महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा या शीर्षकाखाली परीक्षेचे आयोजन करून महाराष्ट्र कृषी सेवा, गट ‘अ’ व गट ‘ब’ या पदांची नियुक्ती केली जाते. आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा ३०जुल २०१७ रोजी होणे अपेक्षित आहे. म्हणून आपण या सदरात महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन व मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करू.
परीक्षेचे टप्पे – पूर्व परीक्षा – २०० गुण,
मुख्य परीक्षा – ६०० गुण
मुलाखत – ७५ गुण
पूर्व परीक्षा –
विषय गुण/ प्रश्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
मराठी भाषा १००/२०० शालांत मराठी एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रजी भाषा पदवी इंग्रजी
सामान्य अध्ययन पदवी मराठी व इंग्रजी
कृषिविषयक घटक पदवी मराठी व इंग्रजी
शैक्षणिक अर्हता
मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यान विद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता, भरतीकरिता खालील शैक्षणिक अर्हता शासनाने बी.एसस्सी (कृषी)/बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केल्या आहेत.
अभ्यासक्रम –
* मराठी भाषा –
* इंग्रजी भाषा –
* सामान्य अध्ययन –
१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील महत्त्वपूर्ण घडामोडी
२) आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. १८५७ – २०००)
३) भारताचा भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासहित)
४) भारतीय राज्यव्यवस्था
५) महाराष्ट्रातील समाजसुधारक
६) भारतीय अर्थव्यवस्था
७) शाश्वत विकास
८) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
अ) विविध क्षेत्रांतील संगणकाचा वापर – व्याप्ती आणि मर्यादा.
ब) माहिती तंत्रज्ञान
९) ग्रामीण जीवनावश्यक राजकीय, आíथक, सामाजिक, जनसंपर्क, सार्वजनिक आरोग्य विकास यांचा परिणाम.
* कृषी –
अ) जमिनीचा वापर आणि महत्त्वाची पिके
ब) सिंचन स्रोत आणि पद्धती
क) पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
ड) पुष्पोत्पादन, वनविकास आणि उत्पन्न
इ) मत्स्य व्यवसाय
फ) कृषी अर्थशास्त्र
विश्लेषण –
२०१६च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व गुणांची विभागणी
विषय मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन कृषिविषयक घटक
प्रश्न १५ १५ ४५ २५
गुण ३० ३० ९० ५०
२०१६च्या कृषी सेवा पूर्व परीक्षेच्या विश्लेषणावरून वरीलप्रमाणे घटकनिहाय गुणविभाजन आयोगाने केले असल्याचे दिसते. मराठी या घटकामध्ये वर्णमालेवरचे प्रश्न, शब्दसमूहाबद्दल पर्याय, वाक्यरचना, नाम-सर्वनाम, अव्यय प्रकार, संधि विग्रह, वाक्यप्रचार या उपघटकांवर व इंग्रजी भाषा या घटकात meaning to the word, errors, Identify the correct sentence, phrase, Antonym यांच्यावर भर दिला आहे.
सामान्य अध्ययन या विभागात शासकीय योजना, ब्रिक्स परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राज्यघटनेतील कलमे, नागरिकत्व, समाजसुधारकांची वक्तव्ये, यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे व संस्था, त्यांची काय्रे, खारफुटीची वने, त्री साक्षरता प्रमाण, जनगणना, प्राकृतिक महाराष्ट्र, उद्योग, परकीय व्यापार, शासनाचे कार्यक्रम, अर्थशास्त्रातील संकल्पना, कृषी अर्थशास्त्र यांवर विशेष भर परीक्षार्थीनी द्यावा.
अभ्यासाचे नियोजन –
* मराठी भाषा व इंग्रजी भाषा या दोन्ही विषयांना प्रत्येकी १५ x ३० अशी प्रश्नांची विभागणी केली आहे म्हणून
* मराठी व इंग्रजी व्याकरणाचा नियमित सराव, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, शब्दसंग्रहात भर टाकणे, क्रमप्राप्त ठरते.
* सामान्य अध्ययन हा विभाग ९ उपघटकांमध्ये विभागला आहे. प्रत्येक घटकावर ९ x ५ = ४५ प्रश्न विचारलेले आहेत. हे परीक्षार्थीनी लक्षात घ्यावे आणि घटकनिहाय अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
* कृषी या घटकावर आयोगाने २५प्रश्न ५० गुणांसाठी विचारले असल्यामुळे पीकपद्धती, कृषी संशोधन केंद्रे, पशुसंवर्धन, पशूंच्या जाती व वैशिष्टय़े पिकांवर पडणारे रोग, सिंचनपद्धती, मत्स्य व्यवसाय व मत्स्य उत्पादने, दुग्ध व्यवसाय यांचा अभ्यास करणे महत्त्वपूर्ण आहे.
संदर्भ सूची –
१) मराठी भाषा –
सुगम मराठी व्याकरण – मो.रा. वािळबे
२) इंग्रजी भाषा –
English Grammar – Wern & Martin
English Grammar – Pal & Giri
सामान्य अध्ययन –
योजना, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकि,
आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोहर आणि बेल्हेकर,
भारतीय राज्यघटना – एम. लक्ष्मीकांत,
भूगोल आणि पर्यावरण – सवदी
भारतीय अर्थव्यवस्था – दत्त आणि सुंदरम
पर्यावरण – शंकर आयएएस अॅकॅडमी
संगणक व माहिती तंत्रज्ञान – अभिजीत बोबडे
कृषिविषयक घटक –
प्रिन्सिपल ऑफ अॅग्रोनॉमी – रेड्डी
राज्य परीक्षा मंडळाची अॅग्रिकल्चर आणि टेक्नॉलॉजीची ११वी, १२वीची पुस्तके.
पुढील अंकात आपण कृषी सेवा मुख्य परीक्षेविषयी जाणून घेऊ.
महेश कोगे