Maharashtra Board SSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या १७ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. याबद्दलची माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर दिली. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.

‘या’ वेबसाइटवर बघू शकता निकाल

mahresult.nic.in

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
evm machine court case marathi news
ईव्हीएम वापरताना माहिती कायद्याचे उल्लंघन होते म्हणून बॅलेट पेपरने निवडणूक घ्या, उच्च न्यायालयात याचिका
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

sscresult.mkcl.org

mkcl.org

ssc.mahresults.org.in

(हे ही वाचा: महत्वाची बातमी : दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती)

रोल नंबर आणि आईचे नाव वापरून विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्राचा बारावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. यंदा महाराष्ट्रात ९४.२२ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.