आर. बी. शेख

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा २३ जून २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रम पाहता अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेचे ढोबळमानाने मराठी, इंग्रजी (भाषा विषय), सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी या तीन भागांमध्ये विभागणी करता येते. एकूण परीक्षेचा विचार करता अभ्यासक्रमनिहाय तयारी कशी करावी आपण या लेखामध्ये पाहू या.

ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

मराठी या भाषा विषयावर दहा प्रश्न विचारले जातात. त्यांपैकी पाच प्रश्न व्याकरण घटकावर व पाच प्रश्न उताऱ्यावरील प्रश्न यावर विचारले जातात. व्याकरण घटकावर प्रश्न

साधारणत: वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह, वाक्यरचना यावर विचारले जातात. विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे स्वरूप अत्यंत सोपे असल्याचे आपल्याला दिसून येते. मराठी विषयावरील विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी शब्दसंग्रह याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि त्या प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे. व्याकरण, शब्दसंग्रह या साठी मो. रा. वाळिंबे यांचे ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

मराठीप्रमाणेच इंग्रजी विषयावरदेखील दहा गुणांचे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी विषयावरील common vocabulary, sentence structure, grammar, use of idioms and phrases, and their meanings आणि comprehension of passage या घटकावर पाच प्रश्न विचारले जातात. इंग्रजी घटकाच्या अभ्यासासाठी पाल अ‍ॅण्ड सुरी हे संदर्भग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर मराठीप्रमाणेच इंग्रजीचाही शब्दसंग्रह मोठा असणे आवश्यक आहे.

सामान्य अध्ययन या विषयामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण व चालू घडामोडी या घटकांचा समावेश होतो या घटकांचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे तो पुढीलप्रमाणे :

(१) भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८५७ ते १९९०)

(२) भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल

(३) भारतीय अर्थव्यवस्था

* भारतीय आयात-निर्यात

* राष्ट्रीय विकासात सरकारी,  सहकारी, ग्रामीण बँकांची भूमिका

* शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

* पंचवार्षिक योजना

* किमती वाढण्याची कारणे व उपाय

(४) भारतीय राज्यव्यवस्था

(५) जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी  – राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी.

(६) पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना / संस्था.

सामान्य अध्ययन या घटकामध्ये अनेक उपघटक असल्याचे आपल्याला दिसून येतात. हे उपघटक महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी अगदी मिळतीजुळती असल्याचे दिसून येते. म्हणून, जे विद्यार्थी दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी या घटकाचा अभ्यास करणे सोपे आहे. इतर विद्यार्थ्यांनी देखील दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास केल्यास या घटकावर ती जास्तीत जास्त गुण मिळवता येतील.

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या तिसरा घटकांमध्ये ‘अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी अभियोग्यता चाचणी’चा समावेश होतो. या घटकांमध्ये खालील विषयांचा समावेश होतो. :

बेसिक सिव्हिल इंजिनीअिरग,

बेसिक इलेक्ट्रिकल्स, बेसिक मेकॅनिकल, मॅथेमॅटिक्स आणि इंजिनीअिरग मेकॅनिक्स या पाच घटकांचा समावेश अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी मध्ये होतो. या संपूर्ण विषयासाठी साठ गुण आहेत.

१) बेसिक सिव्हिल इंजिनीअिरग मध्ये  modern and construction, use of maps and field surveys चा समावेश होतो.

२) बेसिक इलेक्ट्रिकल्समध्ये

DC current, AC current, three phase circuits, single phase transformation यांचा समावेश होतो अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेमधील सर्वात सोपा असा हा अभ्यासक्रम आहे.

३) बेसिक मेकॅनिकल यामध्ये thermodynamics, heat transfer, power plants, machine elements, power transmission devices, mechanisms, Engineering Materials, manufacturing processes, machine tools या नऊ विषयांचा समावेश होतो.

४) मॅथेमॅटिक्स या बेसिक विषयामध्ये Matrix, partial differentiation, application of partial differentiation, linear differential equation, double and triple triple integration यांचा समावेश होतो.

५) इंजिनीअिरग मेकॅनिक्सचे प्रामुख्याने दोन भाग करता येतात. –

१) पारंपरिक

२) उपयोजित

पारंपरिक मेकॅनिक्समध्ये  coplanar, concurrent forces and condition of equilibrium, centroid and CG moment of inertia, faction, kinematics, kinetics and dynamics यांचा समावेश होतो.

अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी २०१७ व २०१८ मधील प्रश्न पाहिल्यास, दोन्ही पेपर पॅटर्न जवळपास सारखेच असल्याचे दिसून येतात. २०१९मध्येदेखील हाच पॅटर्न परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अभ्यास कोणत्याही विषयाचा करत असताना मागील दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्या प्रमुख दिशादर्शक ठरणार आहेत.

जे विद्यार्थी पूर्वीपासून एम.पी.एस.सी.चा अभ्यास करीत आहेत त्यांच्यासाठी भाषा घटक व सामान्य अध्ययन घटक हे सरावाचे झालेले आहेत. परंतु, या क्षेत्रात अगदी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांसाठीदेखील ही एक सुवर्णसंधी आहे. कारण, साठ गुणांचे प्रश्न हे अभियोग्यता अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणीव आधारित आहेत.

१) मागील प्रश्नपत्रिका २) योग्य संदर्भग्रंथ ३) वेळेचे योग्य नियोजन या त्रिसूत्रीचे पूर्णपणे पालन केल्यास अगदी नवख्या विद्यार्थ्यांनादेखील पूर्वपरीक्षेचा टप्पा सहज साध्य करता येईल.