Maharashtra Swadhar Yojana: महाराष्ट्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने राज्य सरकारने स्वाधार योजना अंमलात आणली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी व डिप्लोमा प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षाला ५१ हजाराची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यातून भविष्याला आकार देण्याच्या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्रता निकष, योजनेचे सविस्तर लाभ व अर्ज करण्याची पद्धत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वाधार योजनेचे तपशील

  • अनुसूचित जाति, नव बौद्ध समुदायातील उमेदवारांना स्वाधार योजनेचे लाभ उपलब्ध असतील.
  • डिप्लोमा प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल शिक्षणाच्या कालावधीत राहणे- खाणे व शैक्षणिक खर्चासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाईल.
  • मदतीची ही रक्कम प्रत्येक वर्षाला ५१,००० रुपये इतकी आहे.

स्वाधार योजनेचे पात्रता निकष

  • अनुसूचित जाति, नव बौद्ध समुदायातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
  • उमेदवाराचे कौटुंबिक आर्थिक उत्पन्न २.५ लाखाहून अधिक नसावे.
  • शैक्षणिक कालावधी दोन वर्षांहून अधिक नसावा.
  • उमेदवार किमान ६०% मिळवून दहावी किंवा बारावी इयत्तेत उत्तीर्ण झालेला असावा.
  • शारीरिक दिव्यंगत्व असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत किमान ४०% प्राप्त करणे गरजेचे आहे.
  • उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठीआवश्यक कागदपत्रे

विद्यार्थाकडे स्वत:चे आधार कार्ड, ओळखपत्र, बँकेचे खाते, ऊत्पन्नाचा दाखला, असणे आवश्यक आहे.

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. सविस्तर माहितीसाठी वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्या.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra swadhar yojana scholarship for 11th 12th standard and diploma students check how to apply svs
First published on: 24-08-2022 at 19:46 IST