अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
५ ते ११ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा प्रसार भारतीच्या http://www.prasarbharati.gov.in किंवा http://www.allindiaradio.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
२३ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

एनटीपीसीमध्ये पदविका अभियंत्यांसाठी २०५ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल अथवा कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनीअिरगमधील पदविका पात्रता उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते ११ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

मिश्र धातू निगममध्ये मेल्हरच्या ६ जागा
वयोमर्यादा ४०. अधिक तपशिलासाठी मिश्र धातू निगमच्या http://www.midhni.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडिशनल जनरल मॅनेजर (एचआर) मिश्र धातू निगम लि. पोस्ट ऑफिस कांचनबाग, हैदराबाद- ५०००५८, तेलंगणा या पत्त्यावर २४ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

एमएमटीसीमध्ये डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) च्या ५ जागा
अधिक माहितीसाठी एमएमटीसीच्या http://www.mmtclimited.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
२८ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये साहाय्यक व्यवस्थापकांच्या ४ जागा
वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक तपशिलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
२८ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

केंद्रीय नौकानयन मंत्रालयांतर्गत दीपस्तंभ व दीपपोत निदेशालयात फिल्ड असिस्टंटच्या २५ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय दीपस्तंभ व दीपपोत निदेशालयाची जाहिरात पाहावी अथवा निदेशालयाच्या http://www.dgll.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डायरेक्टोरेट ऑफ लाइटहाऊसेस अ‍ॅण्ड लाइटशिप्स, दीप भवन, गांधीनगर, कोचीन ६८२०२०, केरळ या पत्त्यावर
२८ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या उत्तर- पूर्व विभागात खेळाडूंसाठी ५७० जागा
अर्जदार १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या उत्तर-पूर्व विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दी डीआयजी, जीसी- सेंट्रल रिझव्‍‌र्ह पोलीस फोर्स, झरोडा कालन, नवी दिल्ली- ११००७२ या पत्त्यावर ३० डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.