तुमच्या आयुष्याची दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येयं निश्चित करताना तुम्ही स्वत:ला सतत विचारलं पाहिजे की, विविध क्षेत्रात वावरताना मला नेमकं काय करायला सर्वात जास्त आवडतं? उदाहरणार्थ, जर तुमच्या कामाच्या ठिकाणी दिवसभर एकच गोष्ट मी करू शकत असले असते तर ती कुठली गोष्ट असती? जर तुम्ही पैसे न घेता कोणती तरी नोकरी किंवा पूर्णवेळ काम सतत केले असते तर ते कुठले काम असते? कशा प्रकारचे काम तुम्हाला महत्तम आनंद आणि समाधान मिळवून देते?
मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लोने ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीला सर्वात आनंदी, सर्वात उन्नत आणि सर्वात उल्हसित वाटते त्या वेळेला ‘शिखर अनुभव’ असे म्हटले आहे. तुमच्या आयुष्यातील ध्येयांपैकी एक म्हणजे आयुष्यात शक्य असतील तितक्या शिखर अनुभवांचा आनंद घेणे.
आजपर्यंतच्या आयुष्यातले तुमचे सर्वाधिक आनंदाचे क्षण कोणते? तुम्ही भविष्यकाळात असे क्षण आणखी कसे मिळवू शकता? तुम्हाला खरोखर काय करायला आवडेल.. हे प्रश्न स्वत:ला विचारत राहा.
‘गोल्स’- ब्रायन ट्रेसी, अनुवाद- गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे- २५६, किंमत- २२५.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2013 रोजी प्रकाशित
जे करायला आवडते, ते काम करा..
तुमच्या आयुष्याची दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येयं निश्चित करताना तुम्ही स्वत:ला सतत विचारलं पाहिजे की, विविध क्षेत्रात वावरताना मला नेमकं काय करायला सर्वात जास्त आवडतं? उदाहरणार्थ, जर तुमच्या कामाच्या ठिकाणी दिवसभर एकच गोष्ट मी करू शकत असले असते तर ती कुठली गोष्ट असती?

First published on: 15-07-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do that work wich you like