JEE Advanced Result 2021 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा तुमचा निकाल

जेईई अ‍ॅडव्हान्स निकाल 2021: संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर निकाल पाहू शकतात.

jee-advanced-result-2021

जेईई अ‍ॅडव्हान्स निकाल 2021: संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली गेली होती. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर निकाल पाहू शकतात.

आयआयटी प्रवेश 2021 साठी 3 ऑक्टोबर 2021 या दिवशी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल आज सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आलाय. jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट वाईज मार्क्स, एकूण मार्क्स आणि अखिल भारतीय रॅंक (AIR) देखील जाहीर करण्यात आले आहे. तुम्हाला तुमचा निकाल पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे. JEE अ‍ॅडव्हान्स 2021 निकाल नक्की कसा तपासायचा हे जाणून घेऊयात…

असा पाहा JEE Advanced Result 2021

  • आगोदर jeeadv.ac.in हे संकेतस्थळ तुमच्या गुगल पेज अथवा तुमच्या आवडत्या कोणत्याही सर्च इंजिनवरुन ओपन करा.
  • jeeadv.ac.in साईटवर ठळकरित्या दिसणाऱ्या रिजल्ट या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख भरा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर आपला निकाल दिसू शकेल.
  • आपल्या निकालाची प्रत आपण डाऊनलोडही करु शकता आणि त्याची प्रिंटही काढू शकता.

जेईई मेन मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 2,20,000 विद्यार्थीच ‘जेईई ऍडव्हान्स’ परीक्षेत बसू शकतात आणि या परिक्षेत उत्तीर्णपैकी पहिल्या एक लाख विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळतो. मागील वर्षाप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल. आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.

यंदा चारवेळा परीक्षा

वेगवेगळ्या राज्यांच्या बोर्ड परिभांमध्ये जेईई परिक्षेमुळे कुठली अडचण होऊ नये म्हणून यंदाच्या वर्षीपासून संयुक्त प्रवेश परीक्षा आणि जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने परिक्षा देता यावी आणि आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये, दुसरा टप्पा मार्चमध्ये पार पडला. त्यानंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या दोन्ही टप्प्यातील परीक्षा स्थगित केल्या होत्या. अखेत 20-25 जुलैपर्यंत तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा 26 ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत पार पडला. त्यानंतर आज सकाळी १० वाजता या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय.

JEE म्हणजे काय?

JEE चा long form आहे, ‘Joint Entrance Exam’ म्हणजे ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’. IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEE Main परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर JEE Advance परीक्षा द्यावी लागते. आय.आय.टी. खडगपूर, आय.आय.टी. कानपूर, आय.आय.टी. बॉम्बे, आय.आय.टी. गुवाहाटी, आय.आय.टी. मद्रास, आयआयटी दिल्ली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (I.I.Sc.) बंगलोर या सात आयआयटीपैकी एका कडून दरवर्षी ही परीक्षा आयोजित केली जाते. जॉइन्ट ऍडमिशन बोर्ड (JAB) ची देखरेख या परिक्षेवर असते. IIT चा फुल फॉर्म आहे, ‘Indian Institute of Technology’ म्हणजेच ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’. ही तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी देशातील सर्वात सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेतून विविध तंत्रज्ञ, वैज्ञानिक, अभियंते व संशोधक बाहेर पडतात. त्यामुळे या संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jee advanced result 2021 see your result prp

Next Story
अभियंत्यांची फॅक्टरी!
ताज्या बातम्या