महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या महसूल व वन विभागातील एकूण २६ पदांच्या भरतीकरिता ‘महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा – २०१८’
दि.२४ जून २०१८ रोजी घेण्यात येईल. (जाहिरात क्र. २१/२०१८)
(१) सहायक वनसंरक्षक – गट अ (एकुण ५ पदे) (अजा – १, भज(ब) – १, खुला – ३)
(२) वन क्षेत्रपाल – गट ब (एकूण २१ पदे) (अजा – ५, अज – १, विजा (अ) – २, भज(ड) – १, इमाव – ९, खुला – ३)
पात्रता – दोन्ही पदांसाठी वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/ गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणिशास्त्र/उद्यानविद्या/पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी पदवी. (शिवाय वन क्षेत्रपाल पदासाठी कृषिशास्त्र किंवा रसायन/स्थापत्य/संगणक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स/यंत्र/ संगणक विज्ञान/तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा संगणक अॅप्लिकेशन/संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी (विज्ञान शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)
वयोमर्यादा – दि. १ जुल २०१८ रोजी ३८ वष्रेपर्यंत (अमागास), ४३ वष्रेपर्यंत (मागासवर्गीय) (विकलांग उमेदवार दोन्ही पदांसाठी अपात्र आहेत.)
शारीरिक मापदंड – पुरुष – उंची किमान १६३ सें.मी. (अज – १५२.५ सें.मी.) छाती – ७९-८४ सें.मी. महिला – उंची १५० सें.मी. (अज – १४५ सें.मी.)
आवश्यक शारीरिक क्षमता – पुरुष व महिला उमेदवारांनी अनुक्रमे २५ कि.मी. व १४ कि.मी. अंतर ४ तासांत चालून पूर्ण करणे.
परिविक्षाधीन कालावधी – ३ वर्षांचा असेल.
प्रशिक्षण – कालावधी एकूण ३ वष्रे. प्रशिक्षण कालावधीमध्ये शासनाने निश्चित केलेल्या दराने विद्यावेतन देण्यात येईल.
परीक्षेचे टप्पे – तीन (१) पूर्वपरीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा – ४०० गुण, (३) मुलाखत – ५० गुण.
पूर्वपरीक्षेकरिता शुल्क रु. ३७४/- (अमागास) व रु. २७४/- (मागासवर्गीय)
ऑनलाइन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. ४ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.
भारतीय मानक ब्युरो (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्स) (बीआयएस), नवी दिल्लीमध्ये एकूण १०९ सायन्टिस्ट ‘बी’ पदांची भरती.
(अमागास – ५०, इमाव – ३२, अजा – १८, अज – ९) वेतन – रु.७९,९२९/-.
मेकॅनिकल इंजिनीअरींग – २१ पदे, मेटॅलर्जकिल इंजिनीअरिंग – १० पदे, सिव्हिल इंजिनीअरिंग – १८ पदे, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १० पदे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – १७ पदे, केमिकल इंजिनीअरिंग – १२ पदे, फूड टेक्नॉलॉजी – ५ पदे, मायक्रोबायोलॉजी – १३ पदे, टेक्स्टाइल इंजिनीअरिंग अँड फायबर सायन्स – ३ पदे (९ पदे विकलांगांसाठी राखीव)
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी मायक्रोबायोलॉजीसाठी एम.एस्सी. किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५०% गुण)
परीक्षा शुल्क – रु. ७५०/-. ऑनलाइन पेमेंट मोडद्वारा (अजा/अज/माजी सनिक/विकलांग/महिला उमेदवारांना फी माफ आहे.)
विस्तृत जाहिरात लवकरच बीआयएसच्या www.bis.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
ऑनलाइन परीक्षा दि. १५ एप्रिल २०१८ रोजी आयोजित केली जाईल. यातून निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. ऑनलाइन अर्ज www.bis.gov.in या संकेतस्थळावर दि. २ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.
suhassitaram@yahoo.com