केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) लवकरच २०२३ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. याबाबत एक अपडेट देण्यात आली आहे. cbse.gov.in व cbse.nic.in. या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
आधी झालेल्या परीक्षांनुसार टाइमटेबल परीक्षेच्या ४५ ते ६० दिवस आधी जाहीर केले जाते. सीबीएसई बोर्डाकडुन परीक्षांचा कालावधी आधी जाहीर करण्यात आला आहे. ‘इयत्ता १० वी’ आणि ‘इयत्ता १२ वी’ची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे.
आणखी वाचा: JEE Main 2023 चे माहितीपत्रक जाहीर; जाणून घ्या कधी असणार परीक्षा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘१० वी’ आणि ‘१२ वी’ इयत्तेच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी, २०२३ पासून सुरू होईल. लवकरच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाईटवर याबाबत अपडेट जारी करण्यात येईल.