांच्या १० जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली प्रसार भारतीची जाहिरात पाहावी अथवा प्रसारभारतीच्या www.prasarbharati.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार व संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी डायरेक्टर (पीबीआरबी), प्रसार भारती सेक्रेटरिएट, प्रसार भारती हाऊस, कोपरनिकसन मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७.

सैन्यदलाच्या हेडक्वार्टर्स- दक्षिण महाराष्ट्र सबएरिया- पुणे येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट, इंग्रजी टंकलेखनाची ६५ शब्द प्रतिमिनिट व पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदल हेडक्वार्टर्स दक्षिण महाराष्ट्र पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे सर्व एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर, हेडक्वार्टर्स दक्षिण महाराष्ट्र सब-एरिया, पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०१८.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये मॅनेजर- पब्लिक रिलेशन्स म्हणून संधी-

वयोमर्यादा ४२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबईची जाहिरात पाहावी अथवा माझगाव डॉकच्या www.mazdock.com या संकेतस्थळावरील career>executives या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१७.

इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई येथे असिस्टंट सिस्टीम अ‍ॅनलिस्ट कम सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च मुंबईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://www.igidr.ac.in/careers/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७.

टीएचडीसी इंडिया लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी-

अर्जदारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट- २०१८ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली टीएचडीसी इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या  http://www.thdc.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity
First published on: 23-12-2017 at 01:08 IST