|| सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ विरॉलॉजी, पुणे येथे पुढील पदांची भरती.

(१) टेक्निकल असिस्टंट (टेक्निकल सपोर्ट) – ४ पदे (इमाव – १, खुला – ३) पात्रता – लाइफ सायन्सेसमधील प्रथम वर्गातील पदवी (मायक्रोबायोलॉजी/बायो टेक्नॉलॉजी/झूऑलॉजी/बॉटनी/अ‍ॅनॉटॉमी/

बायोफिजिक्स/ बायोइन्फम्रेटिक्स/ व्हेटर्नरी/ विरॉलॉजी/बायोस्टॅटिस्टिक्स/पॅथॉलॉजी/

मॉलिक्युलर बायोलॉजी/इपीडेमिओलॉजी).

(२) टेक्निकल असिस्टंट

(इंजिनीअिरग सपोर्ट) – २ पदे.

पात्रता – प्रथम वर्गातील इंजिनीअिरग

पदविका (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) आणि

२ वर्षांचा अनुभव किंवा वरील विषयांतील

प्रथम वर्गातील इंजिनीअिरग पदवी.

वयोमर्यादा – पद क्र. (१) व (२) साठी

३० वर्षेपर्यंत.

(३) टेक्निशियन – १ (टेक्निकल सपोर्ट) –

६ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ४)

पात्रता – १२वी (विज्ञान) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण आणि डीएम्एल्टी एक वर्षांचा कोर्स पूर्ण (लाइफ सायन्सेसमधील पदवीधारकांस प्राधान्य)

(४) टेक्निशियन (इंजिनीअिरग सपोर्ट) –

१२ पदे (अजा – १, अज – १,

इमाव – ३, खुला – ७)

पात्रता – १२वी (विज्ञान) किमान  ५५% गुणांसह उत्तीर्ण आणि ऑपरेटर बीएमएस/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक रेफ्री अ‍ॅण्ड एसी/बॉयलर ऑपरेटर/ ऑपरेटर प्लांट/मेकॅनिकल इन्स्ट्रमेंटमधील आयटीआय.

वयोमर्यादा – पद क्र. (३) व (४) साठी २८ वर्षेपर्यंत. सर्व पदांसाठी उच्चतम वयोमर्यादेत सूट (इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत)

निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षेतून

निवड. ऑनलाइन अर्ज niv.erecruitment.co.in या संकेतस्थळावर दि.२१ मे २०१८ पर्यंत करावेत.

 

साऊथ इंडियन बँक, रजिस्टर्ड ऑफिस त्रिशूर, केरला पुढील पदांची भरती.

(१) ‘प्रोबेशनरी अ‍ॅफिसर्स’ एकूण १५० पदे.

पात्रता – दहावी, १२ वी आणि पदवी किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेणारे उमेदवार पात्र नाहीत.) उमेदवाराचा जन्म

१ जानेवारी १९९३ ते ३१ डिसेंबर १९९८ दरम्यानचा असावा.

(२) प्रोबेशनरी लिगल ऑफिसर्स – ९ पदे.

पात्रता – दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी १० वी,

१२ वी आणि एलएल.बी. परीक्षा किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी

२८ वर्षेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम

दि. २७ मे २०१८ ऑनलाइन टेस्ट जून २०१८ दरम्यान.

(३) प्रोबेशनरी सिक्युरिटी ऑफिसर – ७ पदे.

पात्रता – बीई (ईसीई/ईईई/इन्स्ट्रमेंटेशन) किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण

(१० वी/१२ वीलासुद्धा ६०%  गुण आवश्यक.)

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी

२५ वर्षेपर्यंत. (अजा/अजसाठी ५ वर्षांनी शिथिलक्षम)

प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल.

निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत.

अर्जाचे शुल्क – रु. ८००/-

(अजा/अज – रु. २००/-)

(अधिक जीएसटी आणि इतर आकार)

ऑनलाइन अर्ज www.southindianbank.com या संकेतस्थळावर दि. २५ मे २०१८ पर्यंत करावेत.

परीक्षा केंद्र – पद क्र. (१) साठी औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ. पद क्र. (२) व (३) साठी मुंबई.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (जाहिरात क्र. २६/२०१८) ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा – २०१८’ दि. ८ जुल २०१८ रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे या केंद्रांवर घेणार आहे.

(अ) जलसंपदा विभाग

(१) सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट-अ – ७ पदे.

(२) सहायक अभियंता, स्थापत्य गट-अ – २१ पदे.

(३) सहायक अभियंता, स्थापत्य गट-ब – ६५ पदे.

(ब) सार्वजनिक बांधकाम विभाग –

(१) सहायक कार्यकारी अभियंता,

स्थापत्य गट-अ – ६ पदे.

(२) सहायक अभियंता,

स्थापत्य गट-ब – ३५ पदे.

(३) सहायक अभियंता, विद्युत गट-ब – ३ पदे.

पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा बीई

(सिव्हिल अ‍ॅण्ड वॉटर मॅनेजमेंट/सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हार्नन्मेंट/स्ट्रक्चरल/कन्स्ट्रक्शन इंजि.)

विद्युत अभियांत्रिकी पदांसाठी बीई (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अ‍ॅँड पॉवर इंजि./ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर इंजि./ पॉवर सिस्टीम इंजि./इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी

१९-३८ वर्षे. (मागासवर्गीय १९ ते ४३ वर्षे)

परीक्षेचे तीन टप्पे – (१) पूर्वपरीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा – ४०० गुण,

(३) मुलाखत – ५० गुण.

परीक्षा शुल्क – रु. ३७४/- (मागासवर्गीय

रु. २७४/-)

ऑनलाइन अर्ज  https://mahampsc.mahaonline.gov.in  वर २४ मे २०१८ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta job opportunity
First published on: 18-05-2018 at 00:03 IST