महाराष्ट्र कॉमन प्रवेश परीक्षा, एम एच टी सीईटी २०२१ च्या निकालाची तारीख आधी जाहीर करण्यात आली होती ज्यानुसार २८ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी निकाल घोषित केले जाणार आहे. निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाइटला भेट देऊन तुमचा निकाल तपासू शकता.

राज्य कॉमन प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र यांनी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी तात्पुरती उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली होती. एम एच टी सीईटी निकाल २०२१ सोबत, राज्य सीईटी सेल अंतिम उत्तर की (answer key ) देखील प्रसिद्ध करेल.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
ssc je recruitment 2024 for 968 junior engineer
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ‘या’ पदांसाठी मेगा भरती! १८ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

( हे ही वाचा: जाणून घ्या; ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये कोणते नवीन शब्द जोडले गेले? )

एम एच टी सीईटी २०२१ ची परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. तसेच, अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना ९ आणि १० ऑक्टोबर रोजी परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. एच टी सीईटी निकाल २०२१ तपासण्यासाठी अर्ज नंबर आणि जन्मतारीख आवश्यक आहेत.

राज्यभरातील २२६ परीक्षा केंद्रांवर झालेल्या ऑफलाइन परीक्षेत एकूण ४,२४,७७३ विद्यार्थी बसले होते. स्कोअरकार्डमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्रातील पर्सेंटाइल स्कोअर, नाव, रँक आणि इतर माहिती असेल.

( हे ही वाचा: SSC GD Constable Exam 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा अर्ज फॉर्म स्टेटस जारी )

निकाल जाहीर झाल्यानंतर, राज्य सेल समुपदेशनाची माहिती प्रसिद्ध करेल. समुपदेशन प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना त्यांच्या गुणपत्रिका, अर्ज आणि प्रवेशपत्रे जतन करण्याचा सल्ला दिला जातो. या परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार यूजी स्तरावरील अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. एच टी सीईटी निकाल २०२१ तारखेच्या अधिक अपडेटसाठी वर शेअर केलेल्या अधिकृत वेबसाइटचे अनुसरण करत रहा.